One Liners : एका ओळीत सारांश, 19 जुलै 2020
एका ओळीत सारांश, 19 जुलै 2020
आंतरराष्ट्रीय
- भारत आणि भुटान या देशांनी भुटानमधील पसाखा आणि या शहरादरम्यान एक नवीन व्यापार मार्ग उघडला आहे – जयगाव, पश्चिम बंगाल.
- या देशात धोरणात्मक पेट्रोलियम साठा तयार करण्यासाठी भारताचा अमेरिकेसोबत सामंजस्य करार झाला आहे – संयुक्त राज्ये अमेरिका.
- पाकिस्तान आणि चीन या देशांनी या नदीच्या काठी सुधोनी जिल्ह्यात (पीओके) 700 मेगावॅट क्षमतेचा आझाद पट्टन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी करार केला – झेलम नदी.
- गॅबॉन देशाची नवीन आणि प्रथम महिला पंतप्रधान – रोज क्रिस्टियन ओसौका रापोंडा.
- चीनच्या शांघाय शहरात ‘2020 वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉन्फरन्स’ या परिषदेत देण्यात आलेल्या जगातील पहिल्या औद्योगिक बुद्धिमत्ता पुरस्काराचे विजेता – इलेक्ट्रॉनिक एसईक्लाऊड प्लॅटफॉर्म.
राष्ट्रीय
- 18 जुलै ते 22 जुलै या कालावधीत हा विभाग ‘सब-ट्रॉपिकल फ्रूट एक्सपो’ आयोजित करणार आहे – फलोत्पादन विभाग हरयाणा.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) या शैक्षणिक वर्षातील उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कॉर्पोरेशन (IBM) सोबत भागीदारी केली आहे – शैक्षणिक वर्ष 2020-2021.
- केंद्र सरकारने इतक्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ योजना यशस्वीरित्या राबविली आहे – 20.
- भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने एप्रिल 2020 या महिन्यात दिल्या गेलेल्या “वॉटर हीरोज अवॉर्ड”चे विजेता – ओनगोन उपविभागीय कार्यालय, विजयवाडा विभाग, आंध्रप्रदेश, दक्षिण मध्य रेल्वे.
- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने या क्षेत्राच्या विकास योजनेला मंजुरी दिली असून, त्याच्या अंतर्गत गौमुख ते उत्तराकाशी पर्यंतचा 4179.59 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापले जाणार आहे – भागीरथी इको-सेन्सिटिव्ह झोन.
- केंद्र सरकारने 18 जुलै रोजी या कोषात कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थांकडून योगदान देण्यास परवानगी दिली – राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोष (NDRF).
- पुनर्रचित ‘प्रधानमंत्री सार्वजनिक प्रशासन उत्कृष्टतता पुरस्कार 2020’ योजनेत गंगा जिल्ह्यांच्या विकासाला समर्पित पुरस्काराची नवी श्रेणी – “गंगा जीर्णोद्धारासाठी चांगली कामगिरी” पुरस्कार.
- या विभागाच्या मुख्यालयात “चेंज मॅनेजमेंट कमिटी” ही अंतर्गत वैचारिक मंडळ स्थापन केले जाणार – केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग.
व्यक्ती विशेष
- ‘2020 नेल्सन मंडेला पुरस्कार’चे विजेता – मरियाना वर्दीनोयानिस (ग्रीस) आणि डॉक्टर मोरिसाना कौयाते (गिनी).
- 17 जुलै रोजी चेन्नईमध्ये निधन पावलेले बीजगणित भूमिती क्षेत्रातील प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ – प्रा. कांजीवरम श्रीरंगाचारी शेषाद्री (‘शेषाद्री स्थिरांक’साठी ओळखले जाणारे).
राज्य विशेष
- या ठिकाणी ‘स्मृती वन’चे उद्घाटन झाले – अस्थल, देहरादून जिल्हा, उत्तराखंड.
सामान्य ज्ञान
- या राज्यात हरेला उत्सव साजरा केला जातो – उत्तराखंड.
- भुटान – राजधानी: थिंपू; राष्ट्रीय चलने: भुटानी नग्लट्रम.
- सुरिनाम – राजधानी: परामारिबो; राष्ट्रीय चलन: सुरिनाम डॉलर.
- गॅबॉन – राजधानी: लिब्रेविले; राष्ट्रीय चलन: सेंट्रल आफ्रिकन सीएफए फ्रॅंक.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) – स्थापना: 03 नोव्हेंबर 1962; मुख्यालय: नवी दिल्ली.
- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोष (NDRF) – स्थापना: वर्ष 2006; मुख्यालय: नवी दिल्ली.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents