केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 84,866 पदे रिक्त- नोकरीच्या संधी! | CAPF Recruitment 2023
CAPF Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
CAPF Recruitment 2023
CRPF आणि BSF यासारख्या 6 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPF) स्वीकृत पदांची एकूण संख्या 10 लाख 5 हजार 520 इतकी आहे. यातील 84,866 पदे रिक्त असल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल राज्यसभेत दिली आहे. मागील 5 महिन्यांमध्ये CAPF मध्ये 31,785 कर्मचाऱयांची भरती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मागील तीन वर्षांमध्ये सीआरपीएफ तसेच बीएसएफ यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील एकूण 436 जवानांनी आत्महत्या केली आहे. सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्समध्ये आत्महत्या तसेच सहकाऱयांच्या हत्या रोखण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी एका कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. 2022 मध्ये एकूण 135, 2021 मध्ये 157 आणि 2020 मध्ये 144 जवानांनी आत्महत्या केली असल्याचे राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल म्हटले आहे.
1,827 एनजीओंची एफसीआरए नोंदणी रद्द
सरकारने मागील 5 वर्षांमध्ये कायद्यांचे उल्लंघन करणाऱया 1,827 स्वयंसेवी संस्थांची एफसीआरए नोंदणी रद्द केली आहे. 2018-22 या कालावधीत अधिनियम आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याने 1,827 एनजीओंचे एफसीआरए नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. 10 मार्च 2023 पर्यंत एफसीआरए-नोंदणीकृत 16,383 एनजीओ होत्या असे त्यांनी सांगितले आहे.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
CAPF,
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल,
CAPF Recruitment 2023
Table of Contents