व्यक्तीविशेष :  मनोज नरवणे

105

 मनोज नरवणे यांनी स्वीकारला लष्करप्रमुखपदाचा पदभार

  • लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे.
  •  महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद क्षण असून मनोज नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस भारतीय लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे.
  •  मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत.
  •  लष्करप्रमुख बिपीन रावत हे आज ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
  • जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली आहे.
  • जनरल बिपीन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
  • लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरवणे हे सेवा ज्येष्ठतेनुसार लष्कर प्रमुखपदाच्या स्पर्धेतील प्रमुख दावेदार होते.
  •  जगातील बलाढय़ लष्करांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय लष्करात १३ लाख अधिकारी-जवानांचा फौजफाटा आहे.

मनोज मुकुंद नरवणे 

मुकुंद नरवणे हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात    दाखल झाले.  लष्कराच्या विविध विभागांत पुढे त्यांना काम करण्याची संधी मिळाली.  जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. दहशतवाद, फुटीरतावाद विरोधातील कारवायांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले.परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नरवणे यांना चीन सीमा प्रश्नी काम करण्याचा अनुभव आहे. सप्टेंबरमध्ये लेफ्टनंट जनरलपद स्वीकारण्याआधी ते पूर्व विभागाचे प्रमुख होते. लष्कराच्या पूर्व विभागाकडे चीनसोबत असलेल्या चार किलोमीटर सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.
आपल्या ३७ वर्षाच्या कार्यकाळात जनरल नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमध्येदेखील काही काळ सेवा बजावली आहे. श्रीलंकेत भारतीय शांती सैनिक दलात सहभागी होते.

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम