चालू घडामोडी सराव पेपर 22मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 22मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 22मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या कारखान्यात भारतीय रेल्वेचे स्वदेशी निर्मित सर्वाधिक शक्तिशाली लोकोमोटिव्ह तयार करण्यात आले?
Correct
Incorrect
बिहारमधल्या मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड (MELPL) या कारखान्यात 12000 अश्वशक्ती क्षमता असलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रेल्वे इंजिनची निर्मिती करण्यात आली आहे. या इंजिनाची निर्मिती मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. या इंजिनाला WAG12 क्रमांक 60027असे नाव आणि नंबर देण्यात आला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून या इंजिनाचे 18 मे 2020 रोजी पहिल्यांदा व्यवसायिक पातळीवर यशस्वी संचालन करण्यात आले. या निर्मितीनंतर स्वदेशामध्ये उच्च अश्वशक्तिच्या इंजिनाची निर्मिती करणाऱ्या सहा प्रतिष्ठित देशांच्या समूहामध्ये आता भारतही सहभागी झाला आहे. तसेच संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच ब्रॉड गेज रेल्वे लाइनवर उच्च अश्वशक्तीच्या इंजिनाचे संचालन भारताने केले आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsभारत सरकारकडून 2 दशलक्ष डॉलर एवढी मदत प्राप्त करणाऱ्या UNRWA या संघटनेचा पाठिंबा कोणत्या देशातल्या निर्वासितांना आहे
Correct
Incorrect
पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी पूर्वेजवळ काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघ मदत कार्य संस्था (UNRWA) याला भारत सरकारने 2 दशलक्ष डॉलर एवढी मदत दिली गेली आहे. हा निधी महामारीच्या काळात आरोग्य सेवा, शिक्षण, मदत आणि सामाजिक सेवांसाठी खर्च केला जाणार आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsछोट्या व्यवसायांना मदत करण्याच्या हेतूने फेसबुक कंपनीने सादर केलेल्या ई-कॉमर्स उपक्रमाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
छोट्या व्यवसायांना मदत करण्याच्या हेतूने फेसबुक कंपनीने शॉप्स या नावाने एक ई-कॉमर्स उपक्रम सादर केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसायांना कंपनीच्या व्यासपीठावर आणि इंस्टाग्राम यावर मोफत डिजिटल दुकान उघडता येणार.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणता देश हा प्रथम देश ठरला ज्याने कामाच्या ठिकाणी वावरण्यासाठी डिजिटल ईम्युनिटी पासपोर्ट सुविधा सादर केली?
Correct
Incorrect
एस्टोनिया हा जगातला प्रथम देश ठरला ज्याने कामाच्या ठिकाणी वावरण्यासाठी डिजिटल ईम्युनिटी पासपोर्ट सुविधा सादर केली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे लोकांच्या प्रतिकारशक्तीविषयीची माहिती मिळवली जाते आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची खात्री केली जाते.
-
Question 5 of 10
5. Question
1 points2020 साली जागतिक मापनशास्त्र दिनाची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
दरवर्षी 20 मे या दिवशी जागतिक मापनशास्त्र दिन साजरा केला जातो. 2020 साली मेजरमेंट्स फॉर ग्लोबल ट्रेड या संकल्पनेखाली हा दिवस पाळला गेला. उत्तम जागतिक व्यापारामधले मापन विज्ञानाचे महत्त्व याविषयी जागृती वाढविण्यासाठी हा दिवस पाळला गेला. 20 मे 1875 रोजी 17 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी मीटर करारनामा यावर स्वाक्षरी केली होती. त्या घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय वजन व माप विभाग (BIPM) आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर मापनशास्त्र संस्था (OIML) यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा करण्यात आला.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
भारत देश 2020-21 या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीचे अध्यक्षपद भूषविणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे मंडळाचे नवे अध्यक्ष असतील. भारत जापानकडून पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. कार्यकारी मंडळामध्ये 34 सदस्यांचा समावेश आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsपरीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अॅप नाव काय आहे?
Correct
Incorrect
राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) याच्या कक्षेत असलेल्या JEE, NEET सारख्या परीक्षांसाठी उमेदवारांना सराव करण्यात मदत व्हावी यासाठी NTAने नॅशनल टेस्ट अभ्यास नावाचे एक नवीन मोबाइल अॅप तयार केले. याद्वारे विद्यार्थी खोटी परीक्षा देणार आणि त्यांची तयार बघणार.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsरेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये रेल-बॉट हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?
Correct
Incorrect
दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने रेल-बॉटहे रोबोटिक उपकरण विकसित केले आहे. हे रोबोटिक उपकरण ऑडिओ आणि व्हिडिओने दुतर्फा संप्रेषणासाठी वापरले जाते आणि रूग्ण आणि रुग्णालयातल्या कर्मचार् यांमधील रेकॉर्डिंगसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?
Correct
Incorrect
दिलीप उम्मेन यांची दोन वर्षांच्या मुदतीसाठी भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. दिलीप उम्मेन हे आर्सेलर मित्तल निप्पॉन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि त्यांनी टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी.व्ही. नरेंद्रेंद्र यांची जागा घेतली.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश सुकून – कोविड-19 बीट द स्ट्रेस नावाने एक उपक्रम राबवित आहे?
Correct
Incorrect
जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश सुकून – कोविड-19 बीट द स्ट्रेस नावाने एक उपक्रम राबवित आहे. महामारीमुळे झालेल्या कोंडीमुळे उद्भवणाऱ्या मानसिक अस्थिरतेवर मात करण्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.
Table of Contents