One Liners : एका ओळीत सारांश, 04 मे 2020
एका ओळीत सारांश, 04 मे 2020
दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन (वसंत ऋतूमध्ये) – 2 मे 2020.
- कोळसा खाण कामगार दिन – 4 मे.
- आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन – 4 मे.
राष्ट्रीय
- राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान यांचा ‘नदी व्यवस्थापनाचे भविष्य’ या विषयावरील कार्यक्रम – आयडीयाथॉन.
व्यक्ती विशेष
- 2 मे 2020 रोजी कोरोनामुळे मरण पावलेले लोकपालचे सभासद – न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी.
- फिलिपीन्समधील आशियाई विकास बँक (ADB) येथे प्रधान कार्यकारी समन्वय विशेषज्ञ म्हणून नियुक्त केले गेलेले भारतीय – निलय मिताश.
- “नित्योत्सव कवी” म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात कन्नड कवी, ज्यांचे निधन 3 मे रोजी बेंगळुरू येथे झाले – के.एस. निसार अहमद.
- फोर्ब्स मासिकाच्या अब्जाधीश राजकारणींच्या वर्ष 2020च्या यादीत समावेश असलेले केवळ भारतीय – सावित्री जिंदाल (क्रमांक: 349; संपत्ती: सुमारे 4.6 अब्ज डॉलर).
- जर्मनीच्या ड्यूश वेले या संस्थेचा ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय – सिद्धार्थ वरदराजन (द वायर या संस्थेचे संपादक).
राज्य विशेष
- शहरी भागात राहणाऱ्यांना किमान 120 दिवसांच्या रोजगाराची हमी देणारी मुख्यमंत्री शहरी रोजगार गॅरंटी योजना या राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला – हिमाचल प्रदेश.
सामान्य ज्ञान
- भारतीय भू-चुंबकत्व संस्था (IIG) – स्थापना: वर्ष 1971; स्थळ: मुंबई, महाराष्ट्र.
- राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) याची स्थापना – 20 फेब्रुवारी 2009.
- आशियाई विकास बँक (ADB) – स्थापना: 19 डिसेंबर 1966; मुख्यालय: मंडलूयोंग, फिलिपिन्स.
- हिमाचल प्रदेश – राजधानी: शिमला; राज्याचा दर्जा: 25 जानेवारी 1971.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents