MPSCExams.com
One Place for All Exams Notes

PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण भूगोल [भारत व महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह ]

320

महाराष्ट्राचा भुगोल

महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार :- १५अंश ०८ उत्तर ते २२ अंश ९१ उत्तर अक्षांश. (हवामानाचा अंदाज)

महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार :- ७२ अंश ०६ पुर्व ते ८० अंश ०९ पुर्व रेखांश. (प्रमाणवेळ ठरविण्यसाठी)

भारताची प्रमाणवेळ अलाहाबाद जवळील मिर्झापुर, उत्तरप्रदेश या गावातुन जाण्या-या रेखावृत्तावरुन ठरविता.

कर्कवृत्त भारताच्या ०८ राज्यांतुन जाते. ते खालीलप्रमाणे

 1. गुजरात [G]
 2. राजस्थान [R]
 3. मध्यप्रदेश [M]
 4. छत्तीसगड [C]
 5. झारखंड [Z]
 6. पश्चिम बंगाल [PB]
 7. त्रिपुरा [T]
 8. मिझोरोम [M]

Chronology : GR-MC-ZPBTM

 •  महाराष्ट्राचे क्षेत्रफळ :- 03,07,713 चौ किमी एवढे आहे.
 •  भारताच्या एकुण क्षेत्रफळापैकी 09.36 टक्के क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे.
 • 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 72 हजार 972 एवढी आहे.
 • भारताच्या एकुण लोकसंख्येपेकी 09.29 टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे.
 • 2001 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ०९.४२ टक्के एवढे होते ते आता कमी झाले आहे.
 • महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी 700 किमी एवढी आहे. तर पुर्व-पश्‍चिम लांबी 800 किमी एवढी आहे.
 • महाराष्ट्रास 720 किमी एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी जिल्हयाला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे.
 • महाराष्ट्राचे स्थान भारताच्या पश्‍चिमेस अरबी समुद्रास लागुन आहे.

 महाराष्ट्राच्या शेजारी राज्य

 • उत्तरेस मध्यप्रदेश
 • ईशान्येस व पुर्वेस छत्तीसगढ
 • अग्नेयेस तेलंगाना,
 • दक्षिणेस गोबा व कर्नाटक
 • पश्‍चिमेस आरबी समुद्र
 • वायव्य बाजुस गुजरात व दादरा नगर हवेली हे केद्रशाशीत प्रदेश आहे.
 • दिव-दमण हा केंद्रशासीत प्रदेश महाराष्ट्राला लागुन नाही. तो पुर्णतः गुजरात मध्येयेतो.
 • महाराष्ट्रास सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश ची व सर्वात कमी सीमा गोव्या राज्याची लागलेली आहे. 
 • महाराष्ट्रात एकुण ३५ जिल्हे
 • ३५७ तालुके
 • २७ हजार ९०६ ग्रामपंचायती आहेत.
 • २३ महानगर पालिका आहेत
 • ३० मे २०१९० रोजी ”वसई विरार” जिल्हा ठाणे हि २३ वी महानगर पालीका
 • अस्तित्वात आली.
 • २०१९ मध्ये चंद्रपुर, परभणी व लातुर या ०३ नवीन महानगर पालिकांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
 • महाराष्ट्रात सध्या २२९ नगर परीषदा आहेत. आलीकडेच राज्यामध्ये ९९५ नगर परीषदांच्या सार्वत्रिकनिवडणुका झाल्या. 

NOTS :- राज्य घटनेच्या 110 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य शासनाने या झालेल्या निवडणुकौंमध्ये महीलांना ५० टक्के आरक्षण प्रथमच दिले आहे. 

नगर पंचायती ०५ आहेत

 1. शिडी जि नगर
 2. कनकवली जि सिंधुदर्ग
 3. दापोली जि रत्नागिरी
 4. केज जि बीड
 5. मलकापुर जि. सातारा. 

 महाराष्ट्रात एकुण ०७ कटक मंडळे आहेत. भारतामध्ये एकुण ६२ कटक मंडळे आहेत.

 1. औरंगाबाद
 2. कामठी (नागपूर)
 3. अहमदनगर
 4. देहू
 5. खडकी
 6. पुणे कॅम्प
 7. देवळाली 
 • महाराष्ट्रात जिल्हा परीषद ३३ आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना ग्रामीण परीक्षेत्र जोडले नसल्याने येथे जिल्हा परीषदा नाहीत.
 • १९९९ मध्ये भारतातील ”पहीला पर्यटन जिल्हा” म्हणुन सिंधुदुर्ग या जिल्हाला जाहीर करण्यात आले आहे.

 महाराष्ट्रातील प्रशासकिय ०६ विभाग :-

कोकण  : मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

नाशिक : नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार

औरंगाबाद : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना व हिंगोली

पुणे : कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली

नागपूर : भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व गोंदिया , नागपुर

अमरावती : अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशिम

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

 • २०११ च्या देशातील ९५ व्या जनगणनेनुसार ठाणे शहर हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे.
 • पंचायत समिती ३३५ एवढया आहेत. 

महत्वाचे :

 • महाराष्ट्राची राजधानी-मुबई
 • उपराजधानी-नागपुर
 • पर्यटन राजधानी-ओरंगाबाद
 • सांस्कृतीकराजधानी-पुणे
 • ऐतीहासीक राजधानी-कोल्हापुर 
 • स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना 01 मे 1960 या दिवशी झाली
 • 01 मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” व”जागतिक कामगार दिन” म्हणुन साजरा केले जाते.
 • स्वतंत्र महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते ब पहीले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे हे होते.
 • स्वतंत्र महाराष्ट्राचे पहीले राज्यपाल श्रीप्रकाश हे होते.
 • महाराष्ट्राच्या विधान सभेचे पहीले सभापती व देशाच्या लोकसभेचेही पहीले सभापती ग.वा. मावळणकर हे होते.
 • विधान परीषदेचे पहीले सभापती वि. स. पागे हे होते.
 • स्वतंत्र महाराष्ट्राचे पहीलेमहसुल मंत्री वसंतराव नाईक हे होते.

प्राकृतीक विभाग

महाराष्ट्रामध्ये एकुण ०३ प्राकृतीक विभाग पडतात.

 1. कोकण किनारपट्टी
 2. पश्‍चिम घाट / सह्याद्री
 3. दख्खनचे पठार / महाराष्ट्र पठार / देश पठार

कोकण किनारपट्टी

 • सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट, चिंचोळ्या सखल भागास ‘”कोकण”असे म्हणतात.
 • कोकणास पुवी या शब्दाचे प्राचीन नाव ” अपरान्त” या नावने ओळखले जात होते.

 निर्मिती : महाराष्ट्राच्या पश्‍चिमेस ब अरबी समुद्रास लागुन असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तर भंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली आहे.

 कोकणाचे क्षेत्रफळ :

 • कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी ७२० किमी एवढी आहे.
 • उत्तरेस दमण गंगा नदीपासुन दक्षिणेस तेरेखोल नदी पर्यंतचा प्रदेश कोकणाने व्यापलेला आहे.
 • पश्‍चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्ब सारखी नसुन कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी ३० ते ६० किमी आहे.
 • उत्तर भागामध्ये ही रुंदी ९० ते ९५ किमी एवढी आहे तर दक्षिणेकडे ही रुंदी ४० ते ४६ किमी एवढी रुंद आहे.
 • कोकणाची रुंदी उत्तरेकडुन दक्षिणेकडे निमुळती होत गेल्याचे दिसुन येते.
 • उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणची रुंदी १९०० किमी एवढी आढळते.
 • उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.
 • कोकणाची भोगोलीक क्षेत्रफळ ३०,३९४ चोकिमी एवढे आहे.

उपविभाग :

कोकणाचे ०२ उपविभाग पडतात.

 1. उत्तर कोकण
 2. दक्षिण कोकण. 
 • उत्तर कोकण मध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड जिल्हयाचा समावेश होतो तर दक्षिण कोकण मध्ये रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयांचा समावेश होतो.
 • उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण अधीक खडकाळ व डोंगराळ असुन या विभागात शहरी वस्ती कमी आढळते.
 • कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्‍चिमेकडुन पुर्वे कडे वाढत जाते. पश्‍चिमेकडील अरबी समुद्राच्यालगत असलेल्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. त्याची समुद्र सपाटी पासुनची उंची फार कमी आहे.
 • खलाटीच्या पुर्वेस असलेल्या डोंगराळ भागास “वलाटी” असे म्हणतात.

 कोकणातील खाड्या :

 • कोकणातील नद्या ह्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात व पश्‍चिमेकडील सखल भागात वाहत जावुन अरबी समुद्रास मिळतात.
 • भरती चे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्याभागास “खाडी” असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.
 • या खाड्यांचा उत्तरेकडुन दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.
 1. डहाणुची खाडी, जि. ठाणे
 2. दातोबऱ्याची खाडी, जि. ठाणे
 3. वसईची खाडी, जि. ठाणे
 4. धरमतरची खाडी, जि. रायगड
 5. रोह्याची खाडी, जि. रायगड
 6. राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी
 7. बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी
 8. दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी
 9. जयगड, जि. रत्नागिरी
 10. विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग
 11. तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग

 कोकणातील किल्ले : कर्नाळा, प्रबळगड, सरसगड, लिंगाणा, सुधागड, जि. रायगड

 महाराष्ट्रातील बंदरे :

 • महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुंबई हे महत्वाचे नैसर्गिक व आंतरराष्ट्रीयबंदर आहे.
 • भारताचा मोठ्याप्रमाणात व्यापार मुंबई या बंदरावरुन चालतो. मुंबई या बंदरावरील ताण कमी करण्यातसाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट हे नवीन बंदर रायगड जिल्ह्यातील न्हावाशेवा १९८९ मध्ये उभारण्यात आले आहे.
 • मुंबईच्या दक्षिणेस अलीबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगूर्ला या सारखी बंदरे आहेत.
 • या बंदरांची परस्परामंध्ये बाहतुक चालते. महाराष्ट्रात सध्या लहान मोठी एकुण ४९ बंदरे आहेत.
 • कोकण किनारपट्टीजबळ अरबी समुद्रामध्ये सापडलेला “बॉम्बे हाय” हा खनिज तेल साठा आहे.
 • १९६९ मध्ये भारतातील पहीला अणुसंशोधन केंद्र तारापुर येथे स्थापन करण्यात आला आहे. तारापुर येथेचतेल शुद्धीकरण केले जाते.
 • भारतातील सर्वात पहीला तेलशुद्धीकरण प्रकल्प हा दिग्बोई, आसाम येथे १९०३ मध्ये सुरु करण्यात आला. 

सह्याद्री पर्वत / पश्‍चिम घाट :

 • भारताच्या पश्‍चिम किनार पट्टीस सह्याद्री पर्वत समांतर आहे. हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्‍चिम सीमा निश्‍चीत करतो.
 • उत्तरेस तापी नदीपासुन दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्रीचा पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताची एकुण लांबी १६०० किमी आहे व त्याची महाराष्ट्रातील लांबी 800 किमी एवढी आहे. सह्याद्रीची सरासरी उंची 900 ते 1200 मीटर एवढी आहे. सह्याद्री पर्वत रंगांची उंची उत्तरेकडे वाढत व दक्षिणेस कमी होत जाते.
 • अरबी समुद्रापासुन सह्याद्री पवंताची लांबी ३० ते ६० किमी एवढी आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्‍चिमेस तीव्र उतार आहे.
 • या रांगामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्‍चिम वाहीनी नद्या ब बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पुर्व वाहीनी नद्या अशा प्रकारच्या नद्या तयार झालेल्या आहेत.

 सह्याद्री पर्वतरांगा मधील महत्वाची शिखरे :

 • कळसुबाई (१६४६ मी) हे शिखर नाशिक-अहमदनगर या जिल्ह्यांच्या सीमेवर “अकोले” या तालुक्यामध्ये आहे. प्रवरा नदीच्या उगमाजवळ कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे
 • . त्यानंतर साल्हेर (१५६७ मी) हे दुसऱ्या क्रमांकाचे, सप्तश्रृंगी शिखर (१४४६ मी) हे तिसऱ्या क्रमांकाचे
 • त्रंबकेश्वर (९१३०४ मी) हे शिखर महाराष्ट्रातच आहेत.

हे तिन्ही शिखरे नाशिक जिल्हयामध्ये आहेत.

 • तोला -नाशिक
 • हनुमान – धुळे
 • तोरणा – पुणे

महत्वाचे :- “अस्थंबा” (१३२५ मी) हे शिखर सातपुडा पर्वत रांगातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

आहे. तर “धुपगड” हे सातपुडा पर्वत रांगातील सर्वात उंच शिखर आहे. ते मध्यप्रदेश मध्ये येते.

 घाटमाथा :

 • सह्याद्री पर्वताच्या शिखराबरील उंच व रुंद सपाट प्रदेशास ” घाटमाथा” असे म्हणतात.
 • उदा :- माथेरान(नेरळ-रायगड), महाबळेश्वर ब पाचगणी (सातारा). पाचगणीस “टेबल लँड” म्हणुन ओळखले जाते.

सह्याद्री पर्वत रांगेतील किल्ले :-

शिवनेरी, सिंहगड (पुणे), प्रतापगड (सातारा), पन्हाळागड(कोल्हापुर), रायगड (रायगड), विशालगड.

सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा :

मुख्य सह्याद्री पवतापासुन पुव पश्‍चिम अशा लहान मोठ्या डोंगर रांगा तयार झालेल्या आहेत.

१) शंभु महादेव डोंगर रांग :

 • शंभु महादेव डोगर रांग या सह्याद्री पर्वत रांगेच्या अग्नेय दिशेस येते.
 • ही रांग रायरेश्वर पासुन शिंगणापुर पर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेस शंभु महादेव डोंगर रांग असे म्हणतात.
 • या डोंगर रांगा “सातारा व सांगली” जिल्ह्यातुन पुढे कर्नाटक मध्ये प्रवेश करतात.
 • या रांगामुळे भिमा नदी व कृष्णा नदी यांची खोरे वेगळी झाली आहेत .
 • महाराष्ट्रात पठारावरील सर्वात मोठी डोंगर रांग म्हणुन शंभु महादेव डोंगरागेस ओळखले जाते.

२) हरिशचंद्र-बालाघाट डोंगर रांग :

 • गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरीश्‍चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे.
 • या डोंगर रांगेमुळे गोदाबरी नदी व  भिमा नदी या ०२ नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत.
 • हरिश्‍चंद्र बालाघाट डोंगर रांगांच्या पश्‍चिम भागास हरिश्‍चंद्र डोंगर घाट व पुर्व भागास बालाघाट या नावाने ओळखले जाते. पुढे याच रांगा अग्नेय दिशेच वळुन आध्रप्रदेशातील हैद्राबाद पर्यंत जातात.

३) सातमाळा-अजिंठा डोंगर रांगा :

 • या रांगामुळे गोदावरी व  तापी नदोंची खोरी वेगळी झाली आहेत.
 • नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगर रांगा आढळतात. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यास अजिंठा डोंगर
 • रांगा म्हणुन ओळखले जाते. देवगिरी हा इतिहास प्रसिद्ध किल्ला ब अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या
 • ह्या अजिंठा डोंगरांगामध्ये उत्तरेकडे “वाघुर” नदीच्या घळईत आहे. या डोंगर रांगाच्या पश्‍चिम
 • भागास सातमाळा डोंगर रांगा असे म्हणतात. नाशिक जिल्हयाच्या बायव्य भागामध्ये सातमाळा डांगर
 • सुरु होतो व पुढे याच डोंगराच्या रांगा मनमाड च्या पुढे जाबुन “अंकाई-टंकाई” पासुन त्यांना अजिंठा टेकड्या या नावाने ओळखले जाते.

 इतर डोगर रांगा :

 • गाळणा डोंगर -धुळे
 • वेरुळ डोंगर – औरंगाबाद
 • हिंगोली डोंगर -हिंगोली
 • मुदखेड- नांदेड
 • गरमरसुर – नागपुर
 • दरकेसा डोंगर – गोंदिया
 • भांमरागड -गडचिरोली

 सातपुडा पर्वत :

 • महाराष्ट्रामध्ये थोड्या प्रमाणात आढळते व जास्त प्रमाणात मध्यप्रदेश मध्ये आढळते
 • नर्मदा वं तापी नद्यांची खोरे या पर्वत रांगेमुळे वेगळी झालेली आहेत.
 • नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात तोरणमाळ हे एक पठार आहे.
 • महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत रांगातील सर्वात उंच शिखर “अस्तंभा” डोंगर (१३२५मी) हे आहे.
 • सातपुडा पर्वत रांगेचा कांही भाग हा अमरावती जिल्ह्याच्या सीमेस स्पर्श करुन जातो त्यास अमरावतीमध्ये “गाविलगड” या नावने ओळखले जाते.
 • सातपुडा पर्वतरांगातील बैराट (१९७७ मी) व चिखलदरा (१११५ मी) ही शिखरे अमरावती जिल्हयात आहे.

महाराष्ट्राचे पठार / दख्खनचे पठार / देश पठार

 •  सह्याद्री पवंताच्या पुर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे. त्यास “महाराष्ट्र पठार” असे म्हणतात.
 • महाराष्ट्र पठार हे विवीध नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेले आहे.
 • महाराष्ट्र पठाराचा उतार पश्‍चिमेकडुन पुर्वेकडे आहे.
 • या पठाराची समुद्रसपाटीपासुनची सरासरी उंची ४५० मी एवढी आहे.
 • महाराष्ट्र राज्याचा ९० टक्के भुभाग हा महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे.
 • या पठाराची निमीती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे.
 • लाव्हा रसापासुन हे पठार तयार झाले असल्याने त्यास “दख्खन लाव्हा” असे ही म्हणतात.
 • महाराष्ट्र पठारावर इतर लहान मोठी पठारे आहेत.
 1.  बालाघाट डोंगरांगावर “अहमदनगर-बालाघाट” हेपठार आहे.
 2. शंभु महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागात “सासवडचे पठार” आहे.
 3. सातमाळा-अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेशात बुलढाणा व मालेगाव ही पठारे आहेत.
 4. मराठवाड्यामध्ये “मांजरा पठार” आहे.
 5. उत्तरेकडे धुळे व नंदुरबार जिल्हयामध्ये “तोरणमाळ” हे पठार आहे.

महाराष्ट्र पठार हे मुख्यतः करुन नद्यांच्या खोऱ्यांचे पठार म्हणुन ओळखले जाते.

 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे :

 • भंडारदरा(अहमदनगर)
 • तोरणमाळ(नंदुरबार)  म्हैसमाळ (औरंगाबाद)
 • चिखलदरा(अमरावती)
 • आंबोली(सिंधुदूर्ग)
 • पन्हाळा(कोल्हापुर)
 • माथेरान (रायगड)
 • महाबळेश्वर ब पाचगणी (सातारा)
 • लोणावळा व खंडाळा (पुणे)

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: