दिनविशेष : ९ एप्रिल | Dinvishesh April 9

Dinvishesh April 9

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
390

Dinvishesh April 9

९ एप्रिल  : जन्म

Dinvishesh April 9

१३३६: मंगोल सरदार तैमूरलंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
१७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.
१८२८: समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)
१८८७: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५०)
१८९३: बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
१९२५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९५)
१९३०: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.
१९४८: हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म.

९ एप्रिल  : मृत्यू

Dinvishesh April 9

इ.स. पूर्व ५८५: जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पूर्व ७११)
१६२६: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १५६१)
१६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.
१९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.
१९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. (जन्म: २२ जून १९०८)
२००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)
२००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२१)
२००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९२६)
२००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.

९ एप्रिल : महत्वाच्या घटना

Dinvishesh April 9

१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.

 

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम