Janta Curfew : मी आज जनता कर्फ्यु पाळणार. हा संदेश मी माझ्या सर्व मित्रांना, कुटुंबियांना व आप्तेष्टांना पाठवत आहे.

158

मी आज जनता कर्फ्यु पाळणार.
होय, आपण सगळे मिळून या जागतिक संकटावर विजय मिळवु शकतो.

जनता कर्फ्यु
जनता कर्फ्यु

आपण जाणता कोविड – १९ हा नवीन प्रकारचा व्हायरस आहे, याने जगातील अती प्रगत देशांमध्ये थैमान घातले आहे.
भारतात त्याची मोठ्या संख्येने लागण होत आहे.

ज्या राष्ट्रांना मानव हानी झेलावी लागली त्यात इटली व चीन चां नंबर फार मोठ्ठा आहे.

त्यांच्या झालेल्या चुका आपण टाळल्या तर सर्वांचे कल्याण होईल.

“समोरच्यास ठेच मागचा शहाणा” या उक्ती प्रमाणे ज्या ठेचा त्या राष्ट्रांना लागल्या त्या आपण आपल्याला लागू देणार नाही.

या साथीच्या रोगाचा प्रसार थाबवणे गरजेचे आहे.

आणि ते कठीण नाही.

गर्दी न करणे व गर्दीच्या ठिकाणी न जाणे हे प्रसार थांबवण्याचे उपाय सांगितले आहेत.

आज सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजे पर्यंत आपण घरात राहू.

जान है तो जहान हैं…..
हा संदेश मी माझ्या सर्व मित्रांना, कुटुंबियांना व आप्तेष्टांना पाठवत आहे.

या सर्वांचे माझ्या आयुष्यात फार मोलाचे स्थान आहे.

तुम्ही आहात म्हणून मी आहे.
काळजी घ्या.
या संकटातून आपण सगळे नक्की सुखरूप बाहेर निघणार हा मला विश्वास आहे.

जय हिंद..

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम