One Liners : एका ओळीत सारांश,28 मे 2020
एका ओळीत सारांश, 28 मे 2020
संरक्षण
- या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली 27 मे ते 29 मे या कालावधीत आणि जून 2020 महिन्यात ‘आर्मी कमांडर’ यांची परिषद दोन टप्प्यांत आयोजित केली जाणार आहे – भारतीय भुदलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे.
अर्थव्यवस्था
- फिच रेटिंग्ज या संस्थेनी 2020-21 या आर्थिक वर्षात इतक्या टक्क्यांपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था संकुचित होण्याचा अंदाज वर्तविला आहे – 5 टक्के.
- फिच रेटिंग्ज या संस्थेच्या अंदाजानुसार, 2020 या वर्षामधील जागतिक एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP) इतक्या टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे – 4.6 टक्के.
आंतरराष्ट्रीय
- सत्तापालट झाल्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त टर्की देशाचे राष्ट्रपती रेसेप तैयिप एर्दोगन यांनी या शहराच्या जवळ पाण्यातले लोकशाही व स्वातंत्र्य बेटाचे उद्घाटन केले – इस्तंबूल.
- इकनॉमिक कमिशन ऑफ आफ्रिका, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक आणि आफ्रिकन युनियन कमिशन यांनी या निर्देशांकाचे उद्घाटन केले – द्वितीय आफ्रिका रिजनल इंटिग्रेशन इंडेक्स (ARII 2019).
- भारताने युगांडा या आफ्रिका देशाला जिन्जा जिल्ह्यात ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभारण्यासाठी मदत केली आहे, ज्याचे नाव आहे – ‘इंडिया’.
राज्य विशेष
- या राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव 29 मे रोजी कोंडापोचम्मा सागर प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत – तेलंगणा.
- नगरपालिका प्रशासन व नगरविकास मंत्री के. टी. रामा राव 28 मे रोजी या शहरामधील जैवविविधता रेल्वे जंक्शन येथे 690 मीटर लांबीच्या प्रथम-स्तरीय उड्डाण पुलाचे उद्घाटन करणार आहेत – हैदराबाद.
- ग्रामीण भागातल्या सर्व व्यक्तींना काम देण्यासाठी ‘श्रम सिद्धी’ योजना या राज्य सरकारने लागू केली – मध्यप्रदेश.
- या शहरात कारगिलच्या पहिल्या सौर उपसा सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन झाले – लडाख.
- राज्यात 47,150 रोजगारांच्या निर्मितीसाठी डेमलर इंडिया, साल्ककॉम्प आणि इतर कंपन्यांसह या राज्याने 15128 कोटी रुपयांचे 17 सामंजस्य करार केले आहेत – तामिळनाडू.
- केरळ राज्याची पहिली महिला पोलिस महासंचालक (DGP) – आर. श्रीलेखा.
ज्ञान-विज्ञान
- या बायोफार्मास्युटिकल कंपनीला कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी सायटोसॉर्ब उपकरण वापरण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (डीसीजीआय) मंजुरी मिळाली – बायोकॉन.
सामान्य ज्ञान
- कतर – राजधानी: दोहा; राष्ट्रीय चलन: रियाल.
- इजिप्त – राजधानी: कैरो; राष्ट्रीय चलन: इजिप्शियन पाउंड.
- ऑस्ट्रिया – राजधानी: व्हिएन्ना; राष्ट्रीय चलन: युरो.
- संयुक्त राष्ट्रसंघ निर्वासित उच्चायुक्त (UNHCR) – स्थापना: वर्ष 1950; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
- आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना (IOM) – स्थापना: वर्ष 1951; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
- टर्की – राजधानी: अंकारा; राष्ट्रीय चलन: लीरा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents