पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू – त्वरित अर्ज करा..!

Maharashtra Police Bharti 2024

18,648

Maharashtra Police Bharti 2024

 

पोलिस भरतीसाठी यापूर्वी ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

 

पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू - त्वरित अर्ज करा..!

 

 

 

आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरतीची २०२४  सुरु झाले आहे. खालील लिंक वरून आपण विविध जिल्ह्यांच्या जाहिराती बघू शकता. तसेच ऑनलाईन प्रक्रिया  आज ५ मार्च २०२४ पासून सुरु झाली आहे,  अर्जाची लिंक आम्ही खाली उपलब्ध करून दिली.  तसेच, आज सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती महापोलीस पोर्टल द्वारे खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, आपण बघू शकता.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 आहे.

 

सर्व पोलीस भरती जाहिरात

सर्व जिल्ह्यांच्या PDF बघण्याची लिंक

Maharashtra Police Bharti 2024

 


 

आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरतीची २०२४ जाहीरात १ मार्च २०२४ रोजी येणार आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु होईल.

पोलीस भरतीची पदानुसार संख्या.
1] पोलिस शिपाई – 10,300 पदे.
2] एसआरपीएफ – 4,800 पदे.
3] जेल शिपाई – 1,900 पदे.
 एकूण पदे : 17,000+ पदे.

 

पोलीस भरती अधिसुचना अपडेट 2024
श्रेणी महाराष्ट्र शासन नोकरी
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव पोलीस भरती 2024
पदे पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई
एकूण रिक्त पदे 17,471
जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख 01 मार्च 2024
ओनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख  05 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण पूर्ण महाराष्ट्र 

Recrutiemnt Portal : policerecruitment2024.mahait.org

 

पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू - त्वरित अर्ज करा..!

 

 

पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू - त्वरित अर्ज करा..!

Documents Required for Maharashtra Police Recruitment 2024 Application Form

  • Aadhar Card. (आधार कार्ड.
  • Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
  • 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
  • 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
  • Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
  • Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
  • Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
  • Signature. (स्वाक्षरी.)
  • Photograph. (फोटो.

 

 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

Maharashtra Police Bharti 2024: पुढील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

 

Maharashtra Police Bharti 2024 | Shipai Bharti 2024 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?  

What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable?

महिला (Female) महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष (Male) पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
  एकूण गुण – 100

 

 

 

Physical Eligibility For Police Bharti 2024 | Maharashtra Police Bharti 2024 

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks

 

  • Maharashtra Police Bharti 2024 
  • Maharashtra Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
  • Age Limit For Maharashtra Police Bharti 2024 

 

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

 

 

Category (प्रवर्ग) Age (वय)
खुला 18 ते 28
मागास 18 ते 33
प्रकल्पग्रस्थ उमेदवार 18 ते 45
माजी सैनिक उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील.
अनाथ उमेदवार 18 ते 33
भूकंपग्रस्थ उमेदवार 18 ते 45
खेळाडू 18 ते 38
पोलीस पाल्य 18 ते 33
गृहरक्षक 18 ते 33
महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 ते 33

 

 

Age Limit For Maharashtra Police Bharti। Police Recruitment 2024

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Maharashtra Police Recruitment 2024

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Maharashtra Police Recruitment | Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

 

Selection Procedure For Maharashtra Police Recruitment 2024

  • Maharashtra Police Bharti 20221, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the Maharashtra Police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

पोलीस भरती 2022 – महत्त्वाचे कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2024

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
    ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
  • Maharashtra Police Bharti 2022 – Required Documents List
  • Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
  • Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
  • MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
  • The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
    Identity card, updated bank passbook, Aadhaar card
  • Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
  • Attested photocopies of certificates
  • Caste certificate validity
  • Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
  • Certificate of Financially Backward
  • Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players

 

 

 

 


Maharashtra Police Bharti 2024

राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरुंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्या पर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल, असेही नियोजन आखण्यात आले आहे. राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रक्ठि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

 

 

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस विभागातील जवळपास १७ हजार पदांची भरती प्रक्रिया राज्य शासनाकडून राबविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील विविध शहरात हजारो, लाखो  विद्यार्थी पोलीस भरतीच्या (Maharashtra Police Bharti 2024)तयारीला लागले आहेत. दररोज सराव सुरु असून, प्रशासनाकडून अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी, तसेच वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

 

 

मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. शहरात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने १७ हजार पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केल्याने विद्यार्थी जोमाने तयारीला लागले आहेत. मात्र, फेब्रुवारी महिना संपत आला तरी वेळापत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध झालेली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत, शहरातील क्रीडा संकुलात सकाळच्या वेळी रनिंग, गोळाफेक, लांब उडीचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना भरतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होईल आणि अनेक दिवसांचे पोलीस भरती होण्याची स्वप्न पूर्ण होईल अशी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षा लागलेली आहे.

कोरोनानंतर रिक्त पदभरती झालेली नाही. शासनाने पोलिस भरती करणार असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार लवकरच अंतिम जाहिरात प्रसिद्धी व्हावी; ज्यामुळे आमचे पोलिस होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल. असे अनेक उमेदवारांना वाटते, त्या नुसार सर्व उमेदवारांची जोमाने तयारी सुरु आहे.

 

 


मराठा आरक्षणाच्या GR नंतरच होणार १७ हजार पदांची पोलीस भरती!

Maharashtra Police Bharti 2024

 

आत्ताच प्राप्त माहिती नुसार, गृह विभागातर्फे राज्यात जवळपास १७ हजार ७०० पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे, परंतु आताचा मराठा समाजाला नव्याने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदुनामावली (रोस्टर) नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली. तसेच राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पदभरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

 

राज्याची लोकसंख्या वाढली असून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पोलिस ठाणी वाढीचेही प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहेत. मागच्या वर्षी राज्यात १८ हजार पोलिसांची भरती झाली असून त्यातील १२ हजार जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आताच्या पदभरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पदभरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात लांबणीवर पडली आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षानंतर गृह विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली. वाढलेली लोकसंख्या, शहरांचा विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मोठी पदभरती केली जात आहे.

छत्तीसगढ, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश व केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या सरळसेवा भरतीत उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर २०२० ते २०२२ या तीन वर्षांत नोकरभरती निघाली नसल्याने अनेक तरूणांची नोकरीची संधी संपली आहे. या पार्श्वभूमीवर मायबाप सरकारने उमेदवारांना नवीन पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी तरूणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याने तरूणांना त्यांच्याकडून आशा आहे.

 

 


खुशखबर!- १७ हजार पोलिसांच्या मेगाभरतीचं ठरलं; आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात

Maharashtra Police Bharti 2024

आत्ताच प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्र राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरूंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची मोठी भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात पोलीस भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसेचउन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरवात होईल, असे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्याची विशेषत: प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली, गुन्हेगारीत देखील वाढ होत असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्याठिकाणी असणार आहे. शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूरसह राज्यभरात पोलिस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरवात होईल, असेही गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

राज्याच्या वित्त विभागाकडून तब्बल १७, ४७१ पोलिसांची भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दिल्याने मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील शासन आदेश गृह विभागाने बुधवारी जारी केला. नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा विचार होता. परंतु आता प्रकाशित नवीन अपडेट नुसार गृहखात्याने पोलीस भरतीला मान्यता दिली आहे. 

 

पोलिसांसारखे या जवानांना प्रशिक्षण देऊन कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याने नवीन भरती होईपर्यंत गृह खात्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार टीका करत कंत्राटी ऐवजी पोलीस भरती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकार हा निर्णय मागे घेत, नव्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला, वित्त विभागाकडून १०० टक्के पोलीस भरतीला मंजुरी दिली. त्यामुळे तब्बल १७,४७१ पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा आला आहे. पोलीस शिपाई बॅण्डस्मैन पोलीस शिपाई चालक सशस्त्र

 


Maharashtra Police Bharti 2024

सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के 17,471 पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत. या आशयाचा नवीन GR गृह विभागाद्वारे जाहीर केला आहे. या GR नुसार,  सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. पूर्ण GR खालील लिंक वर उपलब्ध आहे. 

 

सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीवरून वाद सुरू असतानाच शिंदे फडणविस सरकारने काही महिन्यांपूर्वी पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. सन 2023 मध्ये नवरात्रौत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार होती. राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा गृहखात्याचा प्लान होता. या जवानांना पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊ कंत्राटी पद्धतीनं 11 महिन्यांसाठी भरती केली जाणार होती. या कंत्राटी पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची टंचाई असल्यानं नवीन भरती होईपर्यंत गृह खात्यानं हा निर्णय घेतल्याचं सरकारनं स्पष्ट केले होतो. मात्र, या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईसारख्या संवेदनशील शहराची सुरक्षा कंत्राटी पोलिसांवर सोपवणं किती योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. कंत्राटी भरतीविरोधात संभाजी ब्रिगेडनं मंत्रालयात आंदोलन केल होतो. जोरदार विरोध झाल्यामुळे सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय मागे घेतला होता.

 

पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू - त्वरित अर्ज करा..!

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नवीन २०२४ परिपत्रक बघा


Maharashtra Police Bharti 2024 – खुशखबर! नवीन वर्षात तेरा हजार पदांच्या पोलीस भरतीचा मुहूर्त!

 

राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नववर्षात १३ हजार पदांची नवीन पोलिस भरती होणार आहे. त्यादृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून राज्यातील १० केंद्रांमधील नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपेल. तत्पूर्वी, लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलिस भरतीची घोषणा होवू शकते अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. राज्याची लोकसंख्या वाढली, पण पोलिस ठाणी आणि पोलिसांचे मनुष्यबळ तवढेच असल्याची स्थिती आहे. गेल्या ७० वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे.

 

पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू - त्वरित अर्ज करा..!

 

राज्यातील सद्य:स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन किती पोलिस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे. प्रत्येक शहर- जिल्ह्याकडून वाढीव पोलिस ठाणी आणि मनुष्यबळाची मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा १९७६चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते.

गृह विभागाने २३ हजार पोलिसांची भरती केली आहे, तरीदेखील पोलिस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे. त्यामुळे आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

दरवर्षी सहा हजार पदे रिक्त

राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात. एक हजारापर्यंत पोलिसांचे प्रमोशन होते आणि काहीजण स्वेच्छानिवृत्ती घेतात तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दोन वर्षाची मिळून अंदाजे १३ हजार पदे रिक्त असतील. नुकत्याच भरती झालेल्या नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्चअखेर संपणार आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीची घोषणा होवू शकते. त्याचवेळी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरील तरूण- तरूणींना भरतीत संधी मिळू शकते, असेही सांगितले जात आहे.

नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव मागविले

जिल्ह्यातील ग्रामीण किंवा शहरी भागाचा वाढलेला विस्तार, लोकसंख्येतील वाढ, गुन्हेगारीचे प्रमाण या प्रमुख बाबींचा विचार करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त) वाढीव पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाकडून मागविले जात आहेत. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांची गरज पाहून नवीन आकृतीबंधानुसार मनुष्यबळ व पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली जाणार आहे.

 

 

 


राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नववर्षात तेरा हजार (13,000 Vacancies) पदांची नवीन पोलिस भरती होणार आहे. त्यादृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून, नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल. तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलिस भरतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याची लोकसंख्या वाढली, पण पोलिस ठाणी आणि पोलिसांचे मनुष्यबळ तवढेच असल्याची स्थिती आहे. गेल्या ७० वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे. राज्यातील सद्य:स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन किती पोलिस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे.

 

पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू - त्वरित अर्ज करा..!

 

 

प्रत्येक शहर, जिल्ह्याकडून वाढीव पोलिस ठाणी आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा १९७६ चा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते. राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात.

 

एक हजारांपर्यंत पोलिसांचा पदोन्नती होते आणि काही जण स्वेच्छानिवृत्ती घेतात, तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो. अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात, अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली.

 

पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज सुरू - त्वरित अर्ज करा..!

App Download Link : Download App

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Maharashtra Police Bharti 2024,Maharashtra Police Bharti 2024

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम