महाराष्‍ट्राचा भुगोल -नदी प्रणाली

767

 पुर्व वाहिनी नद्या : या सह्याद्रीच्या पुर्व उतारावर उगम पावतात व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

गोदावरी नदी :

  • हिची एकूण लांबी १४५० कि.मि. असून महाराष्ट्रात किचा प्रवाह ६६८ कि.मी. लांबीचा आहे.
  • गोदावरी खो-यास संत भूमी असे म्हणतात.
  • गोदावरी राज्याचा ९ जिल्ह्यातून वाहत जाऊन नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथून प्रवेश करते.
  • नंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा येथे महाराष्ट्रात प्रवेश करते व ७ कि.मी. वाहत जाऊन परत आंध्रप्रदेशात जाते.
  • गोदावरी खो-याने देशाचे १०% व राज्याचे ४९% क्षेत्र व्यापले आहे.

उपनद्या:  दारणा , प्रवरा, मुळा , सिंदफणा  ,मांजरा  ,कादवा  , शिवना , दुधना ,पूर्णा

गोदावरी नदी  काठावरील शहरे : नाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगांव, राजमहेंद्री


भीमा नदी :

  • भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते.
  • महाराष्ट्रात तिचा प्रवाह ४५१ कि.मी.
  • असून ती कर्नाटकात रायचुरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते.
  • तिची एकूण लांबी ८६७ कि.मी. आहे. पंढरपूरजवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात.
  • मुळा व मुठा या नद्यांचा संगम पुणे येथे होऊन त्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळतो.
  • निरा नदी भोर जवळ उगम पावून भीमा नदीला येऊन मिळते.

 उपनद्या 

  • उजवीकडून :भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा व माण
  • डावीकडून :वेळ, घोड व सीना 

कृष्णा नदी :

  • कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते.
  • महाराष्ट्रात २८२ कि.मी. चा प्रवास करून  ती आंध्रप्रदेशात जाते.
  • तिची एकूण लांबी १२८० कि.मी. आहे.

 उपनद्या : कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा

कृष्णा नदी काठावरील शहरे : वाई, सागली, मिरज, औदुंबर, कराड, नरसोबाची वाडी


पश्चिम वाहिनी नद्या : या नद्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात. नर्मदा, तापी-पूर्णानध्या खचदरीतून वाहत जातात.

तापी नदी :

  • ही नदी सातपुडा पर्वातात मुलताई येथे उगम पवते.
  • तापीस उजव्या किना-याने चंद्रभागा, भूलेश्वरी व नंद या नद्या तर डाव्या किना-याने काटेपूर्णा, मोर्णा, नळगंगा व सण या नद्या येऊन मिळतात.
  • तापी-पुर्णेच्या प्रवाहास वाघूर, गिरना, मोरी, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.

तापी व पूर्णा संगम – चंगदेव क्षेत्र (जळगाव), तापी व पांझरा यांचा संगम – मुडावद धुळे


कोकणातील नद्या 

  • सह्याद्री प्रर्वतावर उगम पावना-या नद्यांची रुंदी – ४९ ते १५५ कि.मी.
  • कोकणातील नद्यांची वैशिष्टये – वेगवान व हंगामी असतात. त्यांना त्रिभूज प्रदेश नसतो.
  • कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी – उल्हास (१३० कि.मी.)
  • कोकणातील दुस-या क्रमांकाची नदी – वैतरणा (१२४ कि.मी.)
  • उत्तर कोकणातील नद्या – दमनगंगा, तणासा, सुर्या, भातसई, जगबुडी, मुरवाडी, वैतरणा, उल्हास
  • मध्य कोकणातील नद्या – पाताळगगां, कुंडलिका, काळ, काळू, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री.
  • दक्षिण कोकणातील नद्या – कजवी, मुचकुंदी, शुक, गड, कर्लि, व तेरेखोल

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम