दिनविशेष : ७ एप्रिल [जागतिक आरोग्य दिन]

355

  ७ एप्रिल : जन्म

१५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ – साओ जोआओ, चीन)
१७७०: स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १८५०)
१८६०: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१)
१८९१: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ – लंडन, इंग्लंड)
१९२०: भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
१९२५: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २०११)
१९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)
१९४२: हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.
१९५४: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.
१९८२: भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त यांचा जन्म.

७ एप्रिल : मृत्यू

१४९८: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) यांचे निधन. (जन्म: ३० जून १४७०)
१९३५: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १८६७)
१९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८६३)
१९७७: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९१२)
२००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ – एर्नाकुलम, केरळ)
२००४: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२६)

७ एप्रिल : महत्वाच्या घटना

१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.
१९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
१९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
१९४८: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
१९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
१९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.


जागतिक आरोग्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम