दिनविशेष : २७ मार्च [जागतिक रंगमंच दिवस]

236

  २७ मार्च : जन्म

१७८५: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १७९५)
१८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)
१८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९३३)
१९०१: डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)

२७ मार्च : मृत्यू

१८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)
१९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९४)
१९६७: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८९०)
१९६८: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३४)
१९९२: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.
१९९७: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन.
२०००: हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.

२७ मार्च : महत्वाच्या घटना

१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.
१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम