भूगोल दिन’ कधी साजरा केला जातो

  • नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा 1987 पासून ‘भूगोल साक्षरता आठवडा’ साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर भारतात 1996 पासून 14 जानेवारी (मकर संक्रमणदिन) हा ‘भूगोल दिवस’ साजरा केला जातो.
  • 1987 पासून अमेरिकेमध्ये राष्ट्रीय भूगोल संघटना भौगोलिक साक्षरता वाढवण्यासाठी शाळा, संस्था, विविध संघटना यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.
  •  महत्व : विद्यार्थी व समाजात भौगोलिक साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
  • ‘भारतीय खगोलशास्त्र’ हे अति प्रगल्भ असे शास्त्र असून प्राचीन काळापासून भारतीयांचा यावर विशेष अभ्यास व पगडा आहे. खगोलशास्त्र ही भूगोलाची एक शाखा म्हणता येईल.
  • भूगोलावर आधारित ग्रह, तारे, नक्षत्र, राशी व पंचांगचा सखोल व सविस्तर अभ्यास आपल्या पूर्वजांनी केलेला असून आजच्या विज्ञानाच्या 21 व्या शतकातही आपण पूर्वी तयार केलेल्या पंचांग व खगोलीय गणितांचाच वापर करतो.

 अभ्यासकांसाठी मार्गदर्शक :

  • लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लिहिलेला ‘आरायन’ हा ग्रंथ आजही खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत आहे.
  • मानवी भूगोलामध्ये पर्यावरणाचा प्रभाव व उपयोग, मानवनिर्मित संसाधने, संपत्ती व पर्यावरणाचा मानवावरील समग्र परिणाम याचा अभ्यास केला जातो. तर प्राकृतिक भूगोलामध्ये सजीव, वातावरण, जमीन, पाणी, भूरचना व त्यांचा परस्परसंबंध यांचा सातत्याने अभ्यास केला जातो.
  • भूगोल दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच जागरुक होऊन नव्या जगातील नव्या समस्यांचा विचार करून पर्यावरणीय दृष्टिकोनातून व मानवाच्या शाश्‍वत प्रगतीसाठी प्रयत्न करूयात…!

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा