Dinvishesh : 28 July | दिनविशेष : 28 जुलै | Read Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Dinvishesh 28 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची या पेज वर देण्यात आली आहे. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २८ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. पोलीस भरती, सरळसेवा भरती , महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 28 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
१९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८३)
१९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)
१९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.
१९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.
१९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.
१९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च २०१३)
१९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.
Dinvishesh Death on 28 जुलै : मृत्यू
४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)
१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.
१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)
१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.
१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)
१९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)
१९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.
१९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.
Dinvishesh Important 28 जुलै : महत्वाच्या घटना
१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
१९४३: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.
१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.
१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.
१९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.
१९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.
२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents