आर्थिक सर्वेक्षण 2019-20 ची ठळक वैशिष्ट्ये

0 1

आर्थिक सर्वेक्षण 2019-20 ची ठळक वैशिष्ट्ये

 

 • केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2019-20 सादर केले. या सर्वेक्षणाची

ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

 • 2020-21 मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन 6 ते 6.5 टक्केदरम्यान राहील असा अंदाज आहे.
 • 2019-20 च्या उत्तरार्धात स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होण्याची शक्यता, पहिल्या पूर्वार्धात 5 टक्के विकास दर राहील असा अंदाज व्यक्त
  आगामी आर्थिक वर्षात कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर 2.8 टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू वर्षात कृषी वाढीचा दर 2.9 टक्के राहील, असा अंदाज आहे.
 •  भारतीय शेतीला व्यावसायिक शेतीमध्ये परिवर्तीत करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार औद्योगिक क्षेत्राने 2018-19 मधील 5 टक्क्यांच्या तुलनेत 2019-20 (एप्रिल ते नोव्हेंबर) मध्ये 0.6 टक्के वाढ नोंदवली.
 • 2014 पासून चलनफुगवट्याच्या दर स्थिर होत आहे. 2014-19 दरम्यान बहुतांश आवश्यक वस्तूंच्या किंमतीत घट झाली.
 • 2019-20 च्या सुरूवातीच्या आठ महिन्यात महसूल संकलनात गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवली गेली.
 • 2019-20 मध्ये (डिसेंबर 2019 पर्यंत)जीएसटी मासिक संकलनाने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला.
 • 2018-19 (एप्रिल ते डिसेंबर 2018) मधील 3.7 टक्क्यांच्या तुलनेत ग्राहक किंमत निर्देशांक 2019-20 मध्ये (एप्रिल ते डिसेंबर 2019) 4.1 टक्क्यांपर्यंत वाढला.
 • घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत चलनफुगवट्याचा दर 2018-19 मधील (एप्रिल ते डिसेंबर 2018) 4.7 टक्क्यांच्या तुलनेत 2019-20 मध्ये (एप्रिल-डिसेंबर 2019)1.5 टक्क्यांपर्यंत खाली आला.
 • सर्वसमावेशक विकासासाठीच्या सुरचित उपाययोजनांच्या माध्यमातून शाश्वतता आणि आर्थिक विकासाची सांगड घालण्याचा भारताचा प्रयत्न. जगातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा कार्यक्रम हाती घेतला.
 • भारत हा चीन नंतर दुसरा सर्वात मोठा उदयोन्मुख हरित रोखे बाजारपेठ असलेला देश चालू खात्यातील तूट कमी झाली, परकीय चलनसाठा समाधानकारक. थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह आणि परदेशातून भारतात पाठवल्या जाणाऱ्या निधीत वाढ. परकीय चलनसाठा 461 अब्ज अमेरिकन डॉलर्सउत्पादित वस्तूंची भारताने केलेल्या निर्यातीत 13.4 टक्के वाढ तर सर्व वस्तूंच्या निर्यातीत 10.9 टक्के वाढउत्पादित वस्तूंच्या आयातीत 12.7 टक्के वाढ
 • सर्वात जास्त निर्यात झालेल्या वस्तू. पेट्रोलियम उत्पादन, मौल्यवान खडे, औषधे, सोने आणि अन्य मौल्यवान धानू2019-20 मध्ये सर्वात जास्त निर्यात झालेले देश अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि हाँगकाँगसर्वात जास्त आयात वस्तू कच्चे पेट्रोलियम तेल, सोने, कोळसा, कोकनिर्मित वस्तूंचा अतिरिक्त व्यापार 0.7 टक्के तर एकूण वस्तूंचा व्यापार प्रतिवर्ष 2.3 टक्केभारताने सर्वात जास्त आयात चीनमधून आणि त्या खालोखाल अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाकडून केली उदारीकृत क्षेत्रांने सर्वात जलद लक्षणीय वाढ नोंदवली.
 • 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या आकांक्षा प्रामुख्याने पुढील बाबींवर अवलंबून असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
  संपत्ती निर्माण करण्यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठेच्या शक्तीचा वापर करण्यासाठी उद्योगाभिमुख धोरणाला प्रोत्साहनविशिष्ट खासगी हित जपणाऱ्या धोरणापासून फारकत
 • जागतिक बँकेनुसार नवीन कंपन्यांच्या निर्मितीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. 2018 मध्ये 1.24 लाख नवीन कंपन्या उभारण्यात आल्या.
  उत्पादन, पायाभूत किंवा कृषी क्षेत्राच्या तुलनेत सेवा क्षेत्रात नवीन कंपन्यांची निर्मिती लक्षणीय आहे
 • भारताला चीनप्रमाणे कामगाराभिमुख आणि निर्यात वाढवण्याची अभूतपूर्व संधी असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. ‘जागतिक फायद्यासाठी भारतात संघटीत व्हा अर्थात Assemble in India for the world’ चे मेक इन इंडियामध्ये एकात्मिकरण करून भारत पुढील गोष्टी करू शकतो.
  निर्यात बाजारपेठेतील हिस्सा 2025 पर्यंत 3.5 टक्क्यांनी आणि 2030 पर्यंत 6 टक्क्यांनी वाढवणे
 •  2025 पर्यंत 4 कोटी आणि 2030 पर्यंत 8 कोटी उत्तम वेतन देणाऱ्या रोजगारांची निर्मिती
 •  ही संधी साधण्यासाठी चीनने वापरलेल्या धोरणाचे अनुकरण करण्याची सूचना सर्वेक्षणात केली आहे.
 •  नेटवर्क उत्पादनसारख्या कामगाराभिमुख क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्राविण्य प्राप्त करणे
 •  नेटवर्क उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर एकत्रितरित्या कार्यावर अधिक भर देणे
 •  श्रीमंत देशांमधील बाजारपेठांना प्रामुख्याने निर्यात करणे
 • बिपीसिएलमधील सरकारच्या 53.29 टक्के हिस्साच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीतून राष्ट्रीय संपत्तीत 33 हजार कोटी रुपयांची वाढ झाली
  उदारीकरणानंतर सर्जनशील अडथळ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: