चालू घडामोडी सराव पेपर -04 जुलै 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -04 जुलै 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -04 जुलै 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsसूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना नोंदणीची सुलभ यंत्रणा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने विकसित केलेले उद्यम नोंदणी पोर्टल (डिजिटल व्यासपीठ) कार्यरत झाले आणि त्यामुळे उपक्रमांची/उद्योगांची वर्गवारी व नोंदणीची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. सोबतच, MSME मंत्रालयाने सुलभिकरणासाठी चॅम्पियन्स नियंत्रण कक्ष व DIC येथे एकल खिडकी प्रणाली स्थापन केली आहे. नवीन नोंदणी प्रक्रियेमुळे व्यवसाय सुलभिकरणाला प्रोत्साहन मिळणार आणि व्यवहारासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होणार. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, कागदरहीत आणि स्व-घोषणेच्या आधारे आहे. नोंदणीसाठी केवळ आधार क्रमांक आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे आणि या संदर्भात कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या देशात LPG व्यवसाय चालविण्यासाठी संयुक्त अरब अमिरात देशाच्या आरआर होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन सोबत अर्धोअर्धी तत्वावर एका संयुक्त उपक्रमाची स्थापना केली आहे? .
Correct
Incorrect
बांग्लादेशात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) व्यवसाय चालविण्यासाठी संयुक्त अरब अमिरात देशाच्या आरआर होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन सोबत अर्धोअर्धी तत्वावर एका संयुक्त उपक्रमाची स्थापना केली आहे. सोबतच इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) यांनी बांग्लादेशाच्या बेक्सिमको LPG या कंपनीसोबत करार केला आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या केंद्रशासित प्रदेश वा राज्याने पौधे लगाओ, पर्यावरण बचाओ अभियानाचा प्रारंभ केला?
Correct
Incorrect
दिल्ली सरकारने 2 जुलै 2020 रोजी पौधे लगाओ, पर्यावरण बचाओ अभियानाचा प्रारंभ केला. ही मोहीम 10 जुलै ते 26 जुलै पर्यंत चालणार आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsबिगर-बँकिंग वित्त संस्था आणि गृहकर्ज वित्त संस्थांची रोख भांडवलाची स्थिती सुधारावी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या विशेष तरलता योजनेसाठी भारत सरकारने किती रक्कम निर्धारित केली आहे?
Correct
Incorrect
देशातल्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज वित्त कंपन्यांना त्याच्या रोकड सुलभतेसाठी सरकारने 30 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यासाठी एक विशेष लिक्विडिटी योजना देखील जाहीर केली आहे. या योजनेचा गृह कर्ज देणाऱ्या कंपन्याना लाभ होणार. या निधीला सरकारची हमी असणार आहे. हा निधी भारतीय रिझर्व बँकेकडून दिला जाणार आहे. बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहकर्ज वित्त कंपन्या केवळ विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी या निधीचा उपयोग करू शकणार. त्यांच्या मालमत्तेचा विस्तार करण्यासाठी करू शकणार नाही.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकावासीला ‘2020 ग्रेट इमिग्रंट्स’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे?
Correct
Incorrect
राज चेट्टी आणि सिद्धार्थ मुखर्जी यांच्यासह आणखी 36 लोकांना ‘2020 ग्रेट इमिग्रंट्स’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार अमेरिकन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. राज चेट्टी हे न्यूयॉर्कच्या कार्नेगी कॉर्पोरेशनने हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. सिद्धार्थ मुखर्जी हे पुलित्झर पुरस्कारप्राप्त लेखक आणि ऑन्कोलॉजी चिकित्सक आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी CSIR संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ड्रग डिस्कवरी हॅकथॉन स्पर्धा आयोजित केली?
Correct
Incorrect
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ड्रग डिस्कवरी हॅकाथॉन 2020 याचा प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम मनुष्यबळ विकास मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांचा संयुक्त उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आकर्षित करण्यासाठी, हॅकेथॉन जगभरातले व्यवसायिक, प्राध्यापक, संशोधक आणि संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, औषधीनिर्मिती, वैद्यकीयशास्त्र, मूलभूत विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या विविध क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी खुले आहे. ही ऑनलाइन स्पर्धा तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोण प्रथम आभासी रेस अक्रॉस अमेरिका 2020 स्पर्धेत पोडियमवर स्थान मिळविणारा पहिला भारतीय ठरला?
Correct
Incorrect
लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे प्रथम आभासी रेस अक्रॉस अमेरिका 2020स्पर्धेत विजयी तिसर्या क्रमांकावर स्थान मिळविल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय अल्ट्रासायकलिंग शर्यतीत विजय मिळविणारा इतिहासातला पहिला भारतीय खेळाडू ठरला आहेरेस अक्रॉस अमेरिकाही एक सायकल शर्यत आहे ज्यामध्ये 12 दिवसांच्या निर्दिष्ट वेळेत अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते पूर्व किनाऱ्यापर्यंत 5000 किलोमीटरचे अंतर सायकलीने कापले जाते. यावर्षी प्रथमच ही घरच्याघरीच आयोजित केली गेली.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणती कार कंपनी जगातली सर्वात मूल्यवान कार कंपनी बनली आहे?
Correct
Incorrect
प्रसिद्ध उद्योगपती इलोन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला ही जगातली सर्वात मूल्यवान कार कंपनी बनली आहे. टेस्ला कंपनीचे एकूण भांडवल 1 जुलै 2020 रोजी 1,134 अब्ज डॉलर एवढे होते. त्यानंतर टोयोटा कंपनीचा क्रमांक लागतो.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsपाकिस्तानी लष्कराची प्रथम महिला लेफ्टनंट जनरल कोण आहे?
Correct
Incorrect
निगार जोहर या पाकिस्तानी लष्कराच्या प्रथम महिला लेफ्टनंट आहेत. त्या दलात लेफ्टनंट जनरल म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. ती पाकिस्तानी लष्कराची पहिली महिला शल्यचिकित्सक देखील आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsभारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी असलेल्या रेलगाडीचे नाव काय आहे?.
Correct
Incorrect
भारतीय रेल्वेने 2.8 किलोमीटर लांबी असलेली तब्बल 251 डब्यांची एक मालगाडी चालवण्याचा विक्रम केला आहे. शेषनाग ट्रेन’ असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या दोन स्थानकांच्यादरम्यान ही गाडी धावली. यासाठी रेल्वेने चार मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या आणि याला 9 विद्युत इंजिन जोडले होते. हा अनोखा प्रयोग माल वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी करण्यात आला.
Table of Contents