आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८९५- मृत्यू : १९८२)

2,028

आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

जन्म : ११ सप्टेंबर १८९५ (गागोदे, ता. पेण, जि. रायगड)

मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२ (पवनार आश्रम, वर्धा)

संपूर्ण नाव : विनायक नरहर भावे

मुळ गाव : वाई

वडिल : नरहर शंभुराव भावे

आई : रुख्मीणी (रखमाबाई)

टोपण नाव: विनोबा (गांधीजीकृत नाव)

प्रभाव : महात्मा गांधी

उपाधी : आचार्य

११ सप्टेंबर १८९५ आचार्य विनोबा भावे यांचा कोकणातील गागोदे येथे जन्म. ‘गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ अशी दोन विशेषणे विनोबांना लावण्यात येतात. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. गांधीजींच्या सत्याग्रहाचा विकास विनोबांनी सवरेदयात केला आणि ग्रामस्वराज्य कल्पना ग्रामदानापर्यंत आणली. जनतेच्या हृदयाला आवाहन करीत लाखो एकर जमीन भूमिहीनांना मिळवून देण्याचा ऐतिहासिक प्रयोग जगात फक्त विनोबाच करू शकले.

भगवद्गीतेचे सार असलेल्या त्यांच्या ‘गीताई’ या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक प्रस्थापित केले. कुराण, बायबल यांच्यावरील सारग्रंथही त्यांच्यातील प्रकांडपंडिताचे दर्शन घडवितात. भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतका गाढा अभ्यास असणारी व्यक्ती विरळाच!

संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भातील विनोबांची भूमिका व आणीबाणीच्या संदर्भातील त्यांच्या भूमिकेचा करण्यात आलेला विपर्यास यामुळे जनतेचा व अनुयायांचा रोष ओढवूनही, स्वत:ला जे पटले त्याचेच आचरण करण्यात विनोबांनी कसूर केली नाही.

 • १९१३ बडोदा येथे मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण
 • १९१४ बडोदा कॉलेजात विद्यार्थी मंडळाची स्थापना.
 • ७ जून १९१६ कोचरब येथील सत्याग्रहाश्रमात गांधीजीशी विनोबाची पहिली भेट.
 • ८ एप्रिल १९२१ वर्धा आश्रमाचे संचालक म्हणून नेमणुक.
 • जानेवारी १९२३ महाराष्ट्र धर्म मासिक सुरु.
 • १३ एप्रिल १९२३ नागपूर – झेंडा सत्याग्रहात सहभाग. –
 • १८ जून १९२४ महाराष्ट्र धर्म मासिकाचे साप्ताहिकात रुपांतर.
 • १९३१ आईच्या इच्छापूर्तीसाठी भगवत गितेचे अध्ययन करुन ‘गीताई’ हे समश्लोकी मराठीत भाषांतर.
 • १९ फेब्रुवारी १९३२ धुळे तुरुंगात १८ व्याख्याने
 • १९ जून १९३२ गिता प्रवचन म्हणून प्रसिद्ध झाली.

आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

-भारतातील सर्व भाषामध्ये प्रकाशित

– यामध्ये गीतेला विनोबांनी साम्ययोग हे नाव दिले.

 • १४ जुलै १९३२ गीताईच्या पहिल्या आवृत्तीचे धुळे जेलमध्ये प्रकाशन,
 • ६ मे १९३२ वर्ध्याजवळ ग्रामसेवा मंडळाची (गोपुरची) स्थापना.
 • २ ऑक्टोबर १९३६ फैजपूर येथिल राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात मुहूर्तमेढ विनोबाच्या हस्ते.
 • १९३६ महारोगी सेवा मंडळाची स्थापना वर्धा येथे.
 • २० ऑक्टोबर १९४० गांधीच्या वैयक्तीक सत्याग्रह आंदोलनातील पहिले वैयक्तीक सत्याग्रही विनोबा भावे.
 • ऑगस्ट १९४२ चले जाव चळवळी दरम्यान विनोबांना अटक.

-वेल्लोरे तुरुंगात विनोबांनी १०८ दिवस प्रवचने दिली, ती वेल्लोर प्रवचने म्हणून विनोबा साहित्य खंड ५ मध्ये प्रसिद्ध,

-शिवणी तुरुंगात गीतेवर १८ प्रवचने दिली ती स्थितप्रत दर्शन या नावाने प्रसिद्ध आहे.

 • १८ एप्रिल १९५१ भूदान चळवळ सब भूमी गोपाल की तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावातून चळवळ प्रारंभ.

-याच गावातील श्री. रामचंद्र रेड्डी यांनी आपली १०० एकर जमीन दान देऊन भूदान चळवळीचा प्रारंभ केला.

 • ११ जुलै १९५७ केरळ येथे शांति सेना स्थापन केली.

-पहिले सेनापती म्हणुन केलप्पनजी यांची निवड विनोबांनी केली.

 • १९५८ रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय.
 • १५ गस्ट १९६० इंदूर येथे सर्वोदय कार्यकर्त्यासाठी विसर्जन आश्रमाची स्थापना.
 • ५ मार्च १९६२ भारत-चीन सिमेवरील नेफा येथे मैत्री आश्रमाची स्थापना.
 • ८ मार्च १९६६ बिहारमधील कहलगाव येथे आचार्य कुलाची स्थापना.
 • ७ जून १९६६ सूक्ष्म कर्मयोगाचा प्रारंभ (पवनार आश्रम)
 • १९७५ वर्धा येथील पवनार गावात परमधाम आश्रमाची स्थापना.
 • ११ सप्टेंबर १९७६ गोहत्या विरोधात आमरण उपोषणाची घोषणा.
 • १५ नोव्हेंबर १९८२ वयाच्या ८७ व्या वर्षी वर्धा येथील पवनार आश्रमात सकाळी ९:३० वा. ब्रहनिर्वाण
 • १९८३ भारत सरकारकडून मरणोत्तर भारतरत्न.

आचार्य विनोबा भावे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

 • ग्रंथसंपदा :

गिताई                                             विचार पोथी

स्थित प्रदर्शन                                अनुशासन

संतांचा प्रसाद                                ऋग्वेदसार

वेदनासुधा                                       मधुकर

अभंगवृत्ते                                        ख्रिस्त धर्मप्रसार

गीता-प्रवचने                                   विनयांजली

कुराण सार                                    आष्टादशी (सार्थ)

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम