मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ अंतिम निवड यादी जाहीर

Mumbai Police Bharti Result 2022

2,657

Mumbai Police Bharti Result 2022

 

मुंबई पोलीस शिपाई (चालक) पदाच्या रिक्त असलेल्या ९९४ पदांची अंतरिम निवड यादी महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार तसेच शासनाने निवड यादी बाबत वेळोवेळी दिलेले आदेश / सुचनांचा विचार करुन सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण विचारात घेवून mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर एकूण ९६६ उमेदवारांची निवड यादी दिनांक ०५/०९/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.

 

उमेदवारांना कागदपत्र पडताळणीबाबत कोणतिही माहिती नसल्याने, तसेच त्यांच्या राहत्या गावी नेटवर्क नसल्याने संकेतस्थळावरील प्रसिध्द केलेली माहिती त्यांना वेळेत पहाता आली नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी घेऊन बरेच उमेदवार त्यांची फिर्याद नोंदवित होते. करिता ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली नव्हती अशा उमेदवारांना दिनांक १६/०९/२०२३ रोजी कागदपत्र पडताळणीकरिता शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

सदर कागदपत्र पडताळणीमध्ये एकूण ५९ उमेदवार हजर राहिले होते त्यापैकी ५८ उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे दिनांक ०५/०९/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड यादीत बदल होत असून ३४ उमेदवारांचा निवड यादीत नव्याने समावेश होत आहे. तसेच इच्छुक नसणारे २२ व इतर ८ असे ३० उमेदवार यादीतून वगळण्यात येत आहेत. सद्या प्रसिध्द करण्यात येणाऱ्या यादीमध्ये पूर्वी निवड / प्रतिक्षा यादीत नसणाऱ्या व नव्याने समावेश होणाऱ्या एकूण २४ उमेदवारांची नावे कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहून निवड यादीमध्ये घेण्याकरिता प्रस्तावित आहेत.

मुंबई पोलीस शिपाई (चालक) च्या एकूण ९९४ पदांपैकी भाग-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ९७० उमेदवारांची निवड यादी सोबत प्रसिध्द करण्यात येत असून, भाग-२ मध्ये नमूद केलेल्या निवड यादीतील उर्वरीत २४ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २९/०९/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता नायगांव संकूल हॉल पहिला मजला, पोलीस मुख्यालय समोर, नायगांव, दादर (पूर्व) मुंबई येथे घेण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. • सर्व उमेदवारांनी mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणाऱ्या सुचनांबाबत सतर्क रहावे.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ अंतिम निवड यादी.

 

 

 


मुंबई पोलीस भरती कागदपत्र जमा करायची उद्या शेवटची संधी

Mumbai Police Bharti Result 2022

 

मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०२१ च्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी, वाहन कौशल्य चाचणी व लेखी परिक्षेमध्ये पात्र ठरुन अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २१/०८/२०२३ ते २५/०८/२०२३ या कालावधीत पार पाडण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, सदर निवडयादीमध्ये समाविष्ठ असलेल्या उमेदवारांची वैद्यकिय तपासणी घेण्याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडून प्रसिध्द करण्यात येत आहे. 

 

मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षेमध्ये पात्र ठरुन अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २१/०८/२०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे.

सोबत जोडण्यात आलेल्या दिनांक ०५/०९/२०२३ ते १३/०९/२०२३ या कालावधीतील यादीमध्ये ज्या उमेदवारांचा समावेश निवड / प्रतिक्षा यादीमध्ये आहे त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांना नेमूण दिलेल्या दिनांक आणि ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहायचे आहे.

1. नायगांव पोलीस मुख्यालय, पोलीस संकूल हॉल, तळ मजला, नायगांव, दादर (पूर्व) मुंबई. हॉल मध्ये उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी नायगांव पोलीस मुख्यालय, परेड मैदान येथील स्टेजवर उपस्थित रहायचे आहे
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी पुढील प्रमाणे कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रती सोबत घेवून याव्यात. उमेदवारांना या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल त्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक राहील, अन्यथा संबधितास गैरहजर समजून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामधून “अपात्र करण्यात येईल. उमेदवारांना बोलविण्याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे, त्याप्रमाणे संबंधित उमेदवारानी नमूद दिनांक आणि वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांनी खालील नमूद सुचनांचे पालन करावे व त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित रहावे.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Download Notice and List

 

 


मुंबई पोलीस शिपाई भरती -२०२१ कागदपत्र पडताळणीबाबतचे वेळापत्रक जाहीर

Mumbai Police Bharti Result 2022

मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परिक्षेमध्ये पात्र ठरुन अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक २१/०८/२०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. त्या दुष्टीकोणातून पुढील टप्पा दिनांक २८/०८/२०२३ ते ०२/०९/२०२३ पर्यंत सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येत आहे. सदरची यादी पूर्णतः तात्पुरती असून कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना सदर यादीमधून वगळण्यात येईल.

 

Mumbai Police Bharti Document Verification List

कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी पुढील प्रमाणे कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रती सोबत घेवून याव्यात. उमेदवारांना ज्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल त्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक राहील, अन्यथा संबधितास गैरहजर समजून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामधून बाद करण्यात येईल. उमेदवारांना बोलविण्याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे, त्याप्रमाणे संबंधित उमेदवाराने नमूद दिनांक आणि वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांनी खालील नमूद सुचनांचे पालन करावे व त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित रहावे.

 

१. उमेदवारांने त्यास बोलाविण्यात आलेल्या दिनांकास नमूद केलेल्या वेळेपूर्वी १ तास अगोदर कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक राहील.
२. आवेदन पत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक राहील. ३. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक राहील.
४. उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. ( उदा. आधारकार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र वाहनचालक परवाना इ. शासकिय ओळखपत्र)
५. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रतीचा संच सोबत घेवून येणे आवश्यक राहील.
६. उमेदवारांनी खाली नमूद केलेली कागदपत्रांचा संच सोबत घेवून येवून पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरविण्यात येईल.

उमदेवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी पोलीस शिपाई भरती – २०२१ जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्यांचे सखोल वाचन/ पालन करुन कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे. जेणे करून ऐनवेळी उमेदवारांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाही, अशा प्रकारची कारणे निर्माण होणार नाहीत.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Download List Of Candidates for Mumbai Police Document Verification


मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ अंतिम निवड यादी जाहीर

 

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 


मुंबई पोलीस शिपाई चालक भरती वेळापत्रकात बदल

Mumbai Police Bharti Result 2022

Mumbai Police Bharti Result 2022 : उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई / मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०१९ प्रक्रिया पार पाडण्यात आली. संदर्भ क्र. १ व ४ नुसार कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार पोलीस शिपाई यांची तात्पुरती अंतरिम निवड यादी / अंतरिम प्रतिक्षा यादी (Provisional Select / Waiting List) जाहिर करण्यात आली आहे. तद्नंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सोबतच्या यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहुन नियुक्ती पत्र स्विकारण्यासाठी बोलविण्यात येत आहे.

Mumbai Police Bharti Result 2022 Updates

 

नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलविण्यात आले म्हणुन नियुक्तीचा अधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येवु नये. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत. याची संबंधि उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमुद केलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे.

Important Documents For Mumbai Police Bharti 2022

नियुक्तीसाठी येताना कागदपत्र पडताळणीकरिता खालील नमूद प्रमाणपत्र न चुकता सोबत आणणे आवश्यक आहे :-

१) भरती ओळखपत्र (मैदानी चाचणी/ लेखी परिक्षेचे)
२) भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी जमा न केलेले सर्व मुळ कागदपत्र
उदा. शैक्षणिक/ डोमीसाईल / जात प्रमाणपत्र / नॉन क्रिमिलेअर / होमगार्ड /
प्रकल्पग्रस्त/ धरणग्रस्त इ. संबंधित मुळ प्रमाणपत्र.
३) ०४ पासपोर्ट साईज फोटो.
४) आधार कार्ड व पॅन कार्ड.
तयारी ५) दैनंदिन गरजेच्या वस्तु घेवून पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर रहावे.

मुंबई पोलीस शिपाई / मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती – २०१९ (पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीबाबत) दि. ३०/०१/२०२३ सकाळी ०९:०० वा नियुक्तीसाठी ‘पोलीस संकुल नायगांव’ नायगांव पोलीस मुख्यालय, (पोलीस भरती संगणक कक्ष), नायगांव, दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४ येथे कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहुन बोलविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी खालील लिंकद्वारे डाउनलोड करा…

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

मुंबई पोलीस शिपाई नियुक्ती यादी

 

 


 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम