दिनविशेष : ३० मे

216

दिनविशेष

३० मे : जन्म

१८९४: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९)

१९१६: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ – मुंबई)

१९४९: इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म.

१९५०: अभिनेते परेश रावल यांचा जन्म.

 

 

३० मे  : मृत्यू

१४३१: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२)

१५७४: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १५५०)

१७७८: फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४)

१९१२: आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८६७)

१९४१: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)

१९५०: प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.

१९५५: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: ५ जून १८७९)

१९६८:चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)

१९८१: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या. (जन्म: १९ जानेवारी १९३६)

१९८९: शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)

२००७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)

 

३० मे  : महत्वाच्या घटना

१५७४: हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.

१६३१: पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.

१९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.

१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.

१९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

१९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.

१९८७: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

१९९३: पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

१९९८: अफगाणिस्तान मधील ६.५ मेगावॅट क्षमतील भूकंपात ४००० ते ४५०० लोक ठार झाले.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम