मौदा उपविभागात 145 पोलीस पाटील पदासाठी नवीन भरती; थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Mouda Police Patil Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,207

Nagpur Mouda Police Patil Bharti 2023

Mouda Police Patil Recruitment 2023 : नागपूर जिल्हयातील मौदा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील मौदा व कामठी तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.sdomoudaapp.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

सरळ भर्ती प्रक्रियेत अनुसूचित जाती-25, अनुसूचित जमाती-13, विशेष मागास प्रवर्ग-4 विमुक्त जाती व भटक्या जमाती-21, इतर मागास प्रवर्ग-33 आणि खुल्या प्रवर्गासाठी 34, आर्थिक दुर्बल घटक-15 असे एकूण 145 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज www.sdomoudaapp.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 17 मे 2023 पर्यंत आहे.

पोलीस पाटील पदासाठी आवश्यक अर्हता व अटीशर्ती या प्रमाणे आहे. अर्जदार दहावी परीक्षा पास असावा. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही. रहिवासी दाखला मुलाखतीच्या वेळी सादर करावा. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील. या परीक्षेसाठी आरक्षित व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी शुल्क 200 रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आहे. पोलीस पदासाठी लेखी परीक्षेसाठी 80 गुण असून तोंडी परीक्षेसाठी 20 गुण असे 100 गुण राहील.

अर्जदार संबंधित एकाच गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा. अर्जदाराने एका गावासाठी अर्ज करावा. एकापेक्षा जस्त गावातून केलेले सर्व अर्ज बाद ठरविण्यात येतील. पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्तरावर काम करावे लागत असल्याने पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. संपूर्ण भरती प्रक्रीयेदरम्यान पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना ऑनलाईन पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल सुस्थितीत ठेवावा. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.sdomoudaapp.in या संकेस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांकानंतर संकेतस्थावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मौदा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

एकूण जागा :  145 जागा 

पदाचे नाव & तपशील:  पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता: 10th pass 

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: मौदा, नागपूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 300/-
  • आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – Rs, 200/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023 

 

Mouda Police Patil Bharti 2023 – Important Dates

Mouda Police Patil Bharti 2023

How To Apply For Nagpur Mouda Police Patil Recruitment 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

प्रतिज्ञापत्र नमुना

 

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Mouda Police Patil Recruitment,

Mouda Police Patil Recruitment 2023,

पोलीस पाटील ,

पोलीस पाटील भरती

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम