मानवी पचन संस्था

 

मानवी पचन संस्था

पचनामागील महत्वाच्या प्रक्रिया :

अन्नपचन : खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.

पचन संस्थेत प्रामुख्याने अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.

 

अन्ननलिका [Alimentary Canal] :

अन्ननलिका ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठराचे वरचे मुख यांना जोडते.

नलिकेतून अन्न स्नायुंच्या हलचालींच्या साहाय्याने पुढे ढकलले जाते.

अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील घटकांचा समावेश होतो .

 1. मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
 2.  ग्रासिका  (Pharynx)
 3.  ग्रसिका (Esophagus)
 4.  जठर/अमाशय (Stomach)
 5.   लहान आतडे (Small Intestine)
 6.   मोठे आतडे (Large Intestine)

 

मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity) :

 •  मुखाचा उपयोग अन्न घेण्यासाठी होतो. मुखगुहेत लालोत्पादक ग्रंथी त्यांच्या नलिकांद्वारे उघडतात.
 • जिभेमुळे अन्नाची चव कळते. त्याचा घास केला जातो. त्यात लाळ मिसळते आणि ते गिळले जाते. दातांमुळे अन्नाचे बारीक तुकडे होतात आणि त्याची भौतिकीय पचनाची सुरूवात होते.
 • लाळेमध्ये टायलिन व माल्टेज ही दोन विकरे असतात.
 • या विकरांमुळे अन्नातील कर्बोदकांच्या रासायनिक पचनास सुरूवात होते. स्टार्च आणि ग्लायकोजेनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते.
 • लाळेत असलेल्या श्लेष्मामुळे अन्नाचा घास गिळण्यास मदत होते.

 ग्रासनी /घसा  (Pharynx) :

 • मुखगुहेनंतर अन्न घशात येते. घशाला ग्रासनी असेही म्हणतात.
 • घसा हा अन्ननलिका  आणि श्वसन नलिका या दोन्हींच्या मार्गामध्ये असतो.
 • घशामध्ये नासाद्वारे, यूस्टॅशियन नलिका छिद्रे, ग्रासिकाद्वार व कंठद्वार असतात.
 • कंठद्वारावर कंठच्छद असल्याने अन्नकण स्वरयंत्रात जाऊ शकत नाहीत.
 • श्वसननलिकेच्या तोंडावर एपीग्लॉटिस (Epiglottus) नावाचा पडदा असतो त्यामुळे गिळलेले अन्न श्वसननलिकेत जाते .

 ग्रसिका (Esophagus) :

 • ग्रसनी/ घशापासून जठरापर्यंत असलेल्या अन्ननलिकेला ग्रासिका असे म्हणतात.
 • ग्रासिका अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करतात.
 • ग्रासिकेची लांबी साधारणपणे 25cm असते.

 जठर/अमाशय (Stomach) : 

 • जठर एखाद्या पिशवीसारखे असून पचन संस्थेतील हा सर्वांत रुंद भाग असतो.
 • साधारणपणे इंग्रजी J अक्षरासारखा त्याचा आकार असून तो व्यक्तीनुसार वेगळा व अन्नसाठ्याप्रमाणे बदलत राहतो.
 • प्रौढ व्यक्तीच्या जठरात सु.१ लि. अन्न सामावते.
 • जठराचे पाच  भाग असतात. ग्रासिकेच्या आणि लहान आतड्याच्या बाजूला झडपा असतात.
 • जठरभित्ती अनैच्छिक स्नायूंच्या बनलेल्या असतात.
 • जठरातील अस्तर श्लेष्माने बनलेले असते.
 • जठरात जठर ग्रंथी असून त्या जठररस तयार करतात.
 • जठररसात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सीन, रेनिन आणि श्लेष्म असते.
 • ग्रासिकेतून चर्वण झालेले अन्न जठरात ३–५ तास राहते. तेथे अन्न घुसळले जाते, त्यातील मेदाचे पायसीकरण (साबणीकरण) होते.
 • गॅस्ट्रिन आणि आंत्रगॅस्ट्रिन ही स्थानिक संप्रेरके जठर ग्रंथीचे नियंत्रण करतात

  लहान आतडे (Small Intestine) :

 • लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.
 • अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.
 • जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
 • लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.
 • लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे म्हणतात. आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात

स्वादुपिंड रस (Pancreatic Juice)

 • स्वादुपिंडातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिसळतो. यामध्ये Trypsin, Amylase व Lypase अशी ३ विकरे असतात.

 

पित्तरस (Bile): 

 • पित्तरस यकृतातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिळतो.
 • स्निग्ध पदार्थांचे Emulsification घडवून आणण्यात पित्तरस (Bile Juice) मदत करतो.
 • लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.
 • अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.
 • जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
 • लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.
 • लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे म्हणतात. आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.

  मोठे आतडे (Large Intestine) :

 • मोठे आतडे (बृहदांत्र) सु. १.५ मी. लांब आणि ६ सेंमी. रुंद असते.
 • लहान आतड्याच्या शेवटी आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला कृमीसारखे दिसणारे आंत्रपुच्छ निघते.
 • मोठ्या आतड्यात असंख्य जीवाणू असतात. मनुष्यात आंत्रपुच्छ अवशेषांग स्वरूपात व निष्क्रिय असते. त्याचा शरीराला काही उपयोग नसतो .
 • येथे फक्त पाण्याचे शोषण होते.
 • मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला ‘ॲपेंडिक्स’ हा छोटा भाग जोडलेला असतो.
 • लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो.
 • पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.

पचन ग्रंथी  :

पचन ग्रंथी या तीन असतात –

 1. लालोत्पादक ग्रंथी
 2. यकृत
 3. स्वादुपिंड

लालोत्पादक ग्रंथी : 

 • लालोत्पादक ग्रंथीच्या तीन जोड्या मुखगुहेभोवती असतात.
 • त्यांना अनुकर्ण ग्रंथी, अधोहनू ग्रंथी आणि अधोजिव्हा ग्रंथी म्हणतात.
 • त्या अनुक्रमे कानापुढे, खालच्या जबड्यातील आणि जिभेखाली असून लाळ स्रवतात.

यकृत :

 •  यकृत ही सर्वांत मोठी ग्रंथी असून त्याचे वजन सु. १.५ किग्रॅ. असते.
 • यकृताचा रंग लालसर तपकिरी असून ते उदरपोकळीत उजव्या बाजूला व जठराला थोडेसे झाकून असते
 • यकृताला भरपूर रक्तपुरवठा हाेत असतो.
 • यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे.
 • यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो.
 • यकृत पित्त निर्माण करते तसेच ते ग्लुकोज, प्रथिने, जीवनसत्त्वे, मेद, क्षार इत्यादी साठवून ठेवते.
 • वापरून झालेले रक्तातील घटक, औषधे, विषारी पदार्थ यांची विल्हेवाट यकृतामार्फत लावली जाते.
 • यकृत ही ग्रंथी शरीरातील ‘जीवरसायन’ प्रयोगशाळा आहे.

स्वादुपिंड :

 • स्वादुपिंड ही ग्रंथी असून वनस्पतीच्या पानाप्रमाणे जठर आणि लहान आतड्यातील ग्रहणी यांमध्ये पसरलेली असते.
 • ती अंत:स्रावी आणि बहिस्रावी अशी दोन्ही कार्ये करते.
 • अंत:स्रावी भाग इन्शुलीन आणि ग्लुकागॉन संप्रेरके तयार करतो, तर बहिस्रावी भाग स्वादुरस तयार करतो .

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा