चालू घडामोडी सराव पेपर -20 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -20 जून 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -20 जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी 21 वे समग्र प्रादेशिक केंद्र (CRC) याचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
दिव्यांग व्यक्तिचे कौशल्य वाढवणे, पुनर्वसन करणे आणि रोजगाराच्या संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने झारखंडच्या रांची जिल्ह्यातल्या खिजारी गावात उभारण्यात आलेल्या 21 व्या समग्र प्रादेशिक केंद्र (CRC) याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते उद्घाटन झाले
-
Question 2 of 10
2. Question
1 points75 व्या वार्षिक परिषदेच्या भूमीवर संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
Correct
Incorrect
सप्टेंबर 2020 महिन्यात नियोजित असलेल्या 75 व्या वार्षिक परिषदेच्या भूमीवर वोल्कन बोजकिर (तुर्की मुत्सद्दी) यांची संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या (UNGA) अध्यक्षपदी निवड झाली.याशिवाय, वर्ष 2021-22 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याचे नवनियुक्त तात्पुरते सदस्य म्हणून भारत, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे या राष्ट्रांची निवड झाली.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsक्लारा अँड द सन’ हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
नोबेल पारितोषिक विजेते काझुओ इशिगुरो हे ‘क्लारा अँड द सन’ हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक आहेत.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या शहरात जगातली सर्वात मोठी कोविड-19 रुग्णालय सुविधा उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
दिल्लीच्या राधा सोआमी अध्यात्मिक केंद्रात 10 हजार खाटांचे जगातली सर्वात मोठी कोरोनाव्हायरस रुग्णालय सुविधा उभारण्यात येत आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsऑटिस्टिक अभिमान दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
ऑटिझम या आरोग्य समस्येने पीडित असलेल्या लोकांबद्दल जागृती वाढविण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचा आदर करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 18 जून या दिवशी ऑटिस्टिक अभिमान दिन साजरा केला जातो. हा दिवस 2005 साली पहिल्यांदा अॅस्पाइज फॉर फ्रीडम या संस्थेनी साजरा केला होता.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेच्या नेतृत्वात वैश्विक पवन दिन निमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 15 जून या दिवशी विंडयुरोप आणि ग्लोबल विंड एनर्जी काऊंसिल (GWEC) या संस्थांच्या नेतृत्वात वैश्विक पवन दिन निमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो. या दिवशी पवन ऊर्जेविषयी जनजागृती केली जाते.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsसंयुक्त राज्ये अमेरिका देशाने कोणत्या आंतरराष्ट्रीय न्यायालयावर निर्बंध लादली आहेत?
Correct
Incorrect
संयुक्त राज्ये अमेरिका देशाने अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या सैन्याने केलेल्या संभाव्य युद्ध गुन्ह्यांच्या चौकशीत गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (ICC) याच्या अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांवर तसेच चौकशीत मदत पुरविणार्या इतरांची मालमत्ता आणि प्रवास बंदी यावर निर्बंध लादले.आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (ICC) द हेग (नेदरलँड) या शहरात मुख्यालय असलेले संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग असलेली स्थायी न्यायालयीन संस्था आहे. 1 जुलै 2002 रोजी याच्या कार्यास सुरुवात झाली होती.
-
Question 8 of 10
8. Question
1 points20 जून 2020 रोजी मोठ्या प्रमाणात राबवल्या जाणाऱ्या ग्रामीण सार्वजनिक बांधकाम योजनेचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
गावात परतलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारने गरीब कल्याण रोजगार अभियान ही प्रमुख ग्रामीण रोजगार व सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना देशात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 20 जून 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. बिहार राज्यातल्या तालीहार (बेल्दौल तालुका, खगारीया जिल्हा) या गावात या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या अभियानासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.125 दिवसांच्या या अभियानाची अंमलबजावणी मिशन मोडवर केली जाणार आहे. त्यात अत्यंत केंद्रिकृत, निर्धारित लक्ष्य लक्षात घेऊन 25 विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून एकीकडे स्थलांतरित मजुरांसाठी रोजगारनिर्मिती करणे आणि दुसरीकडे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उभारणे अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत. या अभियानासाठी, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन तृतीयांश स्थलांतरित मजूर समाविष्ट केले जाणार आहेत.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी नीरा आणि पामगुळ निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे?
Correct
Incorrect
खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) नीरा आणि पामगुळ निर्मितीसाठी एक अनोखा प्रकल्प सुरू केला आहे. या क्षेत्रात देशातली रोजगार निर्मितीची क्षमता अधिक आहे. नीराला सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच आदिवासींना आणि पारंपारिक फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी दिनांक 16 जून 2020 रोजी महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू येथे हा प्रकल्प सुरू झाला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे 400 स्थानिक पारंपारिक फासेपारधींना थेट रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.सूर्योदयापूर्वी पाम झाडापासून काढलेली नीरा हे सर्वाधिक पोषक तत्व असलेले आरोग्यदायी पेय म्हणून भारतातील अनेक राज्यांमध्ये याचे सेवन केले जाते. तथापि संस्थागत बाजारपेठेचे तंत्र नसल्यामुळे नीराचे व्यवसायिक उत्पादन व मोठ्या प्रमाणात विपणन अद्याप सुरू झालेले नाही.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsपद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले आय.एम. विजयन कोणत्या खेळप्रकाराशी संबंध ठेवतात?
Correct
Incorrect
फुटबॉलपटू आय.एम. विजयन यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) देशातला चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्मश्रीसाठी शिफारस केली.
Table of Contents