One Liners : एका ओळीत सारांश, 21 मे 2020

दिनविशेष

 • आंतरराष्ट्रीय चहा दिन – 21 मे.
 • संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता विषयक जागतिक दिन – 21 मे.
 • राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन – 21 मे.

अर्थव्यवस्था

 • बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यांनी लघू व मध्यम उद्योगांसाठी वार्षिक लिस्टिंग शुल्क इतक्या टक्क्यांनी कमी केले – 25 टक्के.
 • नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) यांनी प्रस्तुत केलेले भारतातले पहिले अ‍ॅग्री फ्युचर्स इंडेक्स – NCDEX अ‍ॅग्रीडेक्स.

राष्ट्रीय

 • राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) याच्या कक्षेत असलेल्या JEE, NEET सारख्या परीक्षांसाठी उमेदवारांना सराव करण्यासाठी नवीन मोबाइल अ‍ॅप – नॅशनल टेस्ट अभ्यासअ‍ॅप.
 • WAG 12 क्रमांक 60027 हे भारतातले पहिले 12000 अश्वशक्तीचे लोकोमोटिव्ह या कारखान्यात भारतीय रेल्वेसाठी बनविले गेले आहे – मधेपुरा इलेक्ट्रिक लोको फॅक्टरी, बिहार.
 • गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वर्ष 2019-20 मधील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंग यादीच्या अंतर्गत पंच तारांकित रेटिंग प्राप्त शहरे – अंबिकापूर, राजकोट, सूरत, म्हैसूर, इंदूर आणि नवी मुंबई.
 • प्रधान मंत्री वय वंदना योजना (PMVVY) यासाठी मान्य मुदतवाढ – 31 मार्च 2023 पर्यंत.
 • 2020-21 ते 2024-25 या आर्थिक वर्षांच्या कालावधीत भारतातल्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या शाश्वत आणि जबाबदार विकासाद्वारे निल क्रांती घडविण्याची नवी योजना – प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY).
 • नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाने या राज्यातल्या कोणार्क सूर्य मंदिर आणि कोणार्क शहर (‘सूर्य नगरी’ म्हणून) यांचे संपूर्ण सौरकरण केले – ओडिशा.

व्यक्ती विशेष

 • पुढील एका वर्षासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे नवीन अध्यक्ष – डॉ हर्ष वर्धन (भारताचे आरोग्य मंत्री).
 • राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याचे नवे अध्यक्ष – गोविंदा राजुलू चिंतला.
 • भारतीय पोलाद संघाचे (ISA) नवे अध्यक्ष – दिलीप ऊंमेन.

राज्य विशेष

 • या राज्य सरकारने शेतकऱ्यांना अधिक पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राजीव गांधी किसान कल्याण योजना जाहीर केली – छत्तीसगड.

ज्ञान-विज्ञान

 • कोविड-19च्या तपासणीसाठी चाचणी दरम्यान वापरण्यासाठी श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी (त्रिवेंद्रम) आणि अ‍ॅग्पे डायग्नोस्टिक्स लिमिटेड, कोचीन या संस्थांनी विकसित केलेले चुंबकीय नॅनो पार्टिकल आधारित RNA एक्सट्रॅक्शन किट – अ‍ॅग्पे चित्रा मॅग्ना.
 • चंद्रयान-2 मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) भारतात या प्रदेशात आढळणारे “अनोरथोसाइट” खडक वापरुन चंद्रावरील डोंगराळ प्रदेशातली चंद्र माती (किंवा रेगोलिथ) बनविण्याच्या पद्धतीचा पेटंट प्राप्त केला आहे – तामिळनाडूमधले सीथपुंडी आणि कुन्नमलाई खेडे.

सामान्य ज्ञान

 • संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) या साली सांस्कृतिक विविधता विषयक सार्वभौम घोषणापत्र जाहीर केले – वर्ष 2001.
 • या दिवशी भारताचे सातवे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिनाची अधिकृत घोषणा करण्यात आली – 21 मे 1991.
 • प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजना (PMGSY) यांचा शुभारंभ – 25 डिसेंबर 2000.
 • नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) – स्थापना: 15 डिसेंबर 2003; मुख्यालय: मुंबई.
 • राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) याची स्थापना – वर्ष 2017.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश, 31 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा