One Liners : एका ओळीत सारांश, 27 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 27 एप्रिल 2020
दिनविशेष
- जागतिक लसीकरण आठवडा – 24 एप्रिल ते 30 एप्रिल.
- आंतरराष्ट्रीय चेरनोबिल आपत्ती स्मृती दिन – 26 एप्रिल.
आंतरराष्ट्रीय
- 25 एप्रिल 2020 रोजी या देशाचे सैनिक आणि अमेरिकेचे सैनिकांमध्ये झालेल्या ऐतिहासिक बैठकीच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि त्यांनी एल्बे नदीवरील पुलावर केलेल्या हस्तांदोलनाच्या स्मृतीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला – सोव्हिएत संघ.
- ‘न्यूयॉर्क फेस्टिव्हल टीव्ही आणि फिल्म अॅवॉर्ड्स 2020’ कार्यक्रमात ‘करंट अफेयर्स’ गटात कास्य पुरस्कार जिंकणारा भारतातला एकमेव विजेता – ‘ए बिग लिटिल मर्डर’ नावाचे कथानक.
राष्ट्रीय
- ग्रामपंचायतींच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी, बालकांच्या हितार्थ योग्य पद्धतींचा अवलंब करण्यासाठी आणि ग्रामपंचायत विकास योजना तयार करण्यासाठी पंचायतराज मंत्रालयाने दिलेल्या तीन राष्ट्रीय पुरस्कारांचा विजेता राज्य वा केंद्रशासित प्रदेश – जम्मू व काश्मीर.
- नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2020 याचा विजेता – पंचायत धनग्री, जिल्हा राजौरी, जम्मू व काश्मीर.
- ग्राम पंचायत विकास योजना पुरस्कार 2020 याचा विजेता – पंचायत झालूरा बी, जिल्हा बारामुल्ला, जम्मू व काश्मीर.
- बालकांच्या हितार्थ ग्राम पंचायत पुरस्कार 2020 याचा विजेता – जामोला लोअर, जिल्हा राजौरी, जम्मू व काश्मीर.
- भारतात प्रथमच, या शहरांमध्ये 10 हायड्रोजन इंधन सेलवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बस आणि 10 हायड्रोजन इंधन सेलवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक कार चालवल्या जाणार – लेह व दिल्ली.
व्यक्ती विशेष
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष – अनिता करवाल.
- मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे नवीन सचिव – अनिता करवाल.
- अर्थ मंत्रालयांतर्गत आर्थिक व्यवहार विभागाचे नवीन सचिव – तरुण बजाज.
- कॉर्पोरेट कल्याण मंत्रालायचे पुढील सचिव – राजेश वर्मा.
- रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे नवीन सचिव – अरमाने गिरीधर.
- नौवहन मंत्रालयाचे नवीन सचिव – संजीव रंजन.
- नवीन क्रीडा व युवा कल्याण सचिव – रवी मित्तल.
- नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे नवीन सचिव – इंदू शेखर चतुर्वेदी.
ज्ञान-विज्ञान
- VITAL (व्हेंटीलेटर इंटरव्हेंशन टेक्नॉलॉजी अॅक्सेसीबल लोकली) नावाने उच्च-दाब असलेले वेंटिलेटर विकसित करणारी संस्था – NASA, अमेरिका.
- IIT मुंबई, NIT श्रीनगर आणि इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (अवंतीपोरा, पुलवामा, जम्मू-काश्मीर) येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेले नवीन व्हेंटिलेटर – रुहदार व्हेंटिलेटर.
सामान्य ज्ञान
- NTPC लिमिटेड – स्थापना: 07 नोव्हेंबर 1975; मुख्यालय: नवी दिल्ली.
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) – स्थापना: 03 नोव्हेंबर 1962; मुख्यालय: नवी दिल्ली.
- नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) – स्थापना: 29 जुलै 1958; मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका.
- NITI आयोग (राष्ट्रीय परिवर्तनीय भारत संस्था) – स्थापना: 01 जानेवारी 2015; मुख्यालय: नवी दिल्ली.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
1 total views , 1 views today
Table of Contents