व्यक्तीविशेष : कैसर-ए-हिंद सूर्यभान जानजी आढे

कैसर-ए-हिंद सूर्यभान जानजी आढे यांची आज १०४ वी पुण्यतिथी

290

 डॉ.ज.पां.खोडके लिखित कैसर-ए-हिंद सूर्यभान जानजी आढे या पुस्तकातून साभार

कैसर-ए-हिंद ,शिक्षण महारथी  सूर्यभान जानजी आढे ( जन्म १८५८ – निधन १९१८)

[ मुख्याध्यापक मराठी शाळा , केळीवेळी ता.अकोट ,जि. अकोला,विदर्भ ,महाराष्ट्र ]

 

कैसर-ए-हिंद सूर्यभान जानजी आढे

कैसर-ए-हिंद सूर्यभान जानजी आढे यांची आज पुण्यतिथी. नव्या पिढीस या महापुरुषाची माहिती व्हावी म्हणून  हा लेख सादर करीत आहोत.

जीवनपरिचय : 

सूर्यभानजींचे आजोबा कृष्णाजी आढे पळसोद या गावचे त्यांचे वडील जानजी आणि आई आनंदाबाई . सूर्यभानजी चा जन्म ०५ जानेवारी १८५८ ला झाला.  त्यांना दोन बंधू आणि तीन बहिनी होत्या. त्यांचे वय ४-५ वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांनी पीक होत नाही म्हणून जवळच्या नातेवाईकाला जमीन मोफत देऊन टाकली होती इतके साधे भोळे होते. पळसोद च्या  गावठी शाळेत नियमित शाळा होत नसल्याने ते रेल ता. अकोट जि. अकोला येथे सरकारी शाळेत दाखल झाले तिथे त्यांची आत्या राहत होती पण त्यांचीही गरिबी होती. तिथे त्यांचे मन रमेना, एक दिवस बहिणीच्या गावचा – बोर्डीचा पाहुना आला त्याचे कडे  सूर्यभानजींनी शिक्षणाविषयीची होत असलेली गैरसोय सांगितली आणि वडिलांना न सांगता ते गुपचूप बहिणीकडे पाहूण्याबरोबर निघून गेले. त्यांच्या बहिणीची परिस्थिती जेमतेम होती मोलमजुरी करावी व पोट भरावे अशी परिस्थिती होती. सूर्यभानजी कष्टाळू होते,  तेही मिळेल ते काम करून बहिणीला व जावयाला मदत करीत. होतकरू असल्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे ते आवडते विद्यार्थी होते. पाचव्या वर्गात शिकत असताना त्यांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मे. डे . इंस्पेक्टर ऑफ स्कूल्स यांच्याकडे नोकरीसाठी अर्ज केला.  काही दिवसांनी त्यांना सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली. ज्या गावी विद्यार्थी त्याच गावी ते महिना पाच रुपये पगारावर शिक्षक म्हणून रुजू झाले. 

विवाह :

  • बोर्डी या ठिकाणी  नोकरी करीत असताना कठोरा ता जळगाव जामोद येथील शिवरामजी खवले यांच्या सावित्रीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. शिवरामजींनी त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता त्यांच्या गुणांची पारख करून निवड केली .
  • बोर्डी इथे दोन वर्ष नोकरी केल्यानंतर ते ‘में .डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन ऑफ वऱ्हाड’ यांच्या हुकूमावर त्यांना सेकंड इयर ट्रेंडच्या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले . सेकंड इयर ट्रेंड झाल्यावर महिना बारा रुपये पगारावर त्यांची घुसर (ता अकोला )येथे नेमणूक झाली .इथे त्यांनी चांगले मुख्यध्यापक म्हणून नाव मिळवले .दोन वर्षानंतर त्यांची केळीवेळीला बदली झाली .गाव सोडण्यापूर्वी त्यांनी शेवटच्या रात्री ‘रासक्रीडा ‘व दामाजीपंतांचा ‘फार्स ‘ हि नाटके गावकऱ्यांसाठी केले आणि दुसऱ्या दिवशी निरोप घेतला .गावकर्यांनी दुःखी अंतःकरणाने निरोप दिला .

केळीवेळी ची शाळा :

  • १८८२ च्या डिसेंबर ला ते केळीवेळी ला रुजू झाले.  केळीवेळी ची शाळा फारशी सुधारलेली नव्हती .
  • केळीवेळी च्या शाळेची स्थापना  १८ जून १८६९  साली झाली .मुख्यध्यापक सुर्यभानजी आले तेव्हा पटावर ३५ विद्यार्थी होते .त्यांनी दोन महिन्यात ३ विद्यार्थी  वाढवून संख्या ३८ झाली .त्यापैकी ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .०२ शिक्षक व चवथ्या वर्गापर्यंत शाळा होती .या शाळेची प्रगती व्हावी म्हणून ते कामाला लागले . १८८३ साली विद्यार्थी  संख्या वाढून ५८ झाली .नि २३ विद्यार्थी  उत्तीर्ण झाली .हे पाहून गावकरी भलतेच खुश झाले .चांगले मुख्याध्यापक म्हणून सर्व गावकरी त्यांचा आदर करू लागले .

स्त्री शिक्षणातील कार्य :

  • सुर्यभानजीनी स्त्री शिक्षणात मोलाचे योगदान दिले ,त्यांनी स्त्री शिक्षणापासून फायदे या विषयावर हिंदुस्थानातील सर्व जातीच्या स्त्रियांकडून निबंध मागविले .त्यातील आशय जाणून घेऊन त्यांना वैयक्तिक बक्षिसीही पाठवली .या दरम्यान गावातील एका सदगृहस्थने आपल्या मुलीचे नाव शाळेत टाकले .सतत २-३ महिन्याचा प्रयत्नाने ,त्यांना १५-२० विद्यार्थीनी मिळाल्या .
  • मुलींची शाळा चालवण्यासाठी त्यांनी पत्नी सावित्रीबाईला शिकवून तयार केले .त्यासाठी त्यांनी ६ वा वर्ग उत्तीर्ण एका विद्यार्थ्यांची नेमणूक केली .तो त्यांना नियमित शिकवायचा .तेही अधूनमधून मार्गदर्शन करीत .सावित्रीबाई आढे यांची २ मार्च १८८६ ला स्त्रीशिक्षका म्हणून नेमणूक झाली केळवेलीला आल्यावर त्यांनी तीन वर्षाच्या आत ,त्यांनी मुलींची शाळा सुरु केली .एकूण ३०-३५ विदयार्थींची भरती झाली .पाचव्या वर्गापर्यंत त्यांना शिकवल्या जाई
  • गोरगरिबांच्या मुलांसाठी त्यांनी नाईट स्कूल सुरु केली .
  • हायस्कूलच्या विद्यार्थ्यंना शिक्षण घेण्यासाठी व विशेषतः इंग्रजीसाठी अकोल्याला जावे लागे .ती सोय त्यांनी गावातच उपलब्ध करून दिली .
  • त्याकाळी दोन अमेरिकन विद्यार्थी मराठी शिकण्यासाठी केळीवेळीत आले होते .सुर्यभानजीनी त्यांना मराठी शिकण्यासाठी मदत केली .

वसतिगृह ,देखरेख व इमारत :

  • विद्यार्थ्याची संख्या वाढावी म्हणून स्वखर्चाने १८८५ साली बोर्डिंग सुरु केले त्यात सुरवातीला १०-१२ विध्यार्थी  होते नंतर ८०-८५ झाले . प्रत्येक मुलाला दोन अडीच रुपये खर्च येत असे .
  • १८८५ साली वाचनालय सुरु केले यात वऱ्हाड समाचार ,शाळापत्रक इत्यादी नियतकालिके येत याचा उपयोग गावकरी पण घेत होते .
  • १८९६ साली दुष्काळात त्यांनी अन्नदान केले .
  • बोर्डिंगची मुले आजारी पडत तेव्हा त्यांच्यासाठी त्यांनी ‘आर्यभिषेक मासिकाच्या ‘  माहितेप्रमाणे औषधे तयार करून घेतली .
  • केळीवेळीत पोस्ट ऑफिस सुरु केले त्याद्वारे गावकऱ्यांना पत्रे ,लिफापे,पार्सल ,मनिऑर्डर यांची सेवा जलद मिळू लागली .

अकोला जिल्ह्यात सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ : केळीवेळी व पळसोद येथील सहकारी पतपेढी 

  • १९०७ मध्ये केळीवेळी व पळसोद येथे त्यांनी पहिली पतपेढी सुरु केली  , ते स्वतः केळीवेळी पतपेढीचे सेक्रेटरी होते .ते काम त्यांनी उत्तमपणे सांभाळले कि वर्तमानपत्रातून त्यांची चर्चा होऊ लागली .
  • सुर्यभानजींनी क्रेडिट सोसायट्या चालवून गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन त्यांना सावकाराच्या मगरमिठीतून मुक्त केले ,ही त्यांची देशसेवा होय .

खेडोपाडी शाळा स्थापनेत पुढाकार :

  • केळीवेळीच्या आसपास त्याकाळी अजिबातच शाळा नव्हत्या.  सूर्यभानजींचा लौकिक सर्वत्र पसरला होता त्यांनी खेडोपाडी जाऊन लोकांची मने वळवून किनखेड, निंभोरा, म्हातोडी ,आपोती , पातोंडा , दोनवाडा , पळसोद, कावसा या गावांमध्ये  प्रथम गावठी शाळा सुरू केल्या त्या चांगल्या चालतात हे लक्षात येताच त्यांनी सरकारी शाळा बनवण्यासाठी सरकार दरबारी आपले वजन खर्च करून सरकारी शाळा बनवल्या.
  • महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारा शिक्षण महारथी म्हणजे सूर्यभान जानजी आढे हे होत !

सन्मान :

१. कैसर -इ -हिन्द :

  • राजनिष्ठा ,उत्तम देशसेवा  आणि सेवाभावी वृत्तीने केलेली समाजसेवा लक्षात घेऊन इंग्रज सरकारने त्यांना दिनांक ११ जुलै १९०९ रोजी कैसर -इ -हिन्द हा बहुमान दिला . हा पुरस्कार त्यांना विद्याखात्यातील सेवा व समाजसेवा यांना अनुलक्षून देण्यात आला .नागपूरला त्यांना हा पुरस्कार देण्यात आला .
  • तेथून आल्यावर त्यांच्या स्मरणार्थ केळीवेळीकरांनी पानसुपारीचा समारंभ मोठ्या थाटाचा केला.

२ .राष्ट्रीय सन्मान :

  • सन १९०३ साली बादशहा सप्तम एडवर्ड यांच्या राजरोहणाप्रसंगी दिल्ली येथे सुर्यभानजीला सरकार द्वारा राष्ट्रीय सम्मानदर्शक प्रशस्ती पत्र देण्यात आले .
  • १२ डिसेंबर १९१२ ला सुर्यभानजीला ‘दरबार – डे’ चे निमंत्रण मिळाल्यावरून दिल्लीला जावे लागले .त्या दरबारात सुर्यभानजींना गौरवपत्र देण्यात आले .
  • गव्हर्नर जनरल यांच्या हुकुमावरून महाराज पाचवे जॉर्ज हिंदुस्थानचे बादशहा यांच्या नावाने १८८० साली  पतपेढी आणि प्लेगच्या देवी टोचण्याच्या कामात मदत केल्या बद्दल  सर्टिफिकेट देण्यात आले .

३. लंडनच्या रॉयल सोसायटीचे मेंबर :

कैसर -इ -हिन्द हा बहुमान दिल्यावर ब्रिटिश सरकारचे समाधान झाले नाही म्हणूंन कि काय सुर्यभानजींना ब्रिटिश सरकारने लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य करून घेतले.

सुर्यभानजीचे मानसपुत्र :

  • संन्यासी अरविंद हे सुर्यभानजीचे मानस पुत्र होते
  • पूर्णा नदीच्या पात्रात वाहत येणाऱ्या या बालकाला सुर्यभानजींनी काढले. ते निपुत्रिक होते त्यांनी पाण्यावर कमळ उगवते म्हणून याचे नाव त्यांनी अरविंद ठेवली .अरविंद कुमारचे पालनपोषण सुर्यभानजीनी केले .
  • त्यांच्या प्रयत्नामुळे सर्वहारा जनतेला ज्ञानचक्षु मिळून सामाजिक क्रांती झाली .बहुजन समाजामधील उत्थानामधील त्यांचे कार्य  ऐतिहासिक व चिरस्थायी आहे .

सूर्यभानजींचा जीवन सूर्यास्त

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कैसर-ए-हिंद सूर्यभानजी आढे,सावित्रीबाई आढे, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील ,महर्षी धोंडो कर्वे ,डॉक्टर पंजाबराव देशमुख या मानवतावादी मंडळींनी शिक्षणाच्या प्रचारासाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. यांच्या प्रयत्नामुळे सर्वहारा जनतेला न्याय मिळून सामाजिक क्रांती झाली. बहुजन समाजाच्या उत्थानाचा मधील यांचे त्याचे कार्य चिरस्थायी आहे.

सूर्यभानजी व सावित्रीबाई या दोघांनी वऱ्हाड प्रांती केलेली शिक्षण सेवा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे अहर्निश झटणारे सूर्यभानजी मनाने नव्हे पण शरीराने थकले होते नोकरीतून जरी ते निवृत्त झाले पण सेवेतून त्यांनी निवृत्ती स्वीकारली नव्हती. केळीवेळीचे सुदर्शन चक्र त्यांनी अव्याहत फिरते ठेवले त्याची गतिमानता कमी होऊ दिली नाही.  पण ज्वराने त्यांना पछाडले व २६/११/१९१८  रोजी त्यांची हृदय गती थांबली व या कर्मवीरांनी चिरविश्रांती साठी प्रस्थान केले. सूर्यभानजींच्या जीवनसूर्याचा अस्त झाला तो पौर्णिमेचा दिवस होता. 

भारतभूमीचे सुपुत्र कैसर-ए-हिंद सूर्यभान जानजी आढे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!!


या लेखातील माहिती विदर्भातील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. ज. पा. खोडके यांच्या कैसर-ए-हिंद सूर्यभानजी आढे या पुस्तकातून साभार घेतलेली आहे.  

खालील लिंक वर पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती पाहू शकता .

पुस्तक : कैसर-ए-हिंद सूर्यभान जानजी आढे

लेखक : डॉ. ज.पां. खोडके

लिंक : https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5158537612595517464


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम