ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
672

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती –

आपल्या जीवनातील खेळाचे महत्व सर्वांनाच माहित आहे. खेळ म्हटलं कि सर्वात आधी आठवते स्पर्धा. कुठल्या खेळात कोण सर्वोत्कृष्ट हे ठरविण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अगदी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन होत असते.

परंतु संपूर्ण जगात कुठल्या खेळात कोण सर्वोत्कृष्ट आहे हे कसे समजेल? याचा प्रश्नांचे उत्तर म्हणजे आजचा लेख. होय, जागतिक स्तरावर एखाद्या खेळातील जगज्जेता ठरविण्यासाठी ज्या स्पर्धांचे आयोजन केले जाते त्या म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा. चला तर बघुयात या स्पर्धांविषयीची महत्वाची माहिती.

ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास –

ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले. असे निदर्शनास येते. सर्वात आधी ऑलिम्पिक खेळ ग्रीस देशातील ओलीम्पिया या शहरात खेळल्या गेले. आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात १८९६ साली अथेन्स (ग्रीस) येथे झाल्याचे समजते. ज्यामध्ये एकूण १४ देशांनी आपला सहभाग नोंदविला होता.

ऑलिम्पिक खेळांची सुरुवात नेमकी कधी झाली हे जरी सांगता येत नसले तरी, उपलब्ध माहितीनुसार या खेळांची आयोजन जवळपास ३००० वर्षांपासून होत आहे असे निदर्शनास येते. सर्वात आधी ऑलिम्पिक खेळ ग्रीस देशातील ओलीम्पिया या शहरात खेळल्या गेले. आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात १८९६ साली अथेन्स (ग्रीस) येथे झाल्याचे समजते. ज्यामध्ये एकूण १४ देशांनी आपला सहभाग नोंदविला होता.

ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रतिक – Olympics Emblem

खेळाची निशाणी म्हणजे एकात एक गुंतलेले ५ रंगांचे ५ वर्तुळ. हे ५ वर्तुळ ५ खंडांना दर्शवितात.

Olympics Emblem
Olympics Emblem
  • निळा वर्तुळ : युरोप खंड
  • पिवळा वर्तुळ : आशिया खंड
  • काळा वर्तुळ : आफ्रिका खंड
  • हिरवा वर्तुळ : ओशिनिया खंड
  • लाल वर्तुळ : अमेरिका खंड

ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रकार : Olympics Types

१९९२ सालापर्यंत चार वर्षांतून एकदा ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन होत असे. परंतु या नंतर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विभाजित होऊन या स्पर्धांमध्ये २ वर्षांचे अंतर आहे.

पॅरालीम्पिक स्पर्धा – Paralympic Games

दिव्यांग खेळाडूंसाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पॅरालीम्पिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे ज्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याच देशात पॅरालीम्पिक स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात.

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेले खेळ – Olympics Sports List

सद्यस्थितीत ऑलिम्पिक मध्ये एकूण ३५ खेळ समाविष्ट आहेत. ज्यांना ४०० विविध स्पर्धांमध्ये विभागले गेले आहे.

उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा : Summer Olympics Sports List

  • नेमबाजी (Shooting)
  • बॅॅडमिंटन (Badminton)
  • व्हॉलीबॉल (Volleyball)
  • बेसबॉल (Baseball) असे एकूण २८ खेळ

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा : Winter Olympics Sports List

  • अल्पाईन स्कीईंग (Alpine Skiing)
  • आईस हॉकी (Snow Hockey)
  • स्नो-बोर्ड (Snow Board)
  • बिओथ्लोन (Biathlon) असे एकूण ७ खेळ

ऑलिम्पिक पदकांची मानके – Olympic Medal

ऑलिम्पिक खेळांमध्ये मिळणारे पदक तीन प्रकारचे असतात. प्रथम विजेत्याला सुवर्ण, द्वितीय विजेत्याला रजत आणि तृतीय विजेत्याला कांस्य पदक दिले जाते. हे पदक वर्तुळाकार असून त्यांचा व्यास ६० मिमी (कमीतकमी) आणि जाडी ३ मिमी (कमीतकमी) असते. या पदकांवर आयोजक देशाचे नाव, वर्ष कोरण्यासाठी मोकळी जागा सोडलेली असते.

Olympic Medal Images

ऑलम्पिक स्पर्धेदिली मध्ये दिली जाणारी पदक medals
ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मुख्यता तीन पदक जातात आणि ती म्हणजे सुवर्ण पदक, रोप्य पदक आणि कास्य पदक.
1. सुवर्ण पदक : सुवर्ण पदक ऑलम्पिक स्पर्धेमधील एक सर्वोच्च पदक आहे तसेच हे पदक नोबेल पारितोषिक विजेत्यास दिले जाते.
2. रोप्य पदक: ऑलम्पिक स्पर्धेमधील एखादा खेळाडू कोणत्याही खेळामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला असेल तर त्याला रोप्य पदक दिले जाते.
3. कास्य पदक : ऑलम्पिक स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूला दिले जाणारे पदक म्हणजे कास्य पदक.

 

Olympic Medal Images
Olympic Medal Images

सुवर्ण पदक हे वास्तविक पाहता चांदीचे असते ज्यावर सुवर्ण मुलामा दिलेला असतो. रजत पदक हे चांदीचे असते तर कांस्य पदक हे तांबे आणि जस्त या धातूंच्या मिश्रणापासून बनवले जाते. या पदकांचे वजन ठरलेले नसते.

(ऑलिम्पिक पदकांची परिनामे निश्चित नसून ती प्रत्येक आयोजक देशानुसार बदलू शकतात.)

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी देश – Countries Participating in the Olympics

या स्पर्धांमध्ये संपूर्ण जगातील सर्वच देश सहभाग नोंदवतात. ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत २०६ देश सहभागी झालेले आहेत.

ऑलंम्पिक खेळाची नावे आणि माहिती – 10 international games name

१८९६ मध्ये पहिल्या ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये ९ क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या त्यामध्ये आणि दुसरे खेळ जोडले तसेच काढले देखील गेले आणि १८९६ मधील उन्हाळी ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये अथलेटिक्स, सायकलिंग, जिमनॅस्टिक्स, फेन्सिंग आणि स्विमिंग या ५ क्रीडा स्पर्धा झाल्या. ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये दरवर्षी वेगवेगळे खेळ जोडले जातात त्याबरोबर त्यामध्ये समाविष्ट असणारे खेळ काढून देखील टाकले जातात. ऑलंम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या काही खेळाची नवे खाली दिली आहेत.

क्र. खेळ

उन्हाळी ऑलंम्पिक खेळ

1. बॅडमिंटन (badminton )
2. धनुर्विद्या (archery )
3. सॉफ्टबॉल (softball)
4. बेसबॉल (baseball )
5. बास्केटबॉल (basketball )
6. व्हॉलीबॉल (volleyball)
7. बॉक्सिंग (boxing)
8. क्लाम्बिंग (climbing)
9. सायकलिंग (cycling – road, track, mountain)
10. फेन्सिंग (fensing)
11. गोल्फ (golf)
12. हॉकी (hockey)
13. जीमनॅस्टीक (gymnyastics )
14. कराटे (karate )
15. जुडो (judo)
16. हॅन्डवॉल (handball )
17. नेमबाजी (shooting)
18. फुटबॉल (football/soccer)
19. स्विमिंग (swimming)
20. टेबल टेनिस (table tennis )
21. टेनिस (tennis)
22. कुस्ती (wrestling)
23. वेटलिफ्टिंग (weightlifting)
24. अॅथलेटीक्स (athletics )

अलीकडे जोडलेले खेळ ( २०२० मध्ये)

25. ब्रेकडान्सिंग (breakdancing)
26. स्केटबोर्डिंग (skateboarding)
27. सर्फिंग (surfing)
28. नेटबॉल (netball )
29. क्रिकेट (cricket)
30. पोलो (polo)
31. रॅकेट्स (racquest )
32. मोटर बोटिंग (motor boating )
33. लॅक्रोस (lacrosse )

 

बॅडमिंटन – badminton

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

 

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी लागतात आणि त्या म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक, बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन हा खेळ महिला आणि पुरुष दोघेही खेळू शकतात आणि हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील समाविष्ठ आहे. बॅडमिंटन या खेळामध्ये जर हा खेळ एकेरी खेळ असेल तर या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि जर हा खेळ दुहेरी खेळ असेल तर या खेळामध्ये ४ खेळाडू असतात..

हा खेळ खेळताना २ रॅकेटची गरज असते रॅकेट हे अंडाकृती असते आणि ते धातूपासून बनवलेले असते आणि त्याला खाली धरण्यासाठी एक मुठ असते आणि रॅकेटच्या मधी जे छोटे छोटे चौकोण असतात ते फायबरचे असतात आणि रॅकेटचा वापर शटलकॉकला मारण्यासाठी केला जातो. शटलकॉक बॅडमिंटनचे फुल किवा बर्डी या नावाने देखील ओळखले जाते.

धनुर्विद्या – archery

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

नुर्विद्या किंवा तिरंदाजी म्हणजे धनुष्याच्या सहाय्याने बाण नेम धरून प्रक्षेपण करण्याची कला किवा गुण. तिरंदाजी करणाऱ्या व्यक्तीला धनुर्धर किवा तिरंदाज म्हणतात. तिरंदाजी हा खेळ बहुतेक ९००१ वर्षापासून खेळला जाणारा एक जुना खूल आहे. भारत, पारसी, न्यूबियन, ग्रीक, पार्थी, चीनी आणि जपानी लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनुर्धर होते. जगभरामध्ये आज अनेक प्रकारचे धनुर्विद्या खेळ खेळले जातात. मुख्यता या खेळाचे चार प्रकार आहेत आणि ते म्हणजे लक्ष्य, फील्ड, क्लाउट आणि फ्लाइट आहेत. वेगवेगळ्या संस्कृतीत बाण धरण्याची किवा मारण्याची पध्दत वेगवेगळी असते. काही जन बाण डाव्या किवा उजव्या बाजूला सोडतात हे हाताची पकड कशी आहे त्यावर अवलंबून असते.

सॉफ्टबॉल – softball

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

सॉफ्टबॉल हा एक बॅट-बॉल खेळ आहे ज्यामध्ये १० खेळाडूंच्या दोन संघात खेळला जातो आणि खेळ बेसबॉल खेळाशी जरी साम्य असला तरी त्यामध्ये काही महत्वाचे फरक आहेत. सॉफ्टबॉल मोठ्या मैदानावर २ संघांदरम्यान खेळला जातो, एकाच वेळी मैदानात एका संघाचे ९ किंवा १० खेळाडू असतात आणि इनफिल्डवर ४ तळ आहेत ते म्हणजे पहिला बेस, दुसरा बेस, तिसरा बेस आणि होम प्लेट या चौकाच्या मध्यभागी एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळात “रबर” आहे जो एक छोटा सपाट आयताकृती क्षेत्र आहे.

खेळाचा हेतू म्हणजे दुसऱ्या संघापेक्षा जास्त एकापाठोपाठ एक धाव घेऊन जास्त गुण मिळवणे. सॉफ्टबॉल मुख्यता दोन प्रकार आहेत ते म्हणजे स्लो पीच आणि फास्ट पीच. स्लो-पिच सॉफ्टबॉल सर्वात जास्त खेळला जातो आणि या प्रकारच्या सॉफ्टबॉलमध्ये खेळपट्टीवर जाताना बॉलला हवेमध्ये कमान करणे आवश्यक असते. फास्ट-पिच सॉफ्टबॉलमध्ये बॉल वेगवान फेकला जातो आणि एकावेळी मैदानात प्रत्येक संघाचे नऊ खेळाडू असतात.

बेसबॉल – baseball

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

या खेळामध्ये हि क्रिकेट सारखे बॅट आणि बॉल असते पण बेसबॉल चे बॅट हे क्रिकेट बॅटपेक्षा वेगळे असते हे बॅट दिसायला रॉडसारखे असते. आणि हा खेळ सुध्दा दोन विरोधी संघांमध्ये खेळला जातो आणि प्रत्येक संघात ९ खेळाडू असतात. या खेळामध्ये जो संघ बॅटिंग करत असतो त्यांचे पहिले उद्दीष्ट प्रथम खेळाडू सुरक्षितपणे पहिल्या बेसमध्ये जावून न आउट होता धावा बनवणे आणि विरोधी टीमचे लक्ष हे असते कि बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंना आउट करणे आणि धावा काढू न देणे. या खेळामध्ये बॅट आणि बॉल वापरले जाते. बॅट हे लाकडी, अल्युमिनियम किंवा मेटलचे असते आणि बॉल पांढरा किवा लाल रंगाचा असतो.

बास्केटबॉल – basketball

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

बास्केटबॉल हा खेळ सांघिक खेळ आहे आणि या खेळामध्ये २ संघ असतात आणि प्रत्येक संघामध्ये ५ खेळाडू असतात. या खेळामध्ये चेंडू जाळीच्या बास्केटमध्ये टाकायचा असतो म्हणून या खेळला बास्केटबॉल खेळ म्हणतात. या खेळाचे मैदान आयताकृती असते आणि त्याला बास्केट करत म्हणतात आणि ते २ भागामध्ये विभागलेले असते.

व्हॉलीबॉल – beach volleyball

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

व्हॉलीबॉल हा खेळ २ संघामध्ये खेळला जातो आणि प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असतात. या खेळाचे मैदान आयताकृती असते आणि याचा आकार १७ ते १८ सेंटी मीटर लांब आणि ८ ते ९ सेंटी मीटर असते आणि मैदानाच्या मध्यभागी एक नेत असते या खेळाच्या मैदानाला कोर्ट म्हणतात. या खेळामध्ये वापरला जाणारा चेंडू मोठा आणि मऊ असतो आणि मैदानावर ६ खेळाडू खेळण्यासाठी असतात आणि राहिलेले खेळाडू राखिव असतात.

बॉक्सिंग – boxing 

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

बॉक्सिंग हा प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वर्षापासून आफ्रिका या देशामध्ये खेळला जात होता आणि आताच्या काळामध्ये हा खेळ अमेरिका आणि युरोपमधील खूप लोकप्रिय आणि आवडता खेळ आहे. या खेळामध्ये २ खेळाडू एकमेका विरुध्द खेळतात आणि आपण पहिले आहे कि बॉक्सिंग खेळणाऱ्या खेळाडूंच्या हातामध्ये एक मजबूत १५० ते २५० ग्राम ची मुठ घातलेली असते आणि त्याने ते प्रतिस्पर्ध्याशी लढत किंवा खेळत असतात.

बॉक्सिंग हा खेळ उन्हाळी ऑलम्पिक खेळामध्ये समाविष्ट केला आहे तसेच २०१२ पासून महिलांचा देखील ऑलम्पिक बॉक्सिंग खेळाची सुरुवात झाली आहे. बॉक्सिंग खेळामध्ये २ खेळाडू एकमेकाविरुद्ध खेळतात आणि मुठीचा वापर करून एकमेका विरुध्द लढाई करतात. हा खेळ २ ते ३ मिनिटाच्या अंतराच्या मालिकांमध्ये खेळला जातो. हा खेळ पूर्णपणे रेफारीद्वारे हाताळला जातो.

क्लाम्बिंग – climbing

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

क्लाम्बिंग हि एक बंदिस्त जागेमध्ये खेळला जाणारा खेळ आहे ज्या खेळामध्ये कृत्रिम भिंतीवर चढण्याची स्पर्धा असते. या खेळामध्ये तीन वेगवेगळे भाग आहेत आणि ते म्हणजे वेग, आघाडी आणि दगड फेक. क्लाम्बिंग या खेळाचा २०१३ मध्ये ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.

सायकलिंग- cycling 

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

सायकलचा मनोरंजक वापर युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये व्यापक प्रमाणात आहे. १९ व्या शतकामध्ये सायकलची निर्मिती झाली आणि रॉयल मेलया या ब्रिटीश माणसाने १८८० मध्ये पहिल्यांदा चालवली. आजच्या काळात सायकलिंगच्या खेळात व्यावसायिक आणि हौशी शर्यतींचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला आहे आणि या खेळाच्या शर्यती शक्यतो अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये आयोजित केले जातात. सायकल शर्यत उन्हाळी ऑलंम्पिक खेळामध्ये १८९६ मध्ये समाविष्ठ करण्यात आला आणि महिलांचा सायकल शर्यतीचा ऑलंम्पिक खेळ १९८४ पासून सुरु झाला.

फेन्सिंग – fensing

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

ताल्बाजी हि पूर्वीच्या काळामध्ये युध्दामध्ये केली जायची पण आता तलवारबाजीचा समावेश उन्हाळी ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये केली आहे आणि हा खेळ १८९६ मध्ये ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये खेळला गेला.

गोल्फ – golf

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

गोल्फ हा असा खेळ आहे जो वैयक्तिकरित्या किवा गटामध्ये खेळला जातो. या खेळामध्ये एक धातूची काठी ( ज्याला क्लब म्हणतात) घेवून चेंडूवर निशाना ठेवून तो चेंडू एका छिद्रात गोल्फ खेळाच्या मैदानाचा दुसऱ्या खेळाच्या मैदानासारखा विशिष्ठ असा आकार ठरलेला नसतो आणि या खेळाच्या मैदानाला ‘कोर्स’ असे म्हणतात. गोल्फ कोर्सवर हिरवेगार गवत असते आणि त्यावर अनेक छिद्र असतात या छिद्रांची संख्या कमीत कमी ९ आणि जास्तीत जास्त १८ छिद्रे असतात. जर हा खेळ वैयक्तिक असेल तर १ विरुध्द १ असतो आणि जर गटामध्ये असेल तर एका गटामध्ये १ ते ४ खेळाडू असतात.

हॉकी – hockey

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

हॉकी हा खेळ सांघिक खेळ आहे आणि तो २ संघामध्ये खेळला जातो. हॉकी हा एक लोकप्रिय आणि मनोरंजक खेळ असून हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जातो. एकूण ११ खेळाडू असतात त्यामधील ५ खेळाडू राखीव असतात. हॉकी खेळाचे मैदान आयताकृती असते आणि मैदानाची लांबी ९० मीटर आणि रुंदी ६० मीटर असते. हॉकी हा एक खेळ आहे ज्यामध्ये दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात ज्यामध्ये हॉकी स्टिकचा वापर करून प्रतिस्पर्ध्याच्या गोलमध्ये चेंडूचा घसरण करण्याचा प्रयत्न करतात. ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा सुवर्ण पदक आणि सलग अनेक सामने जिंकले आहेत.

जीमनॅस्टीक – gymnyastics

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

पूर्वीच्या काळामध्ये जीमनॅस्टीक खेळण्यासाठी भरपूर बळ आणि ताकदीची गरज लागत होती पण आताच्या काळामध्ये या खेळासाठी अनेक यांत्रिकी सामग्री उपलब्ध असल्यामुळे शारीरिक ताकदीची इतकी गरज लागत नाही. जीमनॅस्टीक या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये केला गेला आहे.

कराटे – karate

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

करते या खेळाची ओळख १९ व्या शतकामध्ये ओकीनावा येथे झाली परंतु असे म्हणतात कि १९२० मध्ये हा प्रकार जपानमध्ये उदयास आला. या खेळाच्या विविध स्पर्धा असतात आणि त्या खेळाडूच्या वजनावर विभागलेल्या असतात. हा खेळ देखील ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

जुडो- judo

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

जुडो हा एक खेळ आहे जो पूर्वीच्या काळी संरक्षणासाठी खेळला जायचा. जुडो हा खेळ देखील कराटे सारखाच असतो. या खेळामध्ये कोणतेही शस्त्र किवा अस्त्र वापरले जात नाही तर या खेळामध्ये आपल्या हाताचा वापर करून खेळला जातो. जुडो हा खेळ देखील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट केला गेला आहे..

हॅन्डबॉल – handball 

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

हँडबॉल हा एक जलद गतीचा सांधिक खेळ आहे ज्यामध्ये पळणे, उडी मारणे आणि फेकणे याचा समावेश आहे. हा खेळ संघामध्ये खेळला जातो आणि हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळत असतात. या दोन संघांमध्ये प्रत्येकी ७ २ खेळाडू असतात आणि त्यामध्ये १ गोलरक्षक आणि राहिलेले ६ बाहेरील खेळाडू असतात. या खेळाचे मुख्य २ प्रकार आहेत आणि ते म्हणजे मैदानी खेळ (outdoor game) आणि बंदिस्त जागेतील खेळ (indoor game).

हँडबॉल गेम ६० मिनिटाचा असतो आणि १५ मिनिटांचा ब्रेक असतो आणि प्रत्येक ३० मिनिटांच्या दोन कालावधीत विभागले गेले आहे. या खेळाचे मुख्य उद्दीष्ट प्रतिस्पर्ध्याच्या गोलमध्ये चेंडू फेकणे हे असते. हँडबॉल खेळाचे मैदान आयताकृती असते आणि या मैदानाच व्यास ४० बाय २० मीटर असून मैदानाला कोर्ट म्हंटले जाते.

नेमबाजी – shooting

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

नेमबाजी म्हणजे दूरदूरच्या ठिकाणी प्रक्षेपणासाठी नेम धरून मारणे किंवा शूट करण्याची स्पर्धा. प्राचीन काळी नेमबाजी दगड किवा धनुष्य आणि बाण वापरून नेमबाजी करत होते. बंदुकांचा वापर करून नेमबाजी ची सुरुवात सामान्यता आधुनिक काळात बंदुकांच्या विकासासह १५ व्या आणि १६ व्या शतकात युरोपमध्ये त्याची झाली. नेमबाजी या खेळाला ऑलिम्पिक खेळामध्येहि खूप महत्वाचे स्थान आहे आणि नेमबाजीचे ऑलिम्पिक अथेन्स १८९६ पासून सुरु झाले.

त्यानंतर ऑलिम्पिक गेम्स मेक्सिको १९६८ पासून स्त्रिया देखील नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागल्या. ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजी कार्यक्रम म्हणजे पिस्तूल, रायफल आणि शॉटगन या तीन शाखांच्या एकूण १५ कार्यक्रमांचा समावेश असतो. ऑलिम्पियन सहा पुरुष स्पर्धा, सहा महिला स्पर्धा आणि तीन मिश्र संघात भाग घेतात. ऑलिम्पिक खेळांमधील नेमबाजीच्या कार्यक्रमांची माहिती खाली तक्त्यामध्ये मंडळी आहे.

फुटबॉल / सॉसर – football/ soccer

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे फुटबॉल या खेळाला सॉकर या नावाने देखील ओळखले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडू असतात हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो. हा खेळ खेळत असताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराचा कोणत्याही भागाचा वापर करून बॉल हलवू शकतो पण या खेळामध्ये बॉल पुढे ढकलण्यासाठी जास्तीत जास्त पायाचा वापर केला जातो पण बॉल पकडण्यासाठी गोलरक्षक हाताचा वापर करू शकतो.

फुटबॉल खेळाचे मैदान हे आयताकृती असून या मैदानाची लांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते. या खेळामध्ये २ गट असतात आणि ते एकमेकांविरुध्द खेळल्यूत. हा खेळ ४५ मिनिटाचा असतो आणि या मध्ये १५ मिनिटाचा ब्रेक असतो.

स्विमिंग – swimming

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

स्विमिंग हि एक पाण्यामध्ये हालचाल करून पाण्यावरती तरंगण्याची कला आहे. पूर्वीच्या काळात हा एक व्यायामाचा प्रकार होता पण आता त्याचे स्वारूप बदलले आहे आता या कडे खेळ म्हणून पहिले जाते. हा खेळ अनेक स्पर्धेमध्ये समाविष्ट केला आहे आणि हा खेळ ऑलिम्पिक मध्ये देखील समाविष्ट केला आहे.

टेबल टेनिस – table tennis

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

टेबल टेनिस हा खेळ २ किवा ४ खेळाडूंमध्ये खेळला जातो आणि हा खेळ खेळण्यासाठी रॅकेट आणि चेंडू लागतो तसेच हा खेळ इनडोअर खेळला जातो कारण ह्या खेळाला मैदान लागत नाही तर एक विशिष्ट प्रकारच्या टेबलची गरज असते बहुतेक त्या टेबलाला टेनिस कोर्ट म्हटले जाते ते समान दोन भागामध्ये मधी जाळी लावून विभागलेले असते.

वेटलिफ्टिंग-weightlifting

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

वेटलिफ्टिंग म्हणजे एक लांबलचक लोखंडी कांबी असते आणि तिच्या दोन्ही बाजूला दोन वजनदार वर्तुळाकार चकत्या असतात आणि ते आपल्या दोन्ही हातांनी डोक्याच्या वरती उचलण्याची कला म्हणजे वेटलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग हा खेळ देखील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळवला जातो.

ब्रेकडान्सिंग – breakdancing

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

ब्रेकडान्सिंग या खेळाला ब्रेकिंग किवा बी बोईंग या नावानेदेखील ओळखले जाते. हा खेळ म्हणजे नृत्य करण्याचा एक उत्साही प्रकार ज्यामध्ये बॅक स्पीन, स्टायलीज्ड फुटवर्क, हेड स्पीन सारख्या अथलीट चालींचा समावेश असतो.

स्केटबोर्डिंग – skateboarding

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

स्केटबोर्डिंग हा एक मनोरंजनाचा आणि खेळाचा प्रकार आहे. ज्यामध्ये चाक लावलेल्या छोट्याश्या फळीवर संतुलन राखले जाते. १९५९ मध्ये प्रथम व्यावसायिक स्केटबोर्डिंग खेळले जावू लागले.

नेटबॉल – netball

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

नेटबॉल हा खेळ सांघिक खेळ असून हा थोडासा बास्केट बॉल खेळासारखाच असतो. या खेळाची सुरुवात इंग्लंड मध्ये १९ व्या शतकापासून झाली.

कुस्ती- wrestling

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून म्हणजेच महाराज्यांच्या काळा पासून खेळला जाणारा खेळ आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुस्ती या खेळाला मल्ल युध्द या नावाने संबोधले जायचे तसेच कुस्ती हा खेळ कुश्ती या पार्शी शब्दापासून आला आहे. हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूला पैलवान म्हंटले जाते आणि कुस्ती हा खेळ खेळण्यासाठी पेलवाणाची शरीरयष्टी चपळ आणि बुध्दी तेज असावी लागते आणि या खेळाचे मैदान चौरस किवा वर्तुळाकार असू शकते आणि या मैदानाला आखाडा म्हंटले जाते. या खेळामध्ये २ प्रतिस्पर्धी असतात आणि ते एकमेकांविरोधी खेळतात.

अॅथलेटीक्स- athletics

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

अॅथलेटिक्स हा स्पोर्टिंग इव्हेंटचा (ऑलम्पिक) एक गट आहे ज्यामध्ये स्पर्धात्मक धावणे, गोळा फेकणे, थाळी फेक, उडी मारणे, आणि चालणे या सारखे एका व्यक्तीने खेळले जाणारे खेळ समाविष्ट असतात. अॅथलेटिक्स स्पर्धेचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ट्रॅक आणि फील्ड, रस्ता धावणे, क्रॉस कंट्री रनिंग आणि रेस वॉकिंग.

पोलो- polo

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

पोलो खेळ म्हणजे घोड्यावरून जो काठीने चेंडू मारून खेळला जातो आणि हा खेळ चार खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान घोड्यावर बसून गवताच्या मैदानावर खेळला जातो. यामध्ये खेळ खेळण्यासाठी एक लाकडी बॉल आणि तो बॉल मारण्यासाठी एक लवचिक हँडल्स असलेले स्टिक किवा मालेट वापरले जातो. पोलो हा खेळ गवताच्या मैदानावर खेळला जातो आणि पोलो या खेळाचे मैदान ३०० यार्ड लांबीचे आणि २०० यार्ड रूंद असते. पोलो हा जगातील सर्वात जुना ज्ञात संघ खेळ आहे आणि या खेळाची संकल्पना आणि त्यातील रूपे पूर्वपूर्व ६ व्या शतकापासून ते पहिल्या शतकापर्यंतची आहेत आणि या खेळाचा शोध इराणमध्ये लागला. पोलो हा खेळ ऑलम्पिक स्पर्धेमध्ये देखील समाविष्ट आहे.

ऑलिंपिक खेळात भारत

भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९चा  १२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग सन १९०० मध्ये झाला. त्यावेळी नॉर्मन प्रितचार्ड ह्या एकमेव ॲथलिटने भारतातर्फे भाग घेतला, ज्यामध्ये त्याने २ पदके मिळविली. देशाचा पहिला संघ १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाठविला गेला

==इतिहास==

१९२० च्या संघात २ कुस्तीगीर, ३ ॲथलिट आणि मॅनेजर यांचा समावेश होता. ४ खेळाडूंमधून, फक्त फाडेप्पा चौगुले हा एकच खेळाडू मॅरेथॉन पूर्ण करु शकला. ४२.७५० किमी अंतर पार करण्यासाठी त्याने २ तास ५० मिनीटे आणि ४५.४ सेकंद अशी वेळ दिली आणि १९ व्या क्रमांकासह भारताचा पहिला ऑलिंपिक मॅरेथॉन धावपटू होण्याचा बहूमान फाडेप्पा चौगुले याला मिळाला.

आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत. बऱ्याच काळापर्यंत भारतचा पुरूष हॉकी संघ ऑलिंपिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता. १९२८-१९५६ या काळात लागोपाठ मिळविलेल्या ६ सूवर्ण पदकांसह, १९२८-१९८० या १२ वर्षांच्या कालखंडात पुरूष हॉकी संघाने तब्बल ११ पदके मिळविली.

भारतीय ऑलिंपिक असोसिएशन ह्या भारताच्या राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची स्थापना १९२७ साली झाली.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक भारतासाठी सर्वांत जास्त यशस्वी ठरले. यावेळी भारताला ६ पदके मिळाली (२५ मी रॅपिड फायर नेमबाजी मध्ये विजय कुमारला रौप्य पदक, ६६ किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये सुशिल कुमारला रौप्य पदक, प्रत्येकी एक कांस्य पदक १० मीटर एर रायफल नेमबाजी मध्ये गगन नारंग, महिला एकेरी बॅटमिंटन मध्ये सायना नेहवाल, ५१ किलो बॉक्सिंग मध्ये मेरी कोम आणि ६० किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये योगेश्वर दत्त यांना मिळाले)

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताकडून आतापर्यंत सर्वांत जास्त ८३ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. याशिवाय भारतीय खेळाडूंनी एकूण ५५ क्रिडाप्रकारांत भाग घेतला, ही सूद्धा भारताची आतापर्यंतची सर्वांत मोठी मिळकत म्हणावी लागेल. एकूण पदकांच्या संख्येनुसार विचार केल्यास हे ऑलिंपिक भारतासाठी सर्वात जास्त यशस्वी ठरले.

सुशील कुमार हा नॉर्मन प्रितचार्ड(ज्याने ब्रिटीश राजवटीतील भारताकडून खेळताना दोन पदके जिंकली होती) नंतर एकच क्रिडाप्रकारात २ ऑलिंपिक पदके मिळविणारा पहिला भारतीय ठरला.

पदक विजेते

पदक नाव स्पर्धा खेळ प्रकार
Silver medal icon.svg रजत नॉर्मन प्रितचार्ड १९०० पॅरिस ऍथलेटिक्सऍथलेटिक्स पुरुष २०० मीटर
Silver medal icon.svg रजत नॉर्मन प्रितचार्ड १९०० पॅरिस ऍथलेटिक्सऍथलेटिक्स पुरुष २०० मीटर हर्डर्ल्स
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९२८ एम्सटर्डम हॉकीहॉकी पुरुष
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९३२ लोस एंजेलेस हॉकीहॉकी पुरुष
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९३६ बर्लिन हॉकीहॉकी पुरुष
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९४८ लंडन हॉकीहॉकी पुरुष
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९५२ हेलसिंकी हॉकीहॉकी पुरुष
Bronze medal icon.svg कास्य खाशाबा जाधव १९५२ हेलसिंकी कुस्तीकुस्ती पुरुष फ्रीस्टाइल बॅंटाम्वेइघ्त
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९५६ मेलबर्न हॉकीहॉकी पुरुष
Silver medal icon.svg रजत राष्ट्रीय संघ १९६० रोम हॉकीहॉकी पुरुष
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९६४ टोकियो हॉकीहॉकी पुरुष
Bronze medal icon.svg कास्य राष्ट्रीय संघ १९६८ मेक्सिको हॉकीहॉकी पुरुष
Bronze medal icon.svg कास्य राष्ट्रीय संघ १९७२ मुनिच हॉकीहॉकी पुरुष
Gold medal icon.svg सुवर्ण राष्ट्रीय संघ १९८० मोस्को हॉकीहॉकी पुरुष
Bronze medal icon.svg कास्य लिएंडर पेस १९९६ अटलांटा टेनिसटेनिस पुरुष एकेरी
Bronze medal icon.svg कास्य कर्णम मल्लेस्वरी २००० सिडनी वेटलिफ्टिंगवेटलिफ्टिंग महिला ६९ की.ग्रा.
Silver medal icon.svg रजत राजवर्धन सिंघ राठौर २००४ अथेन्स नेमबाजीनेमबाजी पुरुष डबल ट्रैप
Gold medal icon.svg सुवर्ण अभिनव बिंद्रा २००८ बीजिंग नेमबाजीनेमबाजी पुरुष १० मीटर एर रायफल
Bronze medal icon.svg कास्य सुशिल कुमार २००८ बीजिंग कुस्तीकुस्ती फ्रीस्टाइल ६६ कि.ग्रा.
Bronze medal icon.svg कास्य विजेंदर सिंग २००८ बीजिंग बॉक्सिंगबॉक्सिंग मिडलवेट
Bronze medal icon.svg कास्य गगन नारंग २०१२ लंडन नेमबाजीनेमबाजी पुरुष १० मीटर एर रायफल
Silver medal icon.svg रजत विजय कुमार २०१२ लंडन नेमबाजीनेमबाजी पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल
Silver medal icon.svg रजत सुशिल कुमार २०१२ लंडन कुस्तीकुस्ती पुरूष फ्रिस्टाईल ६६ किलो
Bronze medal icon.svg कास्य सायना नेहवाल २०१२ लंडन बॅडमिंटनबॅडमिंटन महिला एकेरी
Bronze medal icon.svg कास्य मेरी कोम २०१२ लंडन बॉक्सिंगबॉक्सिंग महिला फ्लायवेट
Bronze medal icon.svg कास्य योगेश्वर दत्त २०१२ लंडन कुस्तीकुस्ती पुरूष फ्रिस्टाईल ६० किलो
Silver medal icon.svg रजत पी. व्ही. सिंधू २०१६ रियो बॅडमिंटनबॅडमिंटन महिला एकेरी
Bronze medal icon.svg कास्य साक्षी मलिक २०१६ रियो कुस्तीकुस्ती महिला फ्रीस्टाईल ५८ किलो

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम