लॉर्ड कॅनिंग (१८५६-५८)
- सैन्यातील भारतीय सैनिकांची संख्या कमी करून ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवण्यात आली. सैनिकांना धार्मिक चिन्ह धारण करण्यास बंदी घालण्यात आली. मुघल बादशाहा पद समाप्तीची घोषणा.
- त्यांची चलन मुद्रा रद्द करण्यात आले कॅनिंगच्या काळ्यातच 1857चा विद्रोह घडून आला.
- ईस्ट इंडिया कंपनीला समाप्त करून संपूर्ण सत्ता महाराणीच्या नावे ब्रिटिश संसदेकडे हस्तांतरित.
- राणीचा जाहीरनामा व कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होय. याच काळात विधवा पुनर्विवाह केशवचंद्र सेन च्या साह्याने पारित झाला
- मुंबई, मद्रास, कलकत्ता याठिकाणी हायकोर्टाची व विद्यापीठाची स्थापना
लॉर्ड मेयो (१८६९-७२)
- जनगणना – १८७२ ला अंदमान येथे मेयोची एका कैद्याने हत्या केली.
- वित्तविकेंद्रीकरणाचा जनक – केंद्र व प्रांताची योजना
- १४ डिसेंबर १८७० चा ठराव. प्रांतांना संपूर्ण निधी देण्यात यावा. आवश्यकतेनुसार खर्चाचे स्वातंत्र्य दिले.
- भारतीय राजपुत्रांचे शिक्षण त्यांच्या राजकीय प्रशिक्षणासाठी दोन कॉलेजेसची निर्मिती
- १) रोजकोट कॉलेज (काठियावाड) २) मेयो कॉलेज (अजमेर)
- स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया ची स्थापना
- शेती व व्यापारासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती
- राज्यांकडून रेल्वेची सुरुवात
- मेयोचा प्राथमिक शिक्षणावर भर, मदरशांना अनुदान
- शारदा कालवा
लॉर्ड लिटन (१८७६-८०)
- साहित्याच्या जगात “ ओवन मैरीडिय” या नावाने त्याची ओळख होती. लिटन हा प्रख्यात कवी, कादंबरीकार व निबंधलेखक होता.
- १८७६ ते १८८० चा भीषण दुष्काळ. मद्रास, मुंबई, मैसूर, हैद्राबाद, पंजाब या भागात. रिचर्ड स्टैचीच्या अध्यक्षतेखाली पहिला दुष्काळ आयोग नेमला .
- रॉयल टायटल अधिनियम (१८७६), महाराणी व्हिक्टोरियाला “कैसर -ए- हिंद” किताब. त्यानिमित्त जानेवारी १८७७ ला दिल्ली दरबार.
- दुसरे अफगाण युद्ध (१८७८-८०)
- वित्त (१८७७) शेतसारा, न्याय ही खाती प्रांताकडे दिली. मोठे उत्पादन करणाऱ्या संस्थानिकांशी करार केले. ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकले.
लिटनने केलेले कायदे :
- भारतीय शास्त्र अधिनियम ,१८७८ – विना लायसन शस्त्रासाठी शिक्षा.
- स्टॅटयूटरी सिव्हिल सर्व्हिसेस अक्ट ,१८७८ – नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी केले.
- ड्रोमेटिक परफॉर्मन्स ऍक्ट, १८७६ – दीनबंधूंच्या नीलदर्पण (१८६०) नाटककार देशभक्तीचे चित्रण करणाऱ्या नाटकांवर नियंत्रणाच्या उद्देशाने.
- व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट ,१८७८ – देशी भाषेतील वृत्तपत्रावर बंदी
- रॉयल्स टायटल्स ऍक्ट ,१८७८ – राणीला केसर -ए -हिंद देण्याकरिता
लॉर्ड रिपन (१८८०-८४)
- ब्रिटनमध्ये १८८० ला liberal पक्षाला यश. पंतप्रधान ग्लॅडस्टन. भारत मंत्री लॉर्ड हर्टींगण
- रिपनचे पुस्तक – The Duty at the age यात लोकशाहीचे गुण सांगितले.
- भारतीय वृत्तपत्र कायदा (व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट) रद्द केला.
- पहिला फॅक्टरी ऍक्ट (१८८१) – १०० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांसाठी ७ पेक्षा कमी वयाचे मजूर नको. 7 ते 12 वयाच्या मुलांना 9 तासाचे काम.
- याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असेही म्हणतात
लॉर्ड डफरीन (१८८४-१८८८)
- याच्याच काळात तिसरे बर्मा युद्ध झाले ( १८८४-१८८८)
- २८ डिसेंबर १८८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली.
- शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेस शी संबंध ठेवण्यास बंदी घातली.
लॉर्ड कर्जन (१८९९-१९०५)
- पोलीस कमिशन ( सुधारणा आयोग) – अँड्र्यू फ्रेजरच्या अध्यक्षतेखाली
- विद्यापीठ आयोगाची स्थापना (थॉमस रॅले) (१९०२) त्यावर आधारित – भारतीय विश्वविद्यालय कायदा (१९०४)
- १८९९-१९०० चा दुष्काळ त्यावर अँथनी मॅक्डोनाल्ड अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग
- १९०३ रेल्वे बोर्डाची स्थापना, यात ३ सदस्य होते.
- प्राचीन स्मारक संरक्षण कायदा (१९०४)
- तिबेटमध्ये कर्नल यंगहजबंडच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ
- १९०३ ला कर्झन इराणच्या प्रदेशात
लॉर्ड मिंटो दुसरा (१९०५-१९१०)
- बंगाल विभाजनाचा विरोध व स्वदेशी आंदोलन
- काँग्रेसचे विभाजन (१९०७) सुरत
- मुस्लिम लीग – १९०६
- मोर्ले-मिंटो सुधारणा – १९०१
- वृत्तपत्र अधिनियम -१९०८
लॉर्ड हार्डिंग – II (१९१०-१९१६)
- बंगालचे विभाजन रद्द केले (१९११)
- राजधानी कलकत्याहून दिल्लीला (१९११)
- हिंदू महासभेची स्थापना (१९१५) पं. मदन मोहन मालवीय
- गदर पार्टी – सॅनफ्रान्सिस्को (१९१५)
- किंग जॉर्ज पाचवा व क्वीन मेरीचा राज्याभिषेक दरबार (१९११) – दिल्ली
लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६-१९२१)
- काँग्रेसचे लखनौ अधिवेशन – काँग्रेस व लीग समजौता
- 1919 मॉंटफोर्ट सुधारणा
- मार्च 1919 – जालियनवाला बाग
- असहकार व खिलाफत चळवळ
- पुणे येथे महिला विद्यापीठ (1916) – कर्वे
- बिहारचे गव्हर्नर म्हणून – एस. पी. सिन्हा (गव्हर्नरपदी जाणारे पहिले भारतीय)
- शिक्षण सुधारणा आयोग- सॅडलर (1917)
- गांधीजी भारतात (1915), साबरमती आश्रम (1916), चंपारण्य सत्याग्रह (1917), अहमदाबाद सत्याग्रह (1918), खेडा (1918)
- 1918- इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना
- होमरूल लीग
लॉर्ड रिंडींग (१९२१-१९२५)
- सर्व व्हॉइसरॉयांपैकी एकमेव – यहुदी
- चौरीचौरा (१९२२)
- १९२२– काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष – दास व ज्येष्ठ नेते. मोपलांचे बंड (१९२१)
- नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना (1925)
- काकोरी ट्रेन (१९२५)
- स्वामी श्रध्दानंदची हत्या (१९२६)
- आयसीएसची परीक्षा एकाचवेळी – दिल्ली व लंडन येथे घेण्याचा निर्णय – १९२३ पासून
- क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयक
- कापसावरील Excise कर काढला.
- १९१० चा प्रेस ऍक्ट व १९१९ चा रोलॅक्ट ऍक्ट रद्द
लॉर्ड आयर्विन (१९२६-३१)
- सायमन कमिशन (१९२८)
- हारकोर्ट बटलोर – भारतीय राज्य आयोग (Indian States Commission) – १९२७
- लॉर्ड आयर्विनची – दिपवाली घोषणा – १९२९
- मिठाचा सत्याग्रह (१९३०)
- लाहोर अधिवेशन (१९२९) – पूर्ण स्वराज्य
- सॉंडर्सची हत्या – असेम्ब्ली हॉल (दिल्लीत बॉम्ब स्फोट)
- लाहोर कट खटला व जतीनदासचा तुरुंगात उपोषणाने मृत्यू
- ट्रेन – दिल्लीत – बॉम्ब अपघात
- १९३० सविनय कायदेभंग चळवळ
- प्रथम गोलमेज परिषद
लॉर्ड विलिंग्टन (१९३१-३६)
- दुसरी गोलमेज परिषद . पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ. १९३४ ला आंदोलन मागे.
- पंतप्रधान मॅक्डोनाल्डद्वारा कम्युनल अवॉर्डची घोषणा. त्याविरोधात गांधींचे उपोषण येरवडा येथे.
- पुणे करार –१९३२
- १९२५चा भारत सरकार अधिनियम
- १९३५ – आरबीआयची स्थापना
- १९३५ भारतापासून बर्मा वेगळा
- काँग्रेस समाजवादी पक्ष (१९३४) – आचार्य नरेंद्र देव – जयप्रकाश नारायण
- अखिल भारतीय किसान सभा – १९३६
लॉर्ड लिनलिथगो (१९३६-४४)
- १९३७ला अनेक प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे आली, नंतर १९३९ला युद्धाच्यावेळी राजीनामे दिले.
- सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली व फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
- मुस्लिम लीगचा लाहोर जाहीरनामा, येथेच जिन्हांचा द्विराष्ट्र सिद्धांत
- ऑगस्ट घोषणा (१९४०) – काँग्रेसने नाकारली. लीगने स्वीकारली.
- चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्त.
- सुभाषचंद्र बोस – भारताबाहेर (१९४१) आयएनए ची स्थापना
- क्रिप्स मिशन – डोमिनियन स्टेट्स – गांधींनुसार याला Post dated cheque
- चलेजाव चळवळीची घोषणा
- लीगचे कराची अधिवेशन – फोडा आणि राज्य करा
लॉर्ड वेव्हेल (१९४४-१९४७)
- सी राजगोपालचारी द्वारा – सीआर फॉर्मुला बोलणी अयशस्वी (गांधी – जिन्हा)
- वेव्हेल योजना – सिमला संमेलन
- आयएनए – खटला व नौसैनिक विद्रोह
- कॅबिनेट मिशन योजना – काँग्रेस व लीगकडून योजनेची स्वीकृती.
- मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन – १७ ऑगस्ट १९४६
- संविधान सभेसाठी निवडणूक – अंतरिम सरकार
- ब्रिटिश पंतप्रधान एटलींची भारत सोडण्याची घोषणा – २० फेब्रुवारी १९४७