One Liners : एका ओळीत सारांश, 09 मे 2020
एका ओळीत सारांश, 09 मे 2020
दिनविशेष
- वर्ष 2020 साठी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (मे महिन्याचा दुसरा शनिवार – 9 मे 2020) याची संकल्पना – “बर्ड कनेक्ट अवर वर्ल्ड”.
अर्थव्यवस्था
- आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (AIIB) यांनी कोविड-19 महामारीचा सामना करण्यात भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एवढे कर्ज मंजूर केले – 500 दशलक्ष डॉलर.
- मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने आर्थिक वर्ष 2020-21 यासाठी अंदाज बांधलेला भारताचा वृद्धीदर – शून्य टक्का.
- केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट कल्याण मंत्री निर्मला सितारामन यांनी गांधीनगरमध्ये GIFT आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात या दोन आंतरराष्ट्रीय एक्सचेंजवर INR-USD फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) बंध सादर केले – BSEचे इंडिया INX आणि NSEचे NSE-IFSC.
आंतरराष्ट्रीय
- संयुक्त राष्ट्रसंघ आणि भागीदार संस्थांनी कोविड-19 महामारीवर मात करण्यासाठी इतका निधी उभारण्याचे आवाहन केले – 6.7 अब्ज अमेरिकी डॉलर.
राष्ट्रीय
- या भारतीय संस्थेनी काथ्याच्या उपयोगासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी कॉईर बोर्ड सोबत सामंजस्य करार केला – IIT मद्रास.
व्यक्ती विशेष
- “मॉमस्पीक: द फनी, बिटरस्वीट स्टोरी ऑफ मदरहुड इन इंडिया” पुस्तकाचे लेखक – पूजा पांडे.
- निकेलोडियन किड्स चॉईस अवॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय श्रेणीमध्ये या व्यक्तीने यंदाच्या आफ्रिकन सोशल स्टारचा किताब जिंकला – प्रेवेन रेड्डी (दक्षिण आफ्रिकेचा हास्यअभिनेता).
- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाचे (UNEP) सदिच्छा दूत म्हणून या भारतीय व्यक्तीचा कार्यकाळ वर्ष 2022च्या अखेरपर्यंत वाढविण्यात आला – दिया मिर्झा.
क्रिडा
- 1997 साली कोडावा फॅमिली हॉकी स्पर्धा आयोजित करणार्या या व्यक्तीचे 7 मे रोजी बेंगळुरूत निधन झाले – पानदंडा कुट्टप्पा.
राज्य विशेष
- मध्यप्रदेश राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी – वीर राणा.
ज्ञान-विज्ञान
- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनी (CSIR) या कंपनीच्या नेतृत्वातकोविड-19 संसर्गावर उपचार पद्धती म्हणून ह्यूमन मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज विकसित करण्याचा प्रकल्प मंजूर केला – भारत-बायोटेक.
सामान्य ज्ञान
- इंडियन रेडक्रॉस सोसायटी – स्थापना: वर्ष 1920; मुख्यालय: नवी दिल्ली.
- इंटरनॅशनल रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट मुव्हमेन्ट – स्थापना: 09 फेब्रुवारी 1863; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना – 12 ऑक्टोबर 1993.
- संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – स्थापना: 05 जून 1972; मुख्यालय: नैरोबी, केनिया.
- आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (AIIB) – स्थापना: 16 जानेवारी 2016; मुख्यालय: बिजिंग, चीन.
- कॉईर बोर्ड – स्थापना: वर्ष 1953; ठिकाण: कोची आणि अलप्पुझा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents