गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) (1823 – 1892)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८२३- मृत्यू : १८९२)

1,845

गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ – ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.

गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख

नाव : गोपाळ हरी देशमुख (मुळ अडनाव सिद्धय)

जन्म: १८ फेब्रुवारी १८२३, पुणे

मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२

वडील : बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते वतनावरून ते देशमुख होते.

 • सरदार गोपाळ हरी देशमुख घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते.
 • घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
 • गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते.
 • गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती.
 • इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता.
 • त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.

 

 • १८४१ इंग्रजी शाळेत प्रवेश, इतिहास आवडता विषय होता. संस्कृत, फारशी, गुजराती, हिंदी भाषा अवगत.
 • १८४४ भाषांतरकार म्हणून नोकरी.
 • १८४६ मुन्सीफची परीक्षा उत्तीर्ण
 • १८४८ प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे ही लेखमाला प्रसिद्ध.
 • १८४८ पुणे नेटीव्ह जनरल लायब्ररी स्थापन.
 • १८५२ फर्स्ट क्लास मुन्सक म्हणुन वाई येथे नियुक्ती.
 • १८५६ असिस्टंट कमिशन पदावर नियुक्ती.
 • १८६२ अहमदाबादला असिस्टंट जज, अहमदनगरला जज म्हणून नियुक्ती.
 • १८६३ सनदी परीक्षा उत्तीर्ण, नाशिकला जॉइंट सेशन जज.
 • ५ जून १८६९ मुंबई विनायकराव करमकर व वेणुबाई यांचा जो पुनर्विवाह झाला. त्यांच्या समर्थ तीर्थ जे पत्रक प्रसिद्ध झाले. त्यात गोपाळराव देशमुख यांचेही नाव.
 • १८७९ जस्टिस ऑफ पिस, रावबहादूर पदवीने सन्मानित.
 • १८८० मुंबई विधिमंळाचे सदस्य, रतलाम संस्थानाचे दिवाण
 • १८८२ लोकहितवादी (मासिक) सुरु
 • १८८३ लोकहितवादी (त्रेमासिक) सुरु

लोकहितवादी यांनी सुरू केलेले वृत्तपत्र :

गोपाळ हरी देशमुख
गोपाळ हरी देशमुख

वृत्तपत्र                  स्थापना             ठिकाण

मित्रोदय                १८४४                 पुणे

ज्ञानप्रसारक            १८५३                कोल्हापूर

वर्तमान संग्रह          १८५३                कोल्हापूर

जगन्मित्र                १८५४                रत्नागिरी

परशु                        १८५६               जमखिंडी

शुभसूचक                १८५८               सातारा

लोकहितवादींचे ग्रंथसाहित्य

 • इतिहास : (एकूण १० पुस्तके)
  • भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास,१८५१)
  • पाणिपतची लढाई (काशिराज पंडित यांच्या मूळ फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१८७८)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१८८०)
  • हिंदुस्थानचा इतिहास – पूर्वार्ध (१८७८)
  • गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
  • लंकेचा इतिहास (१८८८)
  • सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजरातीवरून अनुवादित,१८९१)
  • उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
 • चरित्रे : (एकूण २ पुस्तके)
  • पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
   • टीप : पृथ्वीराज चव्हाण इ.स. ११९२मध्ये लढाईत मारले गेले. म्हणजे ‘पृथ्वीराज रासो‘ पृथ्वीराजांच्या हयातीत लिहिले गेले होते.
  • पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती (१८८३)
 • धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
  • खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
  • गीतातत्त्व (१८७८)
  • सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
  • स्वाध्याय
  • प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
  • आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
  • आगमप्रकाश (गुजराती, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.
  • निगमप्रकाश (मूळ गुजराती, इ.स. १८८४)
 • राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
  • लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
  • हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
  • स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
  • ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
  • स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
 • समाजचिंतन : (एकूण ५ पुस्तके)
  • जातिभेद (१८८७)
  • भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
  • प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
  • कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
  • निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
  • विद्यालहरी (?)
 • संकीर्ण : (एकूण ७ पुस्तके)
  • होळीविषयी उपदेश (१८४७)
  • महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
  • सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
  • यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
  • पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
  • पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तों‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
  • शब्दालंकार (१८५१)
 • हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके :(एकूण ४ पुस्तके)
  • आत्मचरित्र
  • एका दिवसात लिहिलेले पुस्तक
  • विचारलहरी
  • हिंदुस्थानातील बालविवाह
 • लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके : (एकूण २ )
  • लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
  • लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)
 • निबंध : (एक)
  • लोकहितवादींची शतपत्रे : (डाॅ. अ.का. प्रयोळकर यांनी ‘लोकहितवादीकृत निबंध संग्रह’ या नावाने ह्या शतपत्रांचे पुनःसंपादन करून ती प्रसिद्ध केली आहेत -ललित प्रकाशन

गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) (1823 - 1892)यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 • लोकहितवादीचे साहित्य समाज, धर्म, अर्थ, इतिहास आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.
 • ग्रंथ : ग्रामरचना, लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्तानचा इतिहास, गुजरात लंका, राजस्थान, पानिपत, पृथ्वीराज चौहाणचा इतिहास.
 • इ. स. १८४८ ते ९२ या काळा
 • त लोकहितवादीनी विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांवर त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले.
 • लक्ष्मीज्ञान – १८४९
 • भारतखंड पूर्व – १८५१
 • हिदुस्थानचा इतिहास, पूर्वाध, The History of British Empire in India (ग्लीनच्या ग्रंथाचा अनुवाद) ठाणे – १८७८
 • पनिपतची लढाई (काशीराज पंडित यांच्या फारशी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराचा मराठी अनुवाद) १८७७
 • ऐतिहासिक गोष्ट – भाग १, २ व ३ (१८७७, ७८, ७९)
 • हिंदूस्थानात दरिद्रयता येण्याची कारणे व त्यांचा परिवार आणि व्यापारविषयी विचार (१८७६)
 • अश्रलायन गृहासुत्र (अनुवाद) मुंबई – १८८०
 • स्थानिक स्वराज्य व्यवस्था, पुणे (१८८२-८३)
 • ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्ली स्थिती, पुणे. (१८८३)
 • गुजरात देशाचा इतिहास, पुणे – १८८५
 • लंकेचा इतिहास, पुणे – १८८८
 • सौराष्ट्र देशाचा इतिहास, पुणे – १८९१
 • उदयपूरचा इतिहास कर्नल रॉकच्या Analist anti auities of Rajasthan या ग्रंथाचे भाषांतर
 • पृथ्वीराज चौहानचा इतिहास
 • स्वाध्याय (स्वातंत्र्य) प्राचीन आर्थविधांचा क्रम, विचार व परिक्षण
 • आगमप्रकाश (मुळ ग्रंथ गुजराती)
 • होळीविषयी उपदेश

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम