Admit Card Download शिक्षक अभियोग्यता चाचणी प्रवेशपत्र उपलब्ध झाले। Maha TAIT 2023
Admit Card Download
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठीचे हॉल तिकीट आज डाउनलोड साठी उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थांनी डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेसाठी तब्बल २ लाख ३९ हजार ७२६ उमेदवारांची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरतीचा शासन निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला, त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
अर्थात टीईटी आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे. २०१७ मध्ये पहिली अभियोग्यता परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी १ लाख ९१ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ७२ हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थिती लावली होती. ही परीक्षा २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी दररोज दोन बॅचेस करण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणक प्रणालीद्वारे होणाऱया शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट परीक्षा)प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. डाउनलोड लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे, तरी उमेदवारांनी आपण लॉगिन करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. तसेच, हि ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.
Maharashtra TAIT Exam Call Letter / Hall Ticket Date 2023
- ऑनलाइन परीक्षा दिनांक : २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान
- हॉलतिकिट मिळणार :उपलब्ध झाले आहेत, लिंक खाली दिलेली आहे
- २०२३ परीक्षेसाठी झालेली नोंदणी : २३९७२६
- २०१७ मध्ये झालेली नोंदणी : १९७०००
परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच
राज्य डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून उपमुख्यमंत्री कार्यालयातून राज्य परीक्षा परिषदेच्या संचालकांना असोसिएशनच्या मागणीवर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय शिक्षक संघटन (केव्हीएस) या प्राथमिक शिक्षक पदासाठी २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहे. टेट परीक्षा देणारे अनेक उमेदवार केव्हीएसची परीक्षाही देणार आहेत. त्यामुळे टेट की केव्हीएस? असा प्रश्न उमेदवारांसमोर उभा राहिला आहे.
Admit Card Download Link
Maha TAIT परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना
1.सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात (Site) प्रवेश करण्यासाठी आपणास दिलेला यूजर आई डी / पासवर्ड नमूद करावा लागेल. संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नांव आणि इतर तपशील बरोबर आहे याची पडताळणी करावी. आपणास उपलब्ध करुन देण्यात आलेला यूजर आई डी / पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे.
2.कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सद्य स्थितीत वैध असे मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रावर असणारे नाव (ऑनलाईन नोंदणीच्यावेळी जे उमेदवाराने दिलेले असेल) व ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले/मधले/अंतिम नाव बदलले आहे त्यांनी हयाची खास दखल घ्यावी. जर प्रवेश पत्रावरील फोटो/नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत/नावात कोणताही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल, अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना/विवाह प्रमाणपत्र/शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती देण्यात येईल.
3.बायोमेट्रिक डाटा (अंगठय़ाचा ठसा) आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय (जुळतो अथवा जुळत नाही) MSCE चा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमैट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या :
(क)जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
(ख)जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.
(ग)दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पूसा.
(घ)ठसा घेतल्या जाणा-या अंगठय़ाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परिक्षा केंद्रावर संबंधित अधिका-यास कळवा.
(या मुद्यांचे पालन करण्यास उमेदवार असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही.)
4.परीक्षेच्या स्वरुपाबद्दल माहिती/सूचना देणारी पुस्तिका (Information Handout) MSCE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर माहिती पुस्तिका संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्याचे अध्ययन करावे.5.पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा स्पष्टपणे उमटवावा व स्वाक्षरी करावी.
6.उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन आणावयाचे आहे. उमेदवार आपल्यासोबत स्वतःचे स्टँप पॅड आणू शकतात. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरवला जाईल. परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्रासह पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागतील.
7.तुम्हाला वर नमूद केलेल्या ऑनलाईन परिक्षेस बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. ची सत्यता न तपासता अनुमति देण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी MSCE ची सर्व पात्रता व निकष पूर्ण करतो हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील.
8.बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पध्दतीमध्ये जर का असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे आदान प्रदान झालेले आहे अणि मिळवलेले गुण हे यथार्थ/स्विकारण्यायोग्य नाहीत, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
9.हया प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षास्थानी यावयास हवे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
10.पुस्तके, वह्या, परिगणक यंत्र (Calculator), पेजर, मोबाईल फोन इत्यादी प्रकारची साधने/साहित्य परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद केलेली अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्यावेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याची नोंद घ्यावी.
11.परीक्षेचा दिनांक / सत्र / परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.
12.सदर प्रवेशपत्र म्हणजे MSCE द्वारे प्रवेशाची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
13.उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र समजले जाईल.
14.कृपया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो/ते. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी व वेळी एकदाच परीक्षेस उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. उर्वरीत सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावी लागतील.
15.परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीस काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेस हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय हा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा/मंडळाचा अंतिम राहील. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही. या विलंबीत झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधुन संपूर्णपणे वगळण्यात येईल.
16.परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती, संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रांसमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे किंवा परिक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे, किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
17.अपंग व्यक्तिंनी (PwBD) त्यांच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी केंद्र प्रशासकांशी संपर्क साधावा.
18.पुढील पानावर दिलेल्या सामाजिक अंतर परीक्षा संबधीच्या सूचना वाचा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents