दिनविशेष : २९ जानेवारी

389

२९ जानेवारी  : जन्म

१२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १२९७)

१७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८०९)

१८४३: अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)

१८५३: ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म.

१८६०: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९०४)

१८६६: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)

१९२२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

१९२६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)

१९५१: वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज अँडी रॉबर्टस यांचा जन्म.

१९७०: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.

२९ जानेवारी  : मृत्यू

१५९७: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन. (जन्म: ९ मे १५४०)

१८२०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचे निधन. (जन्म: ४ जून १७३८)

१९३४: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड)

१९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.

१९६३: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७४)

१९९३: गणितज्ञ रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.

१९९५: रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन.

२०००: बासरीवादक देवेन्द्र मुर्डेश्वर यांचे निधन.

२०००: शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.

२००१: महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन.

२९ जानेवारी : महत्वाच्या घटना

१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

१८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

१९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम