MPSCExams.com
One Place for All Exams Notes

व्यक्तीविशेष : लाला लजपतराय [शेर ए पंजाब, पंजाब केसरी]

0 107

Get real time updates directly on you device, subscribe now.

लाला लजपतराय [शेर ए पंजाब, पंजाब केसरी]

 

  • पुर्ण नाव- लाला राधाकिशन लजपतराय
  • जन्म-२८ जानेवारी १८६५ जगरान (लुधियाना-पंजाब )
  • मृत्यू- १७ नोव्हेंबर १९२८ लाहोर ( ६३ वर्ष)

                               शेर.ए.पंजाब या उपाधीने सन्मानित आणि भारतातील महान लेखक लाला लजपत राय यांचा जन्म धुडिके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. वडिलांचे नाव राधाकृष्ण असे होते. ते अग्रवाल (वैश्य) म्हणजे वाणी समुदायातील होते शिवाय एक चांगले शिक्षक म्हणुन देखील परिचीत होते. उर्दु व फारसी भाषेचे ते चांगले जाणकार होते.

                              त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी होते आणि त्या शिख परिवारातील होत्या. त्या एक सामान्य आणि धार्मिक व्यक्तिमत्वाच्या होत्या, आपल्या मुलात देखील त्यांनी धर्म कर्माच्या भावनेची बीजं रूजवली होती. लालाजींच्या परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती.

 शिक्षण 

त्यांचे वडिल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते त्यामुळे लालाजींचे सुरूवातीचे शिक्षण त्याच शाळेत पुर्ण झाले. बालपणापासुन ते अभ्यासात हुशार होते. शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर 1880 साली कायद्याचे शिक्षण घेण्याकरीता लाहौर येथे सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवी मिळवली.

कायद्याचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते एक चांगले वकील देखील झाले. काही काळ त्यांनी वकीली देखील केली पण त्यात त्यांचे मन रमले नाही. या दरम्यान ब्रिटिशांच्या न्याय व्यवस्थेविरूध्द त्यांच्या मनात रोष उत्पन्न झाला. त्या व्यवस्थेला सोडुन त्यांनी बॅंकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला.

पीएनबी आणि लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना 

                  लाला लजपत रायांनी राष्ट्रीय काॅंग्रेस च्या 1888 आणि 1889 या वार्षिक सत्रा दरम्यान प्रतिनीधी म्हणुन सहभाग घेतला, पुढे 1892 साली न्यायालयात सराव करण्याकरीता ते लाहौर येथे गेले. या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व लक्ष्मी विमा कंपनी ची पायाभरणी केली.

                        त्यांच्या निष्पक्ष स्वभावामुळे त्यांना हिसार नगरपालीकेचे सदस्य नियुक्त करण्यात आले यानंतर ते सचिव देखील झाले. बाळ गंगाधर टिळकांनंतर लाला लजपत राय त्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते ज्यांनी पुर्ण स्वराज्याची मागणी केली होती. पंजाब च्या सर्वात लोकप्रीय नेत्यांमधे लाला लजपतराय यांची गणना होऊ लागली.

                       स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय हे 1882 साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहौर वार्षिक उत्सवामधे सहभागी झाले. या सम्मेलनाने ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

                  लाला लजपतराय ज्यावेळी हिसार येथे वकीली करीत होते त्या काळात काॅंग्रेस च्या बैठकांना ते उपस्थित राहात असत. 1885 साली जेव्हां काॅंग्रेस चे पहिले अधिवेशन मुंबई ला झाले त्या वेळी लाला लजपत राय यांनी मोठया उत्साहाने यात सहभाग घेतला होता.

                                                         त्यांच्या कार्याला पाहाता 1920 साली त्यांना नॅशनल काॅंग्रेस चे प्रेसिडेंट म्हणुन नियुक्त करण्यात आले.लाला लजपत राय अश्या व्यक्तिमत्वाचे धनी होते की त्यांना कुणालाही प्रभावीत करण्याची क्षमता त्यांच्यात होती व देशसेवा करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. ते एक प्रामाणिक देशभक्त होते. यामुळेच ते हिसार वरून लाहौर येथे स्थायीक झाले. या ठिकाणी पंजाब उच्च न्यायालय होते. येथे राहुन समाजाकरता त्यांनी अनेक विधायक कामं केलीत.

याशिवाय त्यांनी संपुर्ण देशात स्वदेशी वस्तु स्विकारण्याकरता एक अभियान चालवले. 1905 मधे ज्यावेळी बंगाल चे विभाजन करण्यात आले त्याचा त्यांनी कडाडुन विरोध केला आणि या आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.

सायमन कमिशनचा विरोध शांततेने करण्याची लालाजिंची ईच्छा होती. त्यांचे म्हणणे असे होते की जर कमिशन पैनल मधे भारतिय राहु शकत नाहीत तर या कमिशन ने भारतातुन परत जावे. परंतु ब्रिटीश सरकार त्यांची ही मागणी मानण्यास तयार नव्हते आणि या उलट त्यांनी लाठीचार्ज सुरू केला या अमानुष लाठीचार्ज मधे लाला लजपत राय गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांची प्रकृती खालावत गेली.

लाला लजपत राय यांचे निधन 

या घटनेमुळे त्यांचे मनोबल खचले होते व त्यांची प्रकृती देखील खालावत गेली आणि 17 नोव्हेंबर 1928 रोजी स्वराज्याचा हा उपासक आपल्यातुन कायमचा निघुन गेला. भारताच्या स्वातंत्र्याचा हा महानायक लाला लजपत राय. यांचे जिवन म्हणजे संघर्षाची महागाथा आहे.

आपल्या जीवनात देशाकरीता अनेक लढाया त्यांनी लढल्या. देशाची निरंतर सेवा केली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरीता अथक परिश्रम केले. त्यांच्या त्यागाला हा देश निरंतर स्मरणात ठेवेल.

 

लाला लजपतराय यांच्या जयंती निमित्त विनम्र  अभिवादन !


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

हा मेसेज बंद करण्याकरिता वरील चित्रावर क्लिक करा

%d bloggers like this: