Krushi Sevak Bharti 2023 : खुशखबर! कृषी सेवक भरती सुरु, 2070 रिक्त पदांच्या नवीन जाहिराती आल्यात!!
Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या 2588 जागांपैकी 2070 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), नाशिक, नागपूर,पुणे,कोल्हापूर,अमरावती,ठाणे आणि लातूर या विभागाच्या अधिसूचना जाहीर झाल्या आहेत. इतर विभागाच्या जाहिराती सुद्धा लवकरच जाहीर होतील. याआधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी 80 टक्के जागाच भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने 2070 जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता.
🔥जिल्हयानुयार लिंक खाली दिलेल्या आहेत🔥
महाराष्ट्र कृषी सेवक भरतीला अखेर सुरवात झाली आहे. राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची भरपूर रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची सविस्तर जाहिरातजिल्हा निहाय लिंक्स आम्ही खाली देत आहोत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. सध्या या भरती अंतर्गत नाशिक,लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या 2070 पदांच्या भरतीच्या जाहिराती आल्या आहे. अन्य जिल्ह्यांच्या जाहिराती आम्ही लवकरच MPSCEXxams.com वर प्रकाशित करू. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी MPSCEXxams चे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- उमेदवारांनी कृषी सेवक भरती साठी वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
- तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
- उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
🔥जिल्हयानुयार लिंक खाली दिलेल्या आहेत🔥
👉🏻कृषी सहसंचालक नागपूर विभागात 448 रिक्त पदांची भरती
👉🏻कृषी विभाग पुणे मध्ये 188 रिक्त पदांची भरती
👉🏻 कृषी सहसंचालक लातूर विभागात विविध 170 रिक्त पदांची भरती
👉🏻 कृषी सहसंचालक नाशिक विभागात विविध 336 रिक्त पदांची भरती
👉🏻कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात २५० रिक्त पदांची भरती
👉🏻 कृषी सहसंचालक औरंगाबाद विभागात 196 रिक्त पदांची भरती सुरू
👉🏻 कृषी सहसंचालक अमरावती विभागात 227 रिक्त पदांची भरती सुरू
👉🏻 कृषी सहसंचालक ठाणे विभागात 255 रिक्त पदांची भरती सुरू
👉🏻 महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023
Krushi Sevak Bharti 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
कृषी सेवक भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या कृषी सेवकाची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची पदविका किंवा कृषी पदवी
वयोमर्यादा: कृषी सेवक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खाली देण्यात आली आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
Krushi Sevak Bharti 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क
कृषी सेवक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
मागास प्रवर्ग: रु. 900
Krushi Sevak Bharti 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
ऑनलाईन अर्ज लिंक लवकरच सक्रीय करण्यात येणार आहे.
कृषी सेवक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक सुरु आम्ही या लेखात अपडेट करू
16 total views , 1 views today