केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये ४५ टक्के पदे रिक्त!

CBIC Recruitment 2023

188

 

CBIC Recruitment 2023 Details 

CBIC Recruitment 2023 – As many as 44.77 per cent of the sanctioned class ‘A’ to ‘C’ cadre posts in the Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) are vacant. Experts in the field have raised the question of how the collection will be done across the country and how the Goods and Services Tax (GST) will be controlled. But 41,081 of the 91,740 sanctioned posts of officers and employees from Class A to Class C are still vacant in CBIC. The All India Federation of Customs, Central Excise and GST, SC/ST Employees Welfare Organisation has claimed that there is a huge tax evasion.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये ४५ टक्के पदे रिक्त!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डात (सीबीआयसी) मंजूर वर्ग ‘अ’ ते ‘क’ संवर्गातील ४४.७७ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे देशभरात वसुली होणार कशी व वस्तू व सेवा कर (जीएसटी) चोरीवर नियंत्रण मिळणार कसे, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांनी उपस्थित केला आहे.देशातील जीएसटीच्या महसुलात सातत्याने वाढ होत आहे. परंतु अद्यापही सीबीआयसीमध्ये वर्ग अ ते वर्ग क पर्यंतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची ९१ हजार ७४० मंजूर पदांपैकी ४१ हजार ८१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करचोरी होत असल्याचा दावा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम्स, सेंट्रल एक्साईज अँड जीएसटी, एससी/ एसटी इम्प्लॉईज वेल्फेअर ऑर्गनायझेशनने केला आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये ४५ टक्के पदे रिक्त!

App Download Link : Download App

सध्या देशभरात ‘सीबीआयसी’च्या अखत्यारित वर्ग अ- ६, ३९५ पदे, वर्ग ब (गॅझेटेड) २२,२००, वर्ग ब (नॉन गॅझेटेड) ३२,६०९, वर्ग क संवर्गातील ३०,५३६ अशी एकूण ९१,७४० पदे मंजूर आहेत. त्यापैकी वर्ग अ- ४,११२ पदे, वर्ग ब (गॅझेटेड)- १७,७२३, वर्ग ब (नॉन गॅझेटेड) १८,२१७ पदे, वर्ग क- १०,६०७, अशी एकूण ५०,६५९ पदे भरलेली तर वर्ग अ संवर्गातील- २,२८३ पदे, वर्ग ब (गॅझेटेड)- ४,४७७, वर्ग ब (नॉन गॅझेटेड) १४,३९२ पदे, वर्ग क- १९,९२९ अशी एकूण ४१,०८१ पदे रिक्त आहेत.

देशात बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणात १ लाख कोटीहून जास्तीची थकबाकी आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने ही थकबाकी वसूल होत नसून सेवेवरील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या विभागात स्वेच्छानिवृत्तीचे प्रमाण वाढल्याचा दावा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम्स, सेंट्रल एक्साईज ॲन्ड जीएसटी, एससी/ एसटी इम्प्लॉईज वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे करण्यात आला आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम