जाणून घ्या कलम 144 म्हणजे काय?


✔ सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केले जाते.

✔ 5 किंवा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध आणले जातात. यालाच जमावबंदी अथवा कर्फ्यू असं म्हणतात

✔ कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येतात.

✔ जमावबंदीचा आदेश लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच जिल्हा न्याय दंडाधिकारी देत असतात.

✔ कलम 144 चे पालन न केल्यास पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकते.

✔ जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्याला 1 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

✔ या आदेशाचा कालावधी हा 2 महिन्यापेक्षा जास्त असता काम नये, कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा जमावबंदी लागू केली जाऊ शकते.

✔ परंतु अत्यावश्यक काळात जर राज्य सरकारला वाटले तर याची अमंलबजावणी 6 महिण्यापर्यंत सुद्धा लागू केली जाऊ शकते.

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा