चालू घडामोडी सराव पेपर -02 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -02 जून 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -02 जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणते मंत्रालय माय लाईफ माय योगा स्पर्धा आयोजित करीत आहे?
Correct
Incorrect
आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालय भारतीय सांस्कृतिक संबंध विषयक परिषद (ICCR) संयुक्तपणे माय लाईफ माय योगा (जीवन योगा) ही व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धा आयोजित करीत आहे. योग केल्याने व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिवर्तनात्मक प्रभाव आणि येत्या 21 जूनला येणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संबंधित कार्यक्रम म्हणून स्पर्धेत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 31 मे 2020 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा जगभरातल्या सर्वांसाठी खुली आहे. दोन टप्य्यात ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेत त्या-त्या देशातले विजेते निवडले जातील आणि त्यानंतर विविध देशातल्या विजेत्यामधून जागतिक पारितोषिक विजेते निवडले जातील.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने रोजगार सेतुअॅप सादर केले?
Correct
Incorrect
परराज्यांमधून परतलेल्या कामगारांना रोजगाराच्या संधि उपलब्ध होण्यात मदत करण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेश सरकारने रोजगार सेतुअॅप सादर केले आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या खासगी अंतराळ संस्थेनी अंतराळवीरांसहीत पहिले खासगी प्रक्षेपक अंतराळात पाठविले?
Correct
Incorrect
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कडे क्रू ड्रॅगन अंतराळ यान 30 मे 2020 रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले, जे अमेरिकेच्या अंतराळवीरांना जवळपास एका दशकात अमेरिकेमधून पृथ्वीच्या कक्षेत नेण्यासाठीचे पहिले अभियान आहे आणि स्पेसएक्स या कंपनीच्या मालकीच्या प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण आहे. या मोहिमेत अमेरिकेच्या NASA संस्थेच्या दोन अंतराळवीरांना ISS वर पाठविण्यात आले. या यशस्वी मोहिमेमुळे व्यवसायिक अंतराळ प्रवासाचा मार्ग खुला झाला आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची विद्युत वित्त महामंडळ (PFC) याच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक (CMD) या पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
रवींदर सिंग ढिल्लोन यांची विद्युत वित्त महामंडळ (PFC) याच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक (CMD) या पदावर नियुक्ती झाली. ते या पदावर मे 2023 पर्यंत राहणार. ही नियुक्ती राजीव शर्मा यांच्या जागी झाली.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची लंडन शहरातल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम याच्या विश्वस्त मंडळावर निवड झाली आहे?
Correct
Incorrect
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी यादविंदर माल्ही यांची लंडन शहरातल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम याच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती केली आहे. यादविंदर माल्ही हे ऑक्सफोर्ड सेंटर फॉर ट्रॉपिकल फॉरेस्ट्स आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी बायोडायवरसीटी नेटवर्कचे संचालक देखील आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची पंतप्रधान कार्यालय याच्या संचालक पदावर नेमणूक झाली?
Correct
Incorrect
IAS अधिकारी मीरा मोहंती यांची पंतप्रधान कार्यालय याच्या संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती 1 मे 2021 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यत प्रभावी असणार आहे. सध्या त्या कॅबिनेट सचिवालयाचे संचालक आहेत.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणती संस्था “MSP आणि MFP याच्या मूल्य साखळी विकासाच्या माध्यमातून MFPची विपणन यंत्रणा” ही योजना राबविण्यासाठी केंद्रीय संस्था म्हणून नेमण्यात आली आहे?
Correct
Incorrect
आदिवासी कल्याण मंत्रालयाने “किमान आधारभूत किंमत (MSP) आणि दुय्यम वन उत्पादनाच्या (MFP) मूल्य साखळी विकासाच्या माध्यमातून MFPची विपणन यंत्रणा” या केंद्रीय पुरस्कृत योजनेंतर्गत अतिरिक्त दुय्यम वन उत्पादनांचा किमान हमी भावाच्या यादीमध्ये समावेश करण्याची आणि त्यांची किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करण्याची घोषणा केली आहे. भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) हे योजना राबविण्यासाठी केंद्रीय संस्था म्हणून नेमण्यात आले आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या संस्थेच्या संशोधकांना मन्नारच्या खाडीमध्ये दुर्मिळ स्कॉर्पियन मासा आढळला?
Correct
Incorrect
कोची (केरळ) येथील केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या संशोधकांना तामिळनाडूच्या सेतुकरई किनाऱ्याजवळ मन्नारच्या खाडीमध्ये दुर्मिळ स्कॉर्पियन मासा आढळला आहे. स्कॉर्पेनोस्प्सीस निगलेक्टा हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. या माश्यावर पाठीवर विषारी काटे आहेत आणि त्याच्यात रंग बदलण्याची क्षमता आहे.
हा शोध महत्त्वपूर्ण आहे कारण हा मासा भारतीय जलक्षेत्रात जिवंत असल्याचे प्रथमच आढळले आहे. -
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोण पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ पदावर आहेत?
Correct
Incorrect
व्हाइस अॅडमिरल अतुल कुमार जैन हे पूर्व नौदल कमांड चे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ पदावर आहेत. त्यांनी 28 मे 2020 रोजी विशाखापट्टनम येथे INS कलिंग या युद्धनौकेवर 2 मेगावाट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या देशात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाला नवव्या शतकातले सॅंडस्टोन पासून कोरलेले शिवलिंग सापडले?
Correct
Incorrect
व्हिएतनाम देशाच्या माय सोन येथे चाललेल्या संवर्धन प्रकल्पाच्या ठिकाणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाला नवव्या शतकातले सॅंडस्टोन (गाळाचा खडक) पासून कोरलेले शिवलिंग सापडले. हिंदू धर्मात शिवलिंग पूजले जाते.
Table of Contents