कृषी अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक 2024 जाहीर
Krishi Vidyapeeth CET Application Form Dates
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Krishi Vidyapeeth CET Application Form Dates
तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उतीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठीचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत तीन वर्षांच्या इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून प्रथमच पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यास सुरूवात झाली आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज २६ जून ते ५ जुलैपर्यंत करता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होऊन पहिली फेरी १४ जुलै रोजी सुरु होणार आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ जुलै असणार आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २०२४ चे (पीजी सीईटी २०२४) आयोजन करण्यात आले आहे.
पीजी सीईटी २०२४ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १ ते २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर याची ६ मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली. आता या प्रवेश परीक्षेसाठी पुन्हा ७ ते २० मार्च अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर २२ मार्चपर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. प्रवेश परीक्षेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले असून ३१ मे ते २ जून कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहे. अधिक माहितीसाठी https://www.mcaer.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी दिली.
App Download Link : Download App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents