One Liners : एका ओळीत सारांश

78

एका ओळीत सारांश, 05 मे 2021

Admin

दिनविशेष

  • जागतिक पोर्तुगीज भाषा दिवस – 5 मे.

पर्यावरण

  • अंडमान व निकोबार बेटांच्या नारकोंडम बेटावर शोधली गेलेली चिचुंद्री प्रजातीची नवीन जात, जी कीटकभक्षी, पांढर्‍या दातांची लहान आणि उंदरासारखी सस्तन पशुप्रजाती आहे – क्रोसिडुरा नारकोंडमिका (जीनस: क्रोसिडुरा).
  • भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, भारतात आढळलेल्या सस्तन पशुप्रजातींची संख्या – 430.

व्यक्ती विशेष

  • जम्मू व काश्मीरचे माजी राज्यपाल (पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित), ज्यांचे 4 मे 2021 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले – जगमोहन.
  • स्वदेशी ‘तेजस’ विमानाच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणारे विमान उड्डयण शास्त्रज्ञ, ज्यांचे 3 मे 2021 रोजी बिहारमध्ये निधन झाले – मानस बिहारी वर्मा.
  • 1 मे 2021 पासून भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) या सार्वजनिक कंपनीचे नवीन अध्यक्ष-नि-व्यवस्थापकीय संचालक – अमित बॅनर्जी.

क्रिडा

  • स्नूकर विश्वविजेता 2021 – मार्क सेल्बी (इंग्लंड).

राज्य विशेष

  • एस मुरली कृष्णा यांच्या जागी, गुजरातचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी – अनुपम आनंद.
  • आंध्रप्रदेश राज्याचे नवीन माहिती अधिकार आयुक्त – काकरला चेन्ना रेड्डी आणि उलला हरी प्रसाद.
  • भारतीय भुदलाने ____ राज्यात 16,000 फूट उंचीवर 56 केव्हीए क्षमतेचा प्रथम हरित सौर ऊर्जा प्रकल्प उभारला – सिक्कीम.

ज्ञान-विज्ञान

  • जगात प्रथमच, सूक्ष्म-अल्गीचा वापर करून दूध विकसित करणारी कंपनी – सोफी बायोनिट्रिएंट्स (सिंगापूरची कंपनी).
  • ____ कंपनीने ग्रॅफिन-अॅल्युमिनियम (Al-Gr) संमिश्र धातूपदार्थ विकसित केला आहे, जे विद्युत क्षेत्रात तांब्याचा पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते – तिरुपती ग्रॅफाइट पीएलसी, ब्रिटन.
  • अमेरिकेच्या NASA संस्थेने ऑक्टोबर 2021 मध्ये “____” नावाची नवीन खोल-अंतराळ दुर्बिण कार्यरत करण्याची योजना बनवीत आहे, जी हबल दुर्बिणची जागा घेईल – जेम्स वेब्ब स्पेस टेलीस्कोप.
  • ब्रिटनच्या संशोधकांसह _____ संस्थेने ‘लेझर प्रिंटेड-मायक्रोफ्लूइडिक पेपर-बेस्ड अॅनालिटिकल सेन्सर’ नामक संवेदक विकसित केला आहे, जे सूक्ष्मजीवरोधी प्रतिरोधक-उत्प्रेरक प्रदूषकांचा शोध घेऊ शकते – भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास.

सामान्य ज्ञान

  • राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) – स्थापना: 29 ऑगस्ट 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क (STPI) – स्थापना: वर्ष 1991; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय भुदलाची स्थापना – 01 एप्रिल 1895.
  • भारतीय हवाई दलाची स्थापना – 08 ऑक्टोबर 1932.
  • भारतीय नौदलाची स्थापना – 05 सप्टेंबर 1612.
  • भारतीय तटरक्षक दलाची स्थापना – 18 ऑगस्ट 1978.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम