MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Gramvikas Vibhag Bharti 2021 : ग्रामविकास विभागात लवकरच मेगाभरती होणार

Gramvikas Vibhag Bharti 2021

0 93

Get real time updates directly on you device, subscribe now.

Gramvikas Vibhag Bharti 2021 :राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक लावावा

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे.

एकूण जागा : 13 जागा

पदाचे नाव:  सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता,सेवानिवृत्त उप अभियंता

शैक्षणिक पात्रता: Graduate

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: 

  • मुंबई
  • औरंगाबाद
  • पुणे
  • अमरावती
  • अकोला
  • ठाणे
  • नाशिक
  • नागपूर
  • गडचिरोली 
  • चंद्रपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  28 जानेवारी 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव (मु. मं. ग्रा. स. यो./ प्र. मं. ग्रा. स. यो.), ग्रामविकास विभाग, 5 व मजला, बांधकाम भवन, मुंबई

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

हा मेसेज बंद करण्याकरिता वरील चित्रावर क्लिक करा

%d bloggers like this: