One Liners : एका ओळीत सारांश,10 ऑगस्ट 2020

123

एका ओळीत सारांश, 10 ऑगस्ट 2020

Admin

पर्यावरण

  • “ट्रॅफिक इंडिया या संस्थेनी केलेल्या अभ्यासानुसार, या राज्यांमध्ये बिबट्यांच्या शिकारीचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे – उत्तराखंड आणि महाराष्ट्र.

राष्ट्रीय

  • उत्तर कर्नाटकमधले पहिले तसेच म्हैसूर रेल संग्रहालयानंतर नैऋत्य रेल्वे विभागातले दुसरे रेल्वे संग्रहालय – हुबळी.
  • केंद्र सरकारने या अभियानाच्या अंतर्गत कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना 553 कोटी रुपयांचा निधी वाटप केला – सब-मिशन ऑन एग्रीकल्चरल मॅकेनाझेशन (SMAM).
  • कृषी मंत्रालयाचे मोबाइल अॅप जे शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातल्या ‘कस्टम हायरिंग सर्व्हिस’ केंद्रांशी जोडते – FARMS (फार्म मशीनरी सोल्यूशन्स).
  • केंद्र सरकारने या संस्थेत जल आणि भूमी यासंबंधी उपचार प्रक्रियेच्या उपाययोजनांसाठी ‘टेक्नॉलजी इनोव्हेशन हब’ उभारण्यासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मान्य केला – भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपार (पंजाब).

राज्य विशेष

  • खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून (KVIC) उभारण्यात आलेले अरुणाचल प्रदेश राज्यातले रेशीमसाठी पहिलेच असे प्रशिक्षण व उत्पादन केंद्र – चुल्लूयू गाव.
  • या राज्य सरकारला ‘रेणुका जी धरण प्रकल्प’साठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे – हिमाचल प्रदेश.

सामान्य ज्ञान

  • भारतीय बँक संघ (IBA) याची स्थापना – 26 सप्टेंबर 1946.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) – स्थापना: वर्ष 1954; मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक.
  • संरक्षण गुप्तचर विभाग (DIA) याची स्थापना – 1 मार्च 2002.
  • भारतीय वनस्पती सर्वेक्षण (BSI) – स्थापना: 13 फेब्रुवारी 1890; मुख्यालय: कोलकाता, पश्चिम बंगाल.
  • भारतीय प्राणी सर्वेक्षण (ZSI) – स्थापना: 1 जुलै 1916; मुख्यालय: कोलकाता.
  • राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) याची स्थापना – डिसेंबर 2005.
  • राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) – स्थापना: 1 ऑक्टोबर 2003; ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू.
  • भारतीय वन सर्वेक्षण (FSI) – स्थापना: 1 जून 1981; मुख्यालय: देहरादून, उत्तराखंड.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम