भूगोल – संक्षिप्त

511

आज आपण भूगोल या विषयाच्या अभ्यासाची रणनीती बघणार आहोत. भूगोल हा विषय संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे .त्या दृष्टीने घेतलेल्या महत्वाच्या बाबींचा संक्षिप्त आढावा .

 

 1.    २००१च्या जनगणनेनुसार राज्यात दर हजार पुरुषांच्या मागे ९२५ स्त्रिया आहे. हे प्रमाण २००१ साली ९२२ स्त्रिया असे होते.
 2.    २०११ च्या जनगणनेनुसार ५४.७७ % लोकसंख्या ग्रामीण भागात तर ४५.२३% लोकसंख्या नागरी भागात राहते.
  तर सन २००१च्या जणगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या ५७.६०% तर शहरी लोकसंख्या ४२.४० % इतकी होती
 3.   भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी ९.३६ % भाग म्हणजे एक दशांश हिस्सा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापकी ९.५८ % एवढा हिस्सा महाराष्ट्राला आला आहे.
 4. देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्रात आहे.
 5. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतात आहे. तर तोरण माळ हे नंदुरबार जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगररांगेत स्थित आहे.
 6.  चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे.
 7.   मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे.
 8.  कृष्णेच्या खोऱ्यात बॉक्साइट हे खनिज सापडते.
 9.  वर्धा व वैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला आहे.
 10.   उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.
 11.  प्राकृतिक रचना ही महाराष्ट्रातील पर्जन्यावर परिणाम करणारे सर्वात मोठे घटक आहे.
 12.   महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर या ठिकाणी आढळून येते.
 13.     महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते.
 14.  ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळून येते
 15.   महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात.
 16.    अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे.
 17.    िठबक सिंचनामुळे ३० ते ६० % पाण्याची बचत होऊन त्यामुळे २५ ते ४० % अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.
 18.   महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विहिरी अहमदनगर व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र घनतेचा विचार करता सांगली व सोलापूर जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.
 19.    नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनात अधिक प्रगती झालेली आढळून येते.
 20.   कोयना प्रकल्पअंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले आहे.
 21.  मेरीनो जातीच्या मेंढय़ा या लोकरीसाठी उत्तम असतात.
 22.  सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण खिलार बलांचे पदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
 23. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.
 24. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे.
 25.    महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी इचलकरंजी येथे आहे.
 26.   हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
 27. कोकण रेल्वेचा सर्वात लांब पुल शरावती नदीवर आहे.
 28.    न्हावाशेवा  हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणकीकृत बंदर आहे.
 29.   महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे.
 30.  महाराष्ट्रात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींमधील प्रमाण हजार पुरुषांमागे ८८३ स्त्रिया असे आहेत.
 31.  पितळ खोरे लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.
 32. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.
 33. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
 34.   १ मे १९७८ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.
 35.   बाबा आमटे यांनी अपंग व कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेले केंद्र हेमलकसा असून हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहे.
 36.   गडचिरोली हा जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे.
 37.  चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोळसाच्या खाणी व औष्णिक विद्युत केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
 38.   चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाली येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे
 39.   भोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र वर्धा जिल्ह्यात आहे.
 40.  ऊनकेश्वर, यवतमाळ या जिल्ह्य़ात गरम पाण्याचे झरे आढळतात.
 41.  लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
 42.    अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन १ जुल १९९८ रोजी वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली.
 43.   संत तुकडोजी महाराजांची समाधी तसेच संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज मोजरी अमरावती या जिल्ह्यात आहे.
 44.    अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागात तिखाडी नावाचे गवत आढळते या गवतापासून रोसा हे तेल बनवले जाते.
 45. औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून हे ठिकाण िहगोली जिल्ह्यात आहे.
 46.    १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन िहगोली जिल्ह्याची निर्मिती झाली.
 47.      िहगोली जिल्ह्यातील वनांमध्ये सुगंधी व औषधी तेल आढळते.
 48.    हेमांडपती शिल्पाचा नमुना असलेले तुळजाभवानीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
 49. औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली.
 50. जाम हे ठिकाण समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे.
 51. औरंगाबाद जिल्ह्यातील पठण तालुक्यात आपेगाव हे ठिकाण संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे.
 52.  संत एकनाथ महाराजांची समाधी पठण येथे आहे.
 53.  जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी औरंगाबाद या ठिकाणी आहे.
 54. एक जुल १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.
 55.  नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे म्हणून याला आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 56.   नंदुरबार या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
 57.    फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे  हे ठिकाण जळगाव भुसावळ जवळ आहे.
 58.     प्रवरा नदीच्या काठी दायमाबाद या ठिकाणी ताम्रपाषाण काळातील काही अवशेष सापडतात.
 59.   महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस अ‍ॅकॅडमी नाशिक येथे आहे.
 60.    गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा मठ असून हे कोल्हापूर येथे आहे.
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम