दिनविशेष : ८ नोव्हेंबर

जागतिक शहरीकरण दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
307

जागतिक शहरीकरण दिन
आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
८ नोव्हेंबर : जन्म

१६५६: खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ.

१८३१: भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म.

१८६६: ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म.

१८९३: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म.

१९०९: स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म.

१९१७: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म.

१९१९: प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म.

१९२०: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म.

१९२७: भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

१९५३: भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म.

१९७०: मायस्पेस चे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.

१९७४: नारुतो चे जनक मसाशी किशिमोतो यांचा जन्म.

१९७६: ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली यांचा जन्म.

८ नोव्हेंबर : मृत्यू

१२२६: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन.

१६७४: कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन.

१९६०: भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.

२०१३: भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन.

२०१५: भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन.

२०१५: उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

८ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

१८८९: मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

१८९५: दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

१९३२: अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.

१९३९: म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

१९४७: पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

१९६०: अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९८७: पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.

१९९६: कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

२००२: जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१६: तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.

२०१६: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम