चालू घडामोडी सराव पेपर -06 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
[WpProQuiz_toplist162
चालू घडामोडी सराव पेपर -06 जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय खते मर्यादित याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली?
Correct
Incorrect
विरेंद्र नाथ दत्त यांनी 3 जून 2020 रोजी राष्ट्रीय खते मर्यादित (नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड) या सार्वजनिक कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्विकारला.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
2 जून 2020 रोजी पॅट्रिक पिचेट यांची ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणती व्यक्ती भारतीय उद्योग संघाचे (CII) नवे अध्यक्ष आहे?
Correct
Incorrect
2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या अध्यक्ष पदावर उदय कोटक यांची निवड झाली. उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विक्रम किर्लोस्कर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsवंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने स्वदेश / SWADES (स्कील्ड वर्कर्स अरायव्हल डाटाबेस फॉर एम्प्लॉयमेंट सपोर्ट) हा नवा उपक्रम सुरू केला आहे. हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, नागरी उड्डयण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. आतापर्यंत 57,000 हून अधिक लोक देशात परत आले आहेत. परदेशातून परत येणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्वदेश स्कील्स कार्ड भरणे आवश्यक आहे. हे कार्ड परत आलेल्या नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक उत्तम संधी आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर विकसित केला आहे?
Correct
Incorrect
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर शहरातल्या केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेतल्या (CSIR-CMERI) संशोधकांनी पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर विकसित केला आहे. या व्हेंटीलेटरची किंमत सुमारे 80 हजार ते 90 हजार रुपये इतकी आहे. अन्य रुग्णांच्या गरजांनुसार यामध्ये पुढेही सुधारणा केल्या जाऊ शकतात. या व्हेंटीलेटरचे सुटे भाग निरनिराळ्या उद्योगांमधून स्वतंत्रपणे तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे याचे प्रचंड उत्पादन हे अनेक उद्योगांना फायदेशीर ठरू शकते.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsअमेरी आईस शेल्फ हे ठिकाण कुठे आहे?
Correct
Incorrect
अंटार्क्टिकाच्या पूर्व किनाऱ्यावर अमेरी आईस शेल्फ या नावाचे एक ठिकाण आहे. नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च (NCPOR) या संस्थेच्या एका अभ्यासात संशोधकांनी ही भविष्यवाणी केली आहे की आईस शेल्फ चे क्षेत्रफळ 2021 सालापर्यंत 24 टक्क्यांनी वाढणार तर 2026 सालापर्यंत ते आणखी 24 टक्क्यांनी वाढणार.हिमनदी स्थिर ठेवण्यात आईस शेल्फमहत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पाण्यावर तरंगणाऱ्या बर्फाच्या लाद्या आईस शेल्फ म्हणून ओळखल्या जातात आणि हिमनदीला भूमीशी जोडतात
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणती व्यक्ती भारत सरकारच्या वतीने स्थापन केल्या जाणाऱ्या अधिकारप्राप्त सचिव गट (EGoS) याचे अध्यक्ष असणार आहे?
Correct
Incorrect
दिनांक 3 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत भारतात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारत सरकारची मंत्रालये तसेच विभागांमध्ये अधिकारप्राप्त सचिव गट (Empowered Group of Secretaries -EGoS) आणि प्रकल्प विकास विभाग (PDC) स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली. मंजूर करण्यात आलेल्या नव्या यंत्रणेमुळे वर्ष 2024-25 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 लक्ष कोटी डॉलर करण्याच्या भारताच्या निर्धाराला अधिक बळ प्राप्त होणार आहे.
भारतात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदाराना सुविधा आणि सहाय्य पुरवण्यासाठी त्याच बरोबर अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या क्षेत्रात विकासाला चालना देण्यासाठी अधिकारप्राप्त सचिव गट स्थापन करण्याला मंजुरी मिळाली. कॅबिनेट सचिव या गटाचे अध्यक्ष राहणार असून NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याचे सदस्य असणार.
गुंतवणूकयोग्य प्रकल्प विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय राखण्यासाठी प्रकल्प विकास विभागाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भारतात गुंतवणूक योग्य प्रकल्पात वाढ म्हणजेच पर्यायाने थेट परकीय गुंतवणुकीत वाढ व्हायला मदत होणार आहे. सचिवांच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित केंद्रीय मंत्रालयाच्या सहसचिव स्तरावरचे अधिकारी या विभागाचे प्रमुख असणार. -
Question 8 of 10
8. Question
1 points4 जूनला घेतलेल्या निर्णयानुसार पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?
Correct
Incorrect
पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत आणि भुटान दरम्यान सामंजस्य करार करण्याला 4 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमध्ये समानता, परस्पर व्यवहार आणि परस्पर लाभांच्या आधारावर पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्त्रोतांच्या व्यवस्थापन क्षेत्रात कायदे आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन दीर्घकालीन सहकार्य स्थापित आणि प्रोत्साहित करणे शक्य होणार. हा सामंजस्य करार स्वाक्षरी केल्याच्या तारखेपासून अंमलात येणार आणि दहा वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग ची पुनःस्थापना केली जाणार आहे?
Correct
Incorrect
दिनांक 3 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग (Pharmacopoeia Commission for Indian Medicine and Homoeopathy -PCIMH) याची पुनःस्थापना करण्याला मंजूरी दिली गेली आहे. PCIMH हे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत दुय्यम कार्यालय म्हणून काम करणार आहे. PCIM&H यासाठी 1975 सालापासून गाझियाबादमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय औषधपद्धती औषधसूची प्रयोगशाळा (PLIM) आणि होमिओपॅथिक औषधसूची प्रयोगशाळा (HPL) या दोन केंद्रीय प्रयोगशाळांचे त्यात विलीनीकरण करण्यात आले.आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांच्या परिणामांविषयी प्रमाणीकरण करून प्रभावी पद्धतीने त्यांचे नियमन व गुणवत्तेवर नियंत्रण असा उद्देश या निर्णयामागे ठेवण्यात आला आहे. आयुष प्रकारच्या औषधांचे प्रमाणीकरण विकसित होण्यास, तसेच औषधसूची व सूत्रे प्रकाशित करण्यास याचा उपयोग होऊ शकणार आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणती संस्था कोविड-19 विषाणूच्या विरोधात प्रतिजैविकांच्या विकासासाठी संग्रहात असलेल्या रासायनिक अवरोधक रेणूंची चाचणी घेणार आहे?
Correct
Incorrect
विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाने (SERB) हरयाणाच्या हिसार येथील राष्ट्रीय पशुवैद्यकीय प्रकार संवर्धन केंद्राच्या (ICAR-NCVTC) अभ्यासाला पाठिंबा मंजूर केला आहे ज्यात कोरोना विषाणू विरोधात प्रतिजैविकांच्या (अँटीव्हायरल्स) विकासासाठी त्यांच्या संग्रहात असलेल्या 94 लहान रासायनिक अवरोधक रेणूंची चाचणी केली जाणार आहे. हे रेणू सेल्युलर किनेसेस, फॉस्फेटसेस आणि एपिजेनेटिक नियामक जसे की हिस्टोन मिथाइल ट्रान्सफरेज, हिस्टीन डीएस्टाईलस आणि DNA मिथाइल हस्तांतरण प्रतिबंधित करतात.
कर्करोगामध्ये या प्रतिरोधकांचे वर्गीकरण योग्य प्रकारे दर्शविता येते तथापि, विषाणूच्या जीवन चक्रात त्यांची भूमिका माहित नाही. कोरोना विषाणू विरोधात क्रियाशील असणाऱ्या निवडक रेणूंचा संभाव्य औषध-प्रतिरोधक विषाणूंच्या निर्मितीच्या तपासणीसह त्यांच्या कृतीच्या आण्विक यंत्रणा अभ्यासात उपयोग होणार आहे. शास्त्रीयदृष्ट्या एखाद्या विषाणूजन्य प्रथिनावर थेट लक्ष्य ठेवून विषाणूविरोधी औषधे विकसित केली जातात.