कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना 2 एकर ओलीताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करुन देऊन त्यांची अर्थिक उन्नती व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी सदर योजना राबविली जाते.
योजनेच्या प्रमुख अटी :
- दर योजना 1 ते 13 अटी शर्तीच्या अधिन राहून राबविण्यात येते त्यापैकी महत्वाच्या अटी खालीलप्रमाणे –
• लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.
• या योजनेंतर्गत लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 60 वर्ष असावे.
• भूमिहीन शेतमजूर परिवक्ता स्त्रिया / विधवा स्त्रिया यांना प्राधान्य देण्यात यावे.
आवश्यक कागदपत्रे :
▪ दारिद्रयरेषेखालील यादीत नाव असणारे रेशन कार्ड.
▪ जातीचा दाखला.
▪ शाळेचा दाखला.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
2 एकर ओलीताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू शेतजमीन 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येते.
या ठिकाणी संपर्क साधावा :
संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय.