नरेंद्र दाभोळकर 1945-2013 यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १९४५ - मृत्यू : २०१३)

530

नरेंद्र दाभोळकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

नरेंद्र दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. Narendra Dabholkar

नरेंद्र दाभोळकर
नरेंद्र दाभोळकर
 • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे – अध्यक्ष आणि संस्थापक (स्थापना १९८९) –

जन्म : १ नोव्हेंबर १९४५

आई: ताराबाई दाभोळकर

वडील: अच्युत दाभोळकर

शिक्षण: एमबीबीएस (गर्व्हमेंट कॉलेज, मिरज)

 • शिवाजी छत्रपती कब्बडी टिमचे भारताचे प्रतिनिधीत्व (भारत विरुद्ध बांग्लादेश)
 • बाबा आढाव एक गाव एक पनवठा (विहीर) मध्ये सहभाग.
 • १९८० सामाजिक कार्याला सुरुवात.
 • अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य / उपाध्यक्ष
 • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष.
 • जाती संबंधित हिंसाचाराच्या चळवळीत सहभाग.
 • बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर करण्यास समर्थन.
 • जादुटोणाविरोधी कायदा आणि काळा जादू विरूद्ध आदेश त्यांच्यामुळे देण्यात आला.
 • विरोध वारकरी, बीजेपी आणि शिवसेना –
 • २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या..

हत्येच्या ४ दिवसांनंतर अंधश्रद्धा आणि काळा जादू अध्यादेश घोषणा.

 • २०१४ पद्मश्री
 • १२ वर्षे डॉक्टर म्हणून कार्य नंतर समाज कार्य.
 • साने गुरुजी यांनी स्थापित केलेल्या प्रसिद्ध मराठी साप्ताहिक साधानाचे संपादन.

साहित्य

 • अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम – राजहंस प्रकाशन
 • अंधश्रद्धा विनाशाय – राजहंस प्रकाशन
 • ऐसे कैसे झाले भोंदू – मनोविकास प्रकाशन
 • ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक – लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.
 • झपाटले ते जाणतेपण – संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
 • ठरलं… डोळस व्हायचंच – मनोविकास प्रकाशन
 • तिमिरातुनी तेजाकडे – राजहंस प्रकाशन
 • दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.
 • प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे – डी.व्ही.डी, निर्माते – मॅग्नम ओपस कंपनी.
 • प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) – राजहंस प्रकाशन
 • भ्रम आणि निरास – राजहंस प्रकाशन
 • मती भानामती- राजहंस प्रकाशन (सहलेखक माधव बावगे)
 • विचार तर कराल? – राजहंस प्रकाशन
 • विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी – दिलीपराज प्रकाशन
 • श्रद्धा-अंधश्रद्धा – राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)

सामाजिक कार्य

बाबा आढाव यांच्या एक गाव – एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 1998 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

 नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धेविरोधात लढा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.

पुरस्कार

 • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता.
 • समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्‍लब
 • दादासाहेब साखवळकर पुरस्कार
 • शिवछत्रपती पुरस्कार – कबड्डी
 • शिवछत्रपती युवा पुरस्कार – कबड्डी
 • पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तेर)
 • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर)

मृत्यू

मला माझ्याच देशात पोलिस स्वत: च्या लोकांकडून संरक्षण घ्यायचे असेल तर मला काहीतरी चुकीचे वाटते, मी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत लढा देत आहे आणि हे कोणाविरुद्ध नाही तर सर्वांसाठी आहे.- पोलिस संरक्षण नाकारण्यावर दाभोलकर. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर (प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत.

नरेंद्र दाभोळकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
नरेंद्र दाभोळकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

मंगळवार २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर दाभोलकर शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोलकर घटनास्थळीच कोसळले .

गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले
छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम