One Liners : एका ओळीत सारांश, 30 एप्रिल 2020

एका ओळीत सारांश, 30 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

 • आंतरराष्ट्रीय जॅझ दिन – 30 एप्रिल.
 • आयुष्मान भारत दिन – 30 एप्रिल.

अर्थव्यवस्था

 • बँकिंग, भांडवली बाजार आणि विमा क्षेत्राचे नियमन करणाऱ्या भारतीय संस्था – भारतीय रिझर्व्ह बँक, SEBI, आणि IRDAI.

आंतरराष्ट्रीय

 • ही आंतरराष्ट्रीय संस्था BRICS देशांना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 15 अब्ज डॉलर पर्यंतचे कर्ज वाटप करणार – न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB).
 • आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (APEC) सचिवालय यांच्या अहवालानुसार, कोविड-19 च्या प्रभावामुळे APEC प्रदेशाची 2020 साली अंदाजित आर्थिक घट – 2.7 टक्के.
 • वर्ष 2020 मध्ये APEC क्षेत्रातला अपेक्षित बेरोजगारीचा दर – 5.4 टक्के.

राष्ट्रीय

 • केंद्र सरकारने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची स्थापना केली – गांधीनगर, गुजरात (स्थापना: 27 एप्रिल 2020).
 • बंगळुरू आणि कोलकाता या शहरांच्या निवडक दाट लोकवस्ती असलेल्या शहरी रहिवासी भागात कोविड-19 विषाणूचा शोध घेण्यासाठी सांडपाण्याची चाचपणी करण्यासाठी शिष्टाचार विकसित करण्यासाठी नेमण्यात आलेला तज्ञ गट – कोविड अॅक्शन कोलॅब (CAC).

व्यक्ती विशेष

 • नवे दक्षता आयुक्त – सुरेश एन. पटेल.
 • सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे नवीन अध्यक्ष – राजीव कुमार.
 • 29 एप्रिल 2020 रोजी मुंबईत निधन झालेला अभिनेता – इरफान खान.
 • 30 एप्रिल 2020 रोजी मुंबईत निधन झालेला अभिनेता – ऋषि कपूर 

क्रिडा

 • अमेरिका देशाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले कर्नाटकचे माजी फलंदाज – जे अरुण कुमार.

राज्य विशेष

 • या राज्य सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जगनन्ना विद्या दिवेन’ योजना लागू केली – आंध्रप्रदेश.
 • एशियन डेव्हलपमेंट बँकेनी (ADB) या राज्याच्या ग्रामीण भागात विश्वसनीय वीज जोडणीसाठी 346 दशलक्ष डॉलरचे (सुमारे 2,616 कोटी रुपये) कर्ज मंजूर केले – महाराष्ट्र.

सामान्य ज्ञान

 • जल शक्ती अभियान याचा आरंभ – 1 जुलै 2019.
 • कॅनडा – राजधानी: ओटावा; राष्ट्रीय चलन: कॅनेडियाई डॉलर.
 • इंडोनेशिया – राजधानी: जकार्ता; राष्ट्रीय चलन: इंडोनेशियाई रूपिया.
 • न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) – स्थापना: 15 जुलै 2014; मुख्यालय: शांघाय, चीन.
 • आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य (APEC) – स्थापना: वर्ष 1989; मुख्यालय: सिंगापूर.
 • एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) – स्थापना: 19 डिसेंबर 1966; मुख्यालय: मंडालूयोंग, फिलिपिन्स.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  One Liners : एका ओळीत सारांश,30 मे 2020

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा