One Liners : एका ओळीत सारांश, 23 जुलै 2020

117

एका ओळीत सारांश, 23 जुलै 2020

Admin

संरक्षण

  • 15 जुलै रोजी ओडिशामध्ये संरक्षण संशोधन व विकास संघटनाने (DRDO) उड्डाण चाचण्या पार पाडल्या ते रणगाडा-भेदी गाईडेड क्षेपणास्त्र – ध्रुवास्त्र (तिसरी पिढीचे, मारा पल्ला: 7 किमी).

अर्थव्यवस्था

  • या संस्थेनी त्याच्या ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ऑटो पे’ सुविधेचा प्रारंभ केला जे आवर्ती देयकांसाठी समर्पित आहे – भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NCPI).
  • या ई-प्रशासन सेवा प्रदात्याने संपूर्ण भारतभरातील नागरिकांना डिजिटल माध्यमाने PAN कार्ड सेवा देण्यासाठी UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेड सोबत करार केला – अलंकीत लिमिटेड.
  • 22 जुलै रोजी या पेमेंट बँकेनी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सोबत ग्रामीण भारतातील तरुणांना वित्तीय सेवा उद्योग क्षेत्रात प्रशिक्षण देण्याकरिता भागीदारीची घोषणा केली – एअरटेल पेमेंट्स बँक.
  • भारताचे पहिले एक्सचेंज जे अॅग्री-डेरिव्हेटिव्ह्ज विभागात ‘ऑप्शन्स इन गुड्स’ कॉंट्रॅक्ट सादर करणार आहे – नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) (27 जुलैपासून रेपसीड, गहू आणि मक्यासाठी).

आंतरराष्ट्रीय

  • ‘जी-20 प्रमुखांची शिखर परिषद 2020’ हा देश डिसेंबरमध्ये आयोजित करणार आहे – सौदी अरब.
  • या शहरात ‘आपत्कालीन वैद्यकीय सेवा’ स्थापन करण्याविषयीच्या करारावर भारत आणि मालदीव यांनी स्वाक्षरी केली – माले.
  • या देशाने प्रथमच थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या ‘MGTD-20 गॅस टर्बाइन इंजिन’ची उड्डाण चाचणी पार पाडली – रशिया.

राष्ट्रीय

  • स्वदेशी संरचित 700 मेगावॅट क्षमतेचे ‘काकरापाड अणुऊर्जा संयंत्र-3’ या राज्यात कार्यरत करण्यात आले आहे – गुजरात.
  • 23 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी _____पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत – मणीपूर.
  • राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) कडून 12 वीच्या राजकीय विज्ञान पाठ्यपुस्तकात नव्याने जोडलेले प्रकरण – कलम 370 रद्द करणे / Abrogation of Article 370 (“जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावादी राजकारण” प्रकरणाच्या जागी).
  • 23 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 10 राज्यांच्या 38 जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन केले जाणार आहे ज्याचे आयोजन या मंत्रालयाने केले आहे – कोळसा मंत्रालय.

व्यक्ती विशेष

  • 1 ऑगस्टपासून ‘हिंदुस्तान झिंक’ कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी – अरुण मिश्रा (सुनील दुग्गल यांच्यानंतर)

क्रिडा

  • BCCI यावर्षीचे इंडियन प्रीमियर लीग (IPL) या देशामध्ये आयोजित करण्यास सरकारची परवानगी घेणार आहे – संयुक्त अरब अमिराती.

राज्य विशेष

  • या राज्य सरकारने अशी घोषणा केली आहे की असंघटित क्षेत्रातील कामगार राज्य कल्याणकारी मंडळांमध्ये सहभागी होऊ शकतील – तामिळनाडू.

ज्ञान-विज्ञान

  • चंदीगडच्या DRDOच्या प्रयोगशाळेनी तयार केलेला स्वदेशी ड्रोन – भारत.

सामान्य ज्ञान

  • भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळ (NCPI) – स्थापना: वर्ष 2008; मुख्यालय: मुंबई.
  • युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI) – स्थापना: वर्ष 1964; मुख्यालय: मुंबई.
  • नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (NCDEX) – स्थापना: 15 डिसेंबर 2003; मुख्यालय: मुंबई.
  • दक्षिण कोरिया – राजधानी: सोल आणि सेजोंग शहर; राष्ट्रीय चलन: दक्षिण कोरियन वोन.
  • राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) – स्थापना: 01 सप्टेंबर 1961; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) – स्थापना: 01 डिसेंबर 1928; मुख्यालय: मुंबई.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम