आजपासून जम्मू काश्मीर, लडाख केंद्रशासित प्रदेश; जाणून घ्या काय होणार बदल ?

188

जम्मू काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांची आजची पहाट एक राज्य नाही तर केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांच्या रूपात झाली. लोकसभेत मंजूर झालेल्या जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयकानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख मध्यरात्री १२ वाजल्यापासून केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी हा मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचा निर्णय घेतला होता.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा समाप्त करून त्याऐवजी जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या बदलांबरोबरच आजपासून या ठिकाणी मोठे बदलही दिसणार आहेत. यापुढे जम्मू काश्मीरचे स्वत:चे संविधान आणि कोणताही स्वतंत्र झेंडा नसेल. तसंच दोन केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे आचा राज्यांची संख्या २८ झाली आहे. तर एकूण ९ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये जी.सी.मुर्मू आणि लडाखमध्ये आर.के माथूर यांची उपराज्यपालपदी नियुक्ती केली आहे. लडाखच्या उपराज्यपालपदी विराजमान होणाऱ्या माथूर यांचा शपथविधीही पूर्ण झाला आहे. याव्यतिरिक्त एक महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने हे केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनाची निवड केली आहे. त्यांचा जयंतीदिन सरकार ‘राष्ट्रीय एकचा दिवस’ म्हणून साजरा करत आहे. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर ५६० संस्थानं भारतात विलीन करून घेण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोलाचा वाटा होता.

काय होतील बदल…

आजपासून प्रशासनिक आणि राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने या ठिकाणी अनेक मोठे बदल होणार आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये १११ विधानसभेच्या जागा होत्या. त्यापैकी ४ लडाखच्या होत्या. परंतु आता हे संपुष्टात येणार आहे. केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या १०७ जागा असतील. परंतु त्या ११४ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यापैकी ८३ जागांसाठी निवडणूक घेण्याचत येणार आहे. तर दोन जागा नामनिर्देशन पत्राद्वारे भरल्या जाणार आहेत. तर २४ जागा पाकव्याप्त काश्मीरसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार जागांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा आणि विधानपरिषद होती. परंतु यापुढे आता या ठिकाणी केवळ विधानसभाच असेल.

लडाखमध्ये विधानसभा नाही

जम्मू काश्मीरच्या अगदी उलट स्थिती लडाखमध्ये असेल. या ठिकाणी विधानसभा नसेल. या ठिकाणी चंढीगड मॉडेल लागू करण्यात आलं आहे. या ठिकाणी लोकसभेची एक जागा, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, परंतु विधानसभा नसेल. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून उपराज्यपाल या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था सांभाळतील.

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम