मुंबई पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम २५ तारखेपासून…!
Mumbai Police Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Mumbai Police Recruitment 2024
उपरोक्त संदर्भ व विषयास अनुसरून पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात येते की, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे अधिपत्याखालील सन २०२१ पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या एकुण ५७०० नवप्रविष्ठ पोलीस शिपाई (पुरुष व महिला) यांना दिनांक २५.०२.२०२४ पासून खालीलप्रमाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रशिक्षण सत्र दि. २६/०२/२०२४ पासुन सुरू होणार आहे.


App Download Link : Download App
मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. सध्या अपर पोलिस आयुक्तपदापासून शिपाईपदापर्यंत १२ हजार ८९९ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करून मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. मुंबई पोलिस दलात एकूण मंजूर पदांची संख्या ५१,३०८ आहेत. यात ३८,४०९ कार्यरत पदे असून १२,८९९ पदे रिक्त आहेत. पोलिस शिपायाची २८,९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७,८२३ कार्यरत पदे असून ११,११५ पदे रिक्त आहेत. यानंतर पोलिस उपनिरीक्षकाची ३,५४३ पदे मंजूर असताना फक्त २,३१८ कार्यरत पदे असून १,२२५ पदे रिक्त आहेत. पोलिस निरीक्षकाची १,०९० मंजूर पदे असून यापैकी ३१३ पदे रिक्त आहेत.
सध्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहायक पोलिस आयुक्ताची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलिस उपायुक्ताची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत; तर अप्पर पोलिस आयुक्तपदाचे १२ पैकी फक्त १ पदे रिक्त आहेत. मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही. पण, प्रत्येक वर्षी सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढवली, तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केले.
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
![]()
Table of Contents



